प्रवास सुखकर होवो…!

एकनाथ आव्हाड ऋषिकेशने माझ्याकडून रिझल्ट घेतला. खाकी पेपरपासून घरीच हाताने तयार केलेलं एक छोटसं पाकीट त्यानं माझ्याकडे दिलं. आणि नमस्कार करून लगेच घरी जायला निघाला. रिझल्ट घेऊन मुलं गेल्यानंतर काहीतरी काम करण्यासाठी मी टेबलाचा खण उघडला आणि मला ऋषिकेशने दिलेलं ते पाकीट दिसलं… “ऋषिकेश दिसला का रे मुलांनो तुम्हाला?” मी जरा काळजीनेच विचारलं मुलांना. “नाही सर. तो तर आज आलाच …

आणखी वाचा...

विरंगुळा

एकनाथ आव्हाड एका संध्याकाळी जेवणं झाल्यावर राजूने त्याला बक्षीस म्हणून मिळालेलं ‘बोधाई’ पुस्तक सहज हातात घेतलं. पुस्तकाची पानं चाळता चाळता तो एका कवितेपाशी येऊन थबकला. कविता वाचू लागला. कविता कसली, एक सुंदर तालकथाच होती ती. तो कविता वाचत गेला… “ए  आई, मला बघ आज शाळेत बक्षीस मिळालंय,” घरात पाय टाकल्याबरोबर राजूने आईला आवाज दिला. पण आईऐवजी त्याच्या ताईने म्हणजे सुमानेच …

आणखी वाचा...

आवड असली की सवड मिळते

एकनाथ आव्हाड तीन गोष्टी राकेशला खूप आवडच्या -एक क्रिकेट, झाडे आणि तिसरे म्हणजे गाणे. त्यामुळे त्याचा शाळेच्या मैदानावर, संगीत कला विभागात आणि झाडांच्या सहवासात अधिक वेळ जायचा. “राक्या ए राक्या, येतोस का खेळायला?” अभ्यासाला बसलेल्या राकेशला मित्रांचा आवाज आल्याबरोबर त्याची घराबाहेर पडण्यासाठी चुळबूळ सुरू झाली. आईच्या हे लक्षात आले. ती लगेच म्हणाली, “राकेश, घराबाहेर पाऊल टाकशील तर याद राख. आधी …

आणखी वाचा...

आनंदाच्या नव्या वाटा

एकनाथ आव्हाड भर उन्हाळ्यातसुद्धा सुखद गारव्याचा अनुभव या सहलीने प्रत्येकाला दिलाय या विचाराने अख्खे घरच ‘आनंदाच्या नव्या वाटांत’ गुंतून हरखून गेले होते! संध्याकाळी बाबा कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी संजीव आणि संगीताला सहज विचारलं, “या उन्हाळ्याच्या सुटीत आपण बाहेर कुठेतरी फिरायला जायचं का?” संजीव लगेच म्हणाला, “बाहेर? नको नको बाबा. बाहेर किती ऊन असतं. हा उन्हाळा फारच कडक आहे. सतत आपल्या …

आणखी वाचा...

अखेर सापडली वाट…!

एकनाथ आव्हाड गोष्ट ऐकून सुधीर भावुक झाला. त्याची चूक त्याला उमगली. तो आई बाबांना म्हणाला, “आई, बाबा; यापुढे मीसुद्धा कोपऱ्यात बसून गंजून पडण्यापेक्षा पुढे येऊन, काम करून सदैव लखलखीत राहीन.” “ए  आई, माझ्या निबंधाच्या वहीला कव्हर घालून दे ना लवकर?” आठवीत शिकणारा सुधीर मोठ्यानेच आईला म्हणाला. आई स्वयंपाकखोलीत काम करीत होती. ती काम करता करताच म्हणाली. “अरे, तुला आणि सावनीला …

आणखी वाचा...

शाळेचा लळा

एकनाथ आव्हाड त्याने वडिलांचा हात हाती घेतला आणि भरल्या गळ्यानेच तो म्हणाला, “बाबा, यापुढे मी कधीच शाळेचा खाडा करणार नाही. मन लावून शाळा शिकेन.” “रघू, अरे ऊठ. शाळेत जायचं नाही का तुला? किती वाजलेत ते बघ. अरे, सकाळची सातची शाळा ना तुझी आणि मग एवढा वेळ झोपून कसं चालंल. तू उठतोसच सातला आणि मग तिथून पुढं तुझी अंघोळ, शाळेची तयारी. …

आणखी वाचा...

छोटेसे बहीण भाऊ

लेखक : एकनाथ आव्हाड राधामावशी आश्चर्यानं सारं ऐकत होत्या. मग त्या जागच्या उठून ठामपणे म्हणाल्या, “ताई, तुम्ही तर माझे डोळेच उघडलेत. आता तुम्ही बघाच. मी माझ्या नवऱ्यालाच काय पण कुणालाही माझ्या मुलांमध्ये बिलकूल भेदभाव करू देणार नाही. मग इकडचं जग तिकडं झालं तरी चालेल.” सकाळी दहाची वेळ असेल. दारावरची बेल वाजली. आई पुटपुटली, “ राधा आली असेल…” बाळूने पटकन जाऊन …

आणखी वाचा...

अश्शी घडली जादू…!

लेखक : एकनाथ आव्हाड “शाळेत मिळवलेल्या ज्ञानाचा, विज्ञानाचा रोजच्या जीवनात उपयोग करणे, हेसुद्धा बाळा शिक्षणच. ज्ञानाचे उपयोजन यालाच तर म्हणतात,” आई म्हणाली… बाळू संध्याकाळी पाच वाजता शाळेतून घरी आला तो मोठ्या उत्साहातच. घरात पाय टाकताच तो आपल्या धाकट्या बहिणीला, शमीला म्हणाला, “शमू, तुला जादू दाखवू?” “दादा, तू शाळेत अभ्यास करायला जातोस की जादू शिकायला रे?” शमीचं तिरकस बोलणं बाळूला कळलं. …

आणखी वाचा...

कामाची पोचपावती

लेखका : एकनाथ आव्हाड टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आपल्या मुलाचे कौतुक पाहून आई बाबांचा ऊर आता अभिमानाने भरून आला होता. आणि राधा आपल्या छोट्या भावाचे कौतुक डोळे भरून हृदयात साठवत होती. “ए  आई, माझं पैसे गोळा करण्याचं कार्ड तुला दिसलं का? अगं, इथेच पुस्तकांच्या रॅकवर ठेवलं होतं चार दिवसांपूर्वी. पण आता सापडतच नाही. शाळेत ते कार्ड जमा नाही केलं तर …

आणखी वाचा...

वाढदिवसाचे गिफ्ट

एकनाथ आव्हाड “बाबा, आज माझा वाढदिवस. आज आपण बाहेर फिरायला जाऊया का?  किती महिने झाले, आपण बाहेर कुठे फिरायलाच गेलो नाही?” शमी तक्रारीच्या सुरात म्हणाली. “हो बाबा, बरोबर बोलतेय शमी. जाऊया ना आपण आज फिरायला.” बाळूने शमीच्या बोलण्याला दुजोरा दिला. पाठोपाठ शर्वरीनेही बाळूची री ओढली. “बाबा, प्लीज …! खरंच जाऊया ना आपण आज बाहेर.” शर्वरी नववीत, बाळू आठवीत, तर शमी …

आणखी वाचा...
error: Content is protected !!