निरोप घेताना…

विश्वास भावे निसर्गाकडे बघण्यासाठी फक्त मोठमोठ्या जंगलात जाण्याची गरज नाही. आपल्या घराच्या गच्चीत, खिडकीत उभे असाल, शहरातल्या बागेत, ट्रेकला किंवा अधेमधे आसपासच्या ठिकाणांवर छोट्या छोट्या नेचर ट्रेल्समध्ये सहभागी होत असाल तेव्हा डोळ्यांबरोबर कानसुद्धा उघडे ठेवलेत तरी खूप काही हाताला लागेल. ‘अरण्यवाचन’ ही लेखमाला सुरू होऊन एक वर्षाहून जास्त काळ झाला आहे. या काळात आपण नकळत सर्व ऋतूंमधील निसर्गाची रूपे बघितली …

आणखी वाचा...

आंब्यावरचा सुरवंट

भरत दातार काही दिवसांपूर्वी आंब्याच्या झाडावर एक कोष आणि सुरवंट दिसला. अज्ञानाने मी तो काढून टाकला… पण नंतर मला तज्ज्ञांकडून कळाले की आपल्याकडे हल्ली आंब्याच्या झाडावर फुलपाखराचा सुरवंट आणि कोष दिसतो. तुमच्या झाडावर दिसत असेल तर निरीक्षण करा… गच्चीमध्ये एका कुंडीत आंब्याचे झाड लावले आहे. कलम दापोली कृषी विद्यापीठामधून आणले होते दोन वर्षांपूर्वी. आता झाड चांगले बहरले आहे. काही दिवसांपासून …

आणखी वाचा...

सीमा निश्चित करताना…

विश्वास भावे ‘ये मेरा इलाका है’ हे सांगण्याच्या काही पद्धती आहेत. त्यापैकी एक म्हणजे कॉल. पण सतत कॉल देऊन सावजाला सावध करणेही शक्य नाही. त्यामुळे मार्जार कुलातील एकलकोंडे जीवन जगणाऱ्या जनावरांच्या जीवनात इलाका जाहीर करताना कॉल देण्याबरोबरच रासायनिक संपर्क यंत्रणेचासुद्धा उपयोग करतात. या क्रियेला ‘टेरिटरी मार्किंग’ म्हणतात. एखादा सर्पगरुड एका विशिष्ट झाडावर किंवा शेजारच्या झाडावर नेहमी दिसतो, किंवा एक शिंगळा …

आणखी वाचा...

संरक्षण व्यवस्था

विश्वास भावे तुम्ही चितळाच्या कळपाचे निरीक्षण केले, तर तुम्हाला कळेल की त्यांच्यात एक किंवा दोन सभासद, बहुधा माद्या, पहारेकरी असतात. इतरजण चरत असताना त्या चहुबाजूंनी लक्ष ठेवून असतात. त्यांचे कान चारही दिशांना सतत वळत असतात, ताठ होत असतात. या जनावरांना वाऱ्याबरोबर येणारा गंध चटकन पकडायची नैसर्गिक देणगी असते. जंगलात भक्ष्यप्रजातींना सतत धोका असतो हे खरे. पण त्यामुळे सतत सावध राहायला …

आणखी वाचा...

निसर्गयात्री

गोपाळ कुलकर्णी यंदाच्या पद्म सन्मानांमध्ये ठळकपणे दिसले ते अज्ञात निसर्गयात्री. विषारी सापालाही प्रेमानं हाताळणारे इरूला आदिवासी असोत, की नऊ अन्नांचं पुनरुज्जीवन करणारे हिमाचलमधील नेकराम शर्मा, ओडिशामध्ये औषधी वनस्पतींचा मळा फुलविणारे पटायत साहू असोत किंवा देशी वाणांचं संवर्धन आणि संगोपन करणारे केरळमधील चेरूवेयल राम… प्रत्येकजण आपआपल्या परीनं वसुंधरेचं सौंदर्य जपताना दिसतो. ‘देवानं त्यांना विष वरदानरूपानं दिलं असेल तर सापांना मारण्यामध्ये काय …

आणखी वाचा...

