नीरजची आश्वासक भालाफेक

किशोर पेटकर या वर्षी जागतिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने भाल्याचा नेम सुवर्णावर साधण्याची क्षमता प्रदर्शित केल्यास पुढील वर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताला पदकाची अपेक्षा निश्चितच बाळगता येईल. त्यापूर्वी, यावर्षी सप्टेंबरपर्यंतचा मोमस नीरजसाठी निर्णायक असेल. टोकियो ऑलिंपिकमधील भारताचा ऐतिहासिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्यासाठी गतसाल दुखापतग्रस्त ठरले. मात्र या वर्षी तो दणक्यात आणि पूर्ण तंदुरुस्तीने ट्रॅकवर उतरला आहे. जगातील या …

आणखी वाचा...

सात्विक-चिरागचा पराक्रम

किशोर पेटकर सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या दोघांनीही एकेरीऐवजी दुहेरीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. दोघांचाही सुरेख ताळमेळ साधला गेला. खेळ बहरला आणि आत्मविश्वासही प्रबळ बनला. याच जोरावर भारताला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पदक विजेती जोडी गवसली. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची ताकद दिसते खरी, पण सुवर्णपदकासाठी आपल्याला तब्बल ५८ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. दुबईत झालेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक …

आणखी वाचा...

माउंट मेरूच्या निमित्ताने…

उमेश झिरपे पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांच्या चमूने मे-जून महिन्यामध्ये हिमालयातील माउंट मेरू सर करण्याची मोहीम आखली आहे. मेरू पर्वताच्या दक्षिण शिखर चढाईचा भारतीय गिर्यारोहकांचा हा पहिलाच संकल्प आहे. येत्या ११ तारखेला गिरिप्रेमीचा संघ मोहिमेसाठी रवाना होत आहे. या मोहिमेची वैशिष्ट्ये, तयारी या विषयी ‘सकाळ साप्ताहिक’ एक लेखमाला प्रसिद्ध करीत आहे, त्या मालिकेतील हा तिसरा लेख. एव्हरेस्टपासून अन्नपूर्णापर्यंत, जगातील चौदा अष्टहजारी …

आणखी वाचा...

‘राफा’ परतण्याची प्रतीक्षा…

किशोर पेटकर आवश्यक तयारीविना पॅरिसमध्ये पंधराव्या फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅमसाठी खेळणे ‘राफा’साठी जिकरीचे ठरेल. यापूर्वीही नदाल संपल्याची हाकाटी झाली होती, परंतु प्रत्येक वेळी त्याने प्रचंड प्रेरणा प्रदर्शित केली. इतिहास साक्षी आहे. मात्र सध्याची स्थिती अवघड आहे, हे खुद्द नदालच मान्य करतो. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकू लागलीय. नदाल परतण्याची प्रतीक्षा लांबू शकते. जागतिक टेनिसमधील सर्वकालीन महान राफेल नदाल हा श्रेष्ठ खेळाडू. मातीच्या …

आणखी वाचा...

भारतीय क्रिकेटचा ‘राजकुमार’

किशोर पेटकर सलीम दुराणी खेळले तेव्हा झटपट क्रिकेट नव्हतेच. मात्र त्यांनी कसोटी क्रिकेटला आक्रमक फलंदाजीची ओळख करून दिली. फलंदाजाने शास्त्रोक्त, शैलीदारपणे, खराब चेंडूंचा वाट पाहत कसोटी क्रिकेट खेळावे हेच प्रशिक्षक नेटमध्ये मुलांना शिकवत असत, कारण तो काळच संयमी क्रिकेटचा होता. मात्र सलीम दुराणी क्रिकेटच्या पुस्तकात बंडखोर ठरले. भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर आणि भव्यदिव्य ठरलेला मुग़ल-ए-आज़म हा चित्रपट ऑगस्ट १९६०मध्ये रुपेरी पडद्यावर …

आणखी वाचा...

