कैरी

प्रा. विश्वास वसेकर एका कैरीपासून जितके खमंग प्रकार करता येतात, तसे क्वचितच एखाद्या दुसऱ्या फळापासून करता येत असतील. त्यांचे पुन्हा प्रांताप्रांतागणिक अनेक प्रकार आणि नावे आहेत. आम्र नंदनवनीचे विभूषण श्रेष्ठ हिंद फळातील हे फळ अन्य फळे जरी पक्व आम्र जरी न परिपक्व ही चारोळी म्हणजे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे निर्माते डॉ. श्री. व्यं. केतकर यांनी चौदाव्या शतकात होऊन गेलेला कवी, भाषातज्ज्ञ अमीर …

आणखी वाचा...

वाळवणं

सुजाता नेरूरकर   वाफवलेल्या साबुदाणा पापड्या साहित्य : दोन कप साबुदाणा, मीठ चवीनुसार, केशरी व हिरवा किंवा आपल्या आवडीनुसार रंग, इडली पत्राला लावण्यासाठी तेल, पापड्या वाळत घालण्यासाठी प्लॅस्टिक पेपर. कृती : रात्री साबुदाणा धुऊन मग त्यामध्ये साबुदाणा बुडेल एवढे पाणी घालून झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा पापड्या करण्याअगोदर भिजवलेल्या साबुदाण्यात चवीपुरते मीठ घालून मिक्स करावे. मग त्याचे एकसारखे तीन …

आणखी वाचा...

ओले वाळवण-निर्मितीचा आनंद!

संजीवनी बोकील नवनिर्मितीचा आनंद मग तो कवितेचा असो की उन्हाळी वाळवणाचा! सुलट्या भिंगातून बघायचा!! मोठ्ठा करून उपभोेगायचा!!! परवा मैत्रिणीचा अडीच वर्षांचा नातू दुडूदुडू धावत हातातली पाटी दाखवायला आला. पाटीवर दुधी पेन्सिलने त्याने काही रेघोट्या मारलेल्या होत्या. ती पाटी माझ्यासमोर धरताना तो म्हणाला, “हम्मा ह्ये…” आपली ती नवनिर्मिती दाखवताना त्याचा चेहरा अभिमानाने फुलला होता. आपली पाटी घेऊन सोहम गेला, पण तो …

आणखी वाचा...

उन्हाळ्यापासून करूया बचाव

सुकेशा सातवळेकर उन्हाळा सुखकर करायचा असेल तर भरपूर पाणी पिणं, हेल्दी पेयपदार्थ घेणं, फळं, सॅलडच्या भाज्या, पालेभाज्या आणि इतर भाज्यांचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. उष्णतेची लाट अतिशय त्रासदायक असते. सपाटीवर हवेचं तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा वाढलं, किनारी प्रदेशात ते ३७च्या पुढे गेलं आणि डोंगराळ प्रदेशात ३५च्या पुढे गेलं की उष्णतेची लाट आली असं म्हटलं जातं. या तीव्र तापमानाचा आरोग्यावर परिणाम …

आणखी वाचा...

आंबा-कैरीचे पदार्थ

उमाशशी भालेराव कैरीचा कायरस साहित्य : दोन वाट्या कैरीच्या फोडी, २ वाट्या चिरलेला पिवळा गूळ, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मेथ्या, २-३ चमचे तेल व फोडणीचे साहित्य. कृती : कैरीची साल काढून कैरीच्या लहान लहान फोडी कराव्यात. तेलात मोहरी, जिरे, हिंग पूड घालून खमंग फोडणी करावी. त्यात मेथ्या घालून परतून घ्यावे. नंतर कैरीच्या फोडी घालून त्यांना वाफ आणून शिजवून …

आणखी वाचा...

भाजी नसेल तर…

निर्मला देशपांडे डाळ कांदा साहित्य वाटीभर चणा डाळ, अर्धा किलो कांदे चिरून, १ चमचा लाल तिखट, १ चमचा धने पूड, प्रत्येकी अर्धा चमचा जिरे व मोहरी, १ चमचा काळा मसाला, प्रत्येकी २ तमालपत्र, आंबोशी व लवंगा, थोडा कच्चा मसाला, अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धी वाटी तेल, चवीप्रमाणे मीठ व गूळ, चमचाभर आले-लसूण-कोथिंबीर पेस्ट, चिमूटभर शहाजिरे, कढीपत्ता. कृती चणा डाळ तीन …

आणखी वाचा...

रसई-रसाळी

प्रा. विश्वास वसेकर आमरसाचे जेवण हे पोटाला ‘तढणी’ लागेपर्यंत करायचे असते. पचनाचे बिचाऱ्याचे काय होईल याची पर्वा करायची नसते. एवढे सुंदर आणि भरपूर जेवण केल्यानंतर उर्वरित दिवस निव्वळ लोळून काढायचा असतो. आजची तरुण पिढी एका अर्थाने दुर्दैवी आहे. झाडावर नैसर्गिकरित्या पिकल्यानंतर आपसूकपणे गळून खाली पडलेल्या पाडाचा उंची स्वाद काय असतो हे बहुतेकांना माहीत नसते. एक संपूर्ण उन्हाळा आम्ही घोले रोडला …

आणखी वाचा...

‘मँगो’लिशियस!

पदार्थांमध्ये घालायला आंब्याचा पल्प बाराही महिने मिळत असला, तरी ताज्या आंब्यांची मजा काही औरच! ताज्या आंब्यांपासून करता येतील अशा काही रेसिपीज… मँगो फालुदा साहित्य दोन पिकलेले हापूस आंबे, १ वाटी दूध, १ वाटी शिजवून घेतलेल्या शेवया, ४ चमचे ड्रायफ्रुटचे बारीक तुकडे (बदाम, काजू, पिस्ता), २ चमचे सब्जा बी (अर्धी वाटी पाण्यामध्ये १ तास भिजवून घेणे), २ स्कूप मँगो आइस्क्रीम. कृती …

आणखी वाचा...

व्हा ज्युनियर शेफ!

सुजाता नेरुरकर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की दिवसभर काय काय करायचे हा प्रश्न मुलांसमोर असतो. अशा वेळी मुलांना काही सहजसोपे पदार्थ करायला शिकवावेत. यातून मुलांचा वेळही चांगला जाईल आणि स्वतः करून खाल्ल्याचा आनंदसुद्धा घेता येईल. थंडगार पीयूष साहित्य : दोन कप दही (थंडगार), ४ टेबलस्पून केशर वेलची श्रीखंड, ४ टेबलस्पून आम्रखंड, २ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून दूध, पाव टीस्पून वेलची पूड. …

आणखी वाचा...

पनीर का स्वाद…

उमाशशी भालेराव गार्लिक पनीर साहित्य : एक वाटी पनीरचे चौकोनी तुकडे, ४ सुक्या लाल मिरच्या, एका कांद्याच्या मोठ्या फोडी, एका मोठ्या सिमला मिरचीचे मोठे तुकडे, १ चमचा सोया सॉस, १ चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर, चवीनुसार व गरजेनुसार मीठ व तेल, ७-८ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या. कृती : दोन चमचे तेलात सुक्या मिरचीचे तुकडे परतावेत. नंतर त्यात कांदा …

आणखी वाचा...
error: Content is protected !!