अन्न शोधतानाच्या सवयी

विश्वास भावे अन्न मिळवताना आणि ते खातानाच्या सवयी आपल्याला जंगलात बरेच काही सांगून जातात. शिकार करण्याची पद्धत हासुद्धा महत्त्वाचा भाग आहे. रानकुत्रे पाठलाग करून शिकार करणारे असल्यामुळे त्यांना लपतछपत, दबा धरून राहण्याची गरज नाही. त्यामुळे ते कुठेही खुले आम दिसू शकतात. पण वाघ-बिबळे मात्र थोडे अंतर धावत जाऊन नंतर झडप घालून शिकार करणारे प्राणी असल्यामुळे ते आपल्याला लपतछपत वावरतानाच आढळतील. …

आणखी वाचा...

शहरातले पक्षी-संवर्धन: आपण काय करावे व करू नये!

डॉ. संजीव बा. नलावडे शहरांमध्ये आपल्या आजूबाजूला खूप सारे पक्षी वावरत असतात. शहरीकरणाच्या रेट्यात आपला भवताल गमावणाऱ्या पक्ष्यांसाठी आपण वरवर छोट्या दिसणाऱ्या, पण पक्षी-संपन्नतेवर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या काही कृती करू शकतो. शहरे जैवविविधता संपन्न असतात, विशेषतः त्यांची पक्षी-विविधता मोठी असते. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास मुंबई उपनगर हे राज्यातील सर्वाधिक पक्षी-संपन्न नागरी क्षेत्र आहे (३६९ पक्षी जाती). त्यापाठोपाठ पुणे (३३०+), नागपूर …

आणखी वाचा...

या कार्बनचं करायचं काय?

इरावती बारसोडे जागतिक तापमानवाढ कमी करायची असेल तर हरित वायूंचं उत्सर्जन, त्यातही कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन थांबवायला हवं, ही बाब तज्ज्ञ खूप आधीपासून ओरडून ओरडून सांगत आहेत. भविष्यात आपण कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन पूर्णतः थांबवण्यात यशस्वी होऊदेखील कदाचित. आशावादी असणं केव्हाही चांगलंच! पण आपण आत्तापर्यंत हवेत जो कार्बन डायऑक्साइड आधीच सोडून ठेवला आहे, त्याचं काय? सध्या हवेमध्ये सुमारे ४१८ पीपीएम (पार्ट्स पर …

आणखी वाचा...

अनपेक्षित वादळ

डॉ.श्रीकांत कार्लेकर जागतिक हवामान बदलांमुळे विशेषतः उष्णकटिबंधात चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता कमी वेळेत वाढत आहे. समुद्राचे सतत वाढणारे तापमान आणि वातावरणातील अतिरिक्त हरित वायूंमुळे वादळे तीव्र होत आहेत, असे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. फेब्रुवारीच्या सहा तारखेपासून दक्षिण हिंदी महासागरात विकसित झालेले आणि साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करणारे ‘फ्रेडी’ (Freddy) हे वादळ वादळी ऊर्जेचा प्रचंड साठा असलेले जगातले आजपर्यंतचे सर्वात …

आणखी वाचा...

ऋणानुबंध

सुमेधा सरदेसाई चिमण्या थव्यांनी येत होत्या, थव्यांनी जात होत्या. त्यांची शिस्त तर अगदी वाखाणण्यासारखी होती. सगळ्या चिमण्या आधी झाडांवर थांबायच्या. त्यातल्या मोजक्या चार-पाच चिमण्या पुढे येऊन दाणे टिपून जायच्या, मगच पुढच्या चिमण्या यायच्या. सर्व काही क्रमाने चालायचे. सगळा मिळून वीस ते पंचवीस मिनिटांचा खेळ असायचा. अत्यंत लयबद्ध आणि तालबद्ध काम चालायचे. जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधणार असल्याने आम्ही पुण्यातच …

आणखी वाचा...
error: Content is protected !!