भारतीय महिलांचा ‘गोल्डन पंच’

किशोर पेटकर मार्चमध्ये नवी दिल्लीत झालेली महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण ठरली. भारतीय महिलांनी निराशा केली नाही. टोकियो ऑलिंपिक पदकविजेती लव्हलिना बोर्गोहेन, गतवेळची जागतिक विजेती निखत झरीन यांच्यासह गेल्यावर्षी राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकलेली नितू घंघास व पुनरागमन करणारी स्वीटी बूरा यांनी जागतिक स्पर्धेत ‘सोनेरी ठोसा’ लगावला. चार सुवर्णपदकांची प्राप्ती भारतासाठी आश्वासक ठरली. भारतासाठी ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंग पदकविजेता खेळ झाला आहे. ऑलिंपिकमधील …

आणखी वाचा...

आखाती तडका

किशोर पेटकर संतोष करंडक राष्ट्रीय स्पर्धेत एकेकाळचे ‘दादा’ संघ मागे पडत आहेत, तर नवी गुणवत्ता प्रकाशमान होताना दिसतेय. भविष्यात या जुन्या स्पर्धा आणखी झळाळी देण्यासाठी एआयएफएफ नियोजन करीत आहे. जे फुटबॉलपटू व्यावसायिक क्लब पातळीपर्यंत मजल मारू शकत नाहीत पण त्यांचा त्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न असतो, त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा सहभाग मौल्यवान ठरतो. भारतीय फुटबॉलमध्ये ‘संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धे’ला अनन्यसाधारण …

आणखी वाचा...

टेबल टेनिसमधील आश्वासक युवा

लेखक : किशोर पेटकर गोव्यात नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील टेबल टेनिस स्पर्धेमध्ये विविध देशांमधील युवा टेबल टेनिसपटूंची कामगिरी पाहता, त्यांचे आंतरराष्ट्रीय भवितव्य उज्ज्वल आहे, असे म्हणता येईल. गोव्यातील पणजीजवळील ताळगाव पठारावर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धा नुकतीच झाली. जागतिक टेबल टेनिसमध्ये डब्ल्यूटीटी स्पर्धेला मानाचे स्थान आहे. या स्पर्धेचे भारतात प्रथमच आयोजन झाले. स्तुपा …

आणखी वाचा...

ऑस्ट्रेलियाचा पराक्रम!

लेखक : किशोर पेटकर टी-२० असो, वा एकदिवसीय क्रिकेट, ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी अष्टपैलू खेळाने दबदबा राखला आहे. तेथील महिलांची बिग बॅश लीग स्पर्धा यशस्वी गणली जाते, देशांतर्गत महिला क्रिकेटचा पाया बळकट आहे. त्यामुळे कांगारूंचा महिला संघ धडाकेबाज, बिनधास्त क्रिकेट खेळताना दिसतो. महिलांच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला २००९ साली सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत इंग्लंडच्या महिलांनी बाजी मारली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या महिलांना उपांत्य …

आणखी वाचा...

नोवाक जोकोविचची जिगर

लेखक : किशोर पेटकर मेलबर्न पार्कवर विक्रमी दहावे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस विजेतेपद मिळविल्यानंतर नोवाक जोकोविच म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील हा सर्वांत मोठा विजय आहे.’ ग्रीसचा युवा खेळाडू स्टेफानोस त्सित्सिपास याला पराजित केल्यानंतर हा ३५ वर्षीय लढवय्या टेनिसपटू भावनाविवश झाला. कारकिर्दीतील २२वा ग्रँडस्लॅम एकेरी करंडक मिळवल्यानंतर जोकोविचने रॉड लेव्हर अरेनावरील आप्तेष्टांच्या कक्षाकडे धाव घेतली. स्वकियांच्या साथीत त्याने भावनांना वाट मोकळी करून दिली; …

आणखी वाचा...
error: Content is protected !!