तामिळनाडूचे कांदळवन

दीप्ती योगेश आफळे आमची होडी कालव्यांमधून फिरून आम्हाला खारफुटी जंगलसफर घडवून आणीत होती. वरून खारफुटीच्या फांद्या आणि खालून खारफुटीच्या मुळ्या आणि त्यातून तयार झालेल्या बोगद्यामधूनच आमचा प्रवास सुरू होता. तामिळनाडूच्या सहा दिवसांच्या सहलीचा प्लॅन आखून आम्ही सातजण बंगळूरहून निघालो. सहलीचा भरगच्च कार्यक्रम योगेशने स्वतःच आखला होता. अनेक प्रसिद्ध मंदिरांच्या यादीबरोबरच एक पूर्ण दिवस त्याने पिच्छावरमसाठी दिला होता. ‘त्या खारफुटीत काय …

आणखी वाचा...

गूढरम्य पाटेश्वर देवस्थान संकुल

डॉ.  मोहीत विजय रोजेकर छोट्या तटबंदीमधून आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. फरसबंदी प्रांगण, दोन दीपस्तंभ, छोट्या घुमटीमधला नंदी आणि मंदिराची एकूणच रचना कसल्याशा गूढतेची जाणीव करून देते. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा या ओळींमध्ये म्हटल्याप्रमाणे दगडांचा कणखरपणा आणि फुलांचा कोमलपणा एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल तर पाटेश्वर देवस्थान अतिशय योग्य स्थळ आहे. साताऱ्यापासून सुमारे …

आणखी वाचा...

अबिदजान!

डॉ. सुमेधा कुलकर्णी रेन फॉरेस्ट काय असते हे जाणून घेण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आयव्हरी कोस्टमध्ये पूर्ण झाली. ताय नॅशनल पार्क हे नक्कीच बघण्यासारखे राष्ट्रीय उद्यान आहे. जंगलातून वाहणाऱ्या नद्या, त्यांची खोरी आणि हिरवीगार दाट झाडी अशा अलौकिक निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत तिथेच बसून राहावे असे वाटते. तेथून पाय निघता निघत नाही. आयव्हरी कोस्ट हा पश्चिम आफ्रिकेच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील एक …

आणखी वाचा...

विहंग विश्व…

शेखर ओढेकर पक्षी निरीक्षण करता करता त्यांच्या विश्वाविषयी खूप नवीन माहिती कळत गेली, आणि त्यांच्या अद्‍भुत दुनियेविषयी कुतूहल वाढतच गेले… पक्ष्यांची दुनिया खरोखरच अद्‍भुत आहे. जेव्हापासून पक्षी निरीक्षणाची, फोटोग्राफीची आवड निर्माण झाली, वेड लागले तेव्हापासूनच पक्ष्यांच्या बाह्य रूपाबरोबरच (आकार, रंग, आवाज) त्यांच्या सवयी, स्वभाव वैशिष्ट्ये आणि खाद्य म्हणजेच त्यांच्या वर्तणुकीबद्दल जास्त आकर्षण वाटले. त्यातून उत्सुकता वाढली आणि अभ्यास सुरू झाला. …

आणखी वाचा...

अनोखे चार धाम

रