अजून चालतोचि वाट..!

डॉ. बाळ फोंडके अयोग्य पर्यावरणापासून आपला बचाव करण्याची कामगिरी वैद्यकीय तंत्रज्ञान इमानेइतबारे पार पाडत आहे. या तंत्रज्ञानाचा विकास गेल्या एका शतकामध्येच झाला आहे. त्यामुळं जगाच्या बहुतांश भागात नैसर्गिक निवडीला आवर घातला गेला आहे का? उत्क्रांतीच्या या कळीच्या अंगाची मुस्कटदाबी करण्यात आली आहे का? नैसर्गिक वारशाची कहाणी संपली आहे का?… चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत मान्य नसणारी अनेक मंडळी आजही आहेत. वानरांपासून …

आणखी वाचा...

टॉलेमीचा अल्माजेस्ट

अरविंद परांजपे त्या काळात माहीत असलेल्या गणितावर टॉलेमीने त्याच्या प्रबंधात सखोल भाष्य केले आहे. हा प्रबंध इतका महत्त्वाचा आणि प्रसिद्ध झाला होता की याला ‘द ग्रेटेस्ट ट्रिटाईस’ (The Greatest Treatise) किंवा एक श्रेष्ठ प्रबंध म्हणूनही ओळखण्यात येते. साधारण हेलिनिस्टिक कालखंडाच्या शेवटच्या काळापर्यंत म्हणजेच इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीपर्यंत पृथ्वी हेच विश्वाचे केंद्र आहे ही धारणा रुजली होती. तारे, ग्रह, सूर्य आणि …

आणखी वाचा...

राष्ट्रीय ताग आणि संबंधित धागे तंत्रज्ञान संशोधन संस्था, प. बंगाल

सुधीर फाकटकर भारतातील ताग (ज्यूट) लागवडीला आणि उत्पादनांना कित्येक शतकांचा इतिहास आहे. गोणपाट किंवा सुतळीच्या निमित्ताने परिचित असलेल्या तागाचे केवळ एवढेच उपयोग नसून तागाच्या धाग्यातून किंतान (Hessian) म्हणजे बिछायती, आवरण, गालिचा आणि कॅनव्हास इत्यादींसाठी कापड म्हणून तागाचे धागे वापरले जातात. सध्या आपला देश ताग उत्पादनातील प्रमुख निर्यातदार देश असून तागाच्या अनुषंगाने प्रतिवर्षी होणारी उलाढाल १० ते १२ हजार कोटी रुपयांची …

आणखी वाचा...

वातावरणाची उत्क्रांती

डॉ. श्रीकांत कार्लेकर पृथ्वीवरच्या वातावरणाची एक सुनिश्चित अशी रचना आणि घटना असल्याचे दिसते. पृथ्वीला लाभलेले हे वातावरणाचे कवच हा निसर्गाचा खरोखरच एक अव्दितीय आविष्कार आहे! पृथ्वीभोवती असलेला वातावरणाचा थर हे पृथ्वीला मिळालेले मोठे वरदान आहे. याचे एकमेव कारण म्हणजे पृथ्वीचे सूर्यापासून असलेले नेमके व सुयोग्य अंतर आणि तिचे गुरुत्वाकर्षण! पृथ्वी सूर्यापासून १५ कोटी किलोमीटर ह्या अत्यंत अनुकूल अंतरावर आहे. आजच्यापेक्षा …

आणखी वाचा...

साहा अणुकेंद्रकीय भौतिकी संस्था, प. बंगाल

सुधीर फाकटकर दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर आलेल्या विदारक अनुभवानंतर अणुऊर्जेचा वापर शांततेसाठी करण्यावर सगळ्या जगाचे एकमत झाले. अणुऊर्जेचा शांततेसाठी वापर म्हणजे, मुख्यत्वे अणूच्या विखंडन आणि संमिलन प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचा विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी वापर करणे. याखेरीज आण्विक पातळीवरील तंत्रविज्ञानातून विविध मूलद्रव्ये व पदार्थांवर संशोधन करत; त्यातून औषधांचा विकास करणे, उपचारपद्धती विकसित करणे तसेच शेती, रासायनिक किंवा औद्योगिक उपयोजनांसाठी …

आणखी वाचा...

तंत्रशहाणीव

प्रेक्षागृह शांततेत बुडालेलं आहे. रंगमंचावरच्या मिणमिणत्या म्हणता येईल इतपतच प्रकाशात नायिकेची हालचाल जाणवते आहे. अस्वस्थ. नायिकेच्या अस्वस्थ तणावाने प्रेक्षागृहातल्या प्रत्येकाला लपेटून घेतलं आहे. प्रेक्षागृहातला प्रत्येकजण श्वास रोखून रंगमंचाच्या प्रत्येक कोपऱ्यातली अगदी पुसटशी हालचालही टिपण्याच्या प्रयत्नात; अवांच्छिताच्या भीतीने घेरलेल्या नायिकेसारखाच. अचानक…. प्रेक्षागृहातल्या कोणाचा तरी मोबाईल किंचाळायला लागतो…. आता रंगमंचावर भगभगीत प्रकाश आणि नायिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या खलनायकाच्या आणि इतकावेळ तणावाखाली …

आणखी वाचा...

वारशातला बदल

डॉ. बाळ फोंडके मूळचा वारसा काही असला तरी त्यात बदल करून तो व्यापक जनहिताचा कसा करायचा याचं इंगित आता वैज्ञानिकांच्या हाती आलं आहे. त्या आधारे भविष्यात शेतीमध्ये आमूलाग्र बदल होण्याच्या दिशेनंच वाटचाल सुरू झाली आहे. अन्नसुरक्षेच्या दृष्टीनं हे चित्र आशादायी आहे यात काय संशय! हवामान बदलाची चर्चा गेली काही वर्षं होत आहे. पण त्याचा दृश्य प्रभाव यंदा मोठ्या प्रमाणात झाला …

आणखी वाचा...

पृथ्वीचा परीघ

अरविंद परांजपे हेलिनिस्टिक कालखंडाच्या सुरुवातीच्या सुमारास पृथ्वीचा आकार एक चेंडूसारखा गोल असावा, याची जाणीव शास्त्रज्ञांना झाली होती. ॲनॅक्झिमँडर (Anaximander, इ.स.पू. ६१०-५४६) याने सुचविल्याप्रमाणे पृथ्वी दण्डाकृती तर नक्कीच नाही, याचा अंदाज संशोधकांना येत होता. अनंत अवकाशाचा शोध घेत असताना पृथ्वीचा आकार गोल आहे हे वेगवेगळ्या निरीक्षणातून सिद्ध होत होते. समुद्रात दूरवर जाणारे जहाज आपल्याला लहान-लहान होत जाताना दिसते. जर पृथ्वी सपाट …

आणखी वाचा...

एकतेतून विविधता

डॉ. बाळ फोंडके जगाच्या जवळजवळ आठ अब्ज लोकसंख्येत तुम्ही आम्ही एकमेवाद्वितीय ठरतो. आपली प्रतिकृती असावा असा दुसरा कोणी दिसून येत नाही. आणि तरीही सगळेजण मानवच असतात. एवढंच काय पण भावंडाभावंडांमध्ये वेगळेपण असूनही ती एकाच आईवडिलांची मुलं आहेत हे अगदी डीएनए चाचणीतूनही सिद्ध होतं. नुकतीच येऊन गेलेली कोरोनाची साथ काय किंवा यापूर्वी येऊन गेलेल्या जागतिक स्तरावर धुमाकूळ घालणाऱ्या स्पॅनिश फ्लू, ब्लॅक …

आणखी वाचा...

भारताची क्वांटम झेप

गोपाळ कुलकर्णी क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनासाठी एक पाऊल पुढे टाकताना भारताने नुकतीच नॅशनल क्वांटम मिशनला मान्यता दिली. पुढील आठ वर्षांसाठी या मोहिमेवर सहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. केंद्र सरकारचा हा निर्णय ‘क्वाटंम जम्प’ ठरेल, असा आशावाद विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला आहे. तसं पाहता या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू पाहणारा भारत हा पहिलाच देश …

आणखी वाचा...
error: Content is protected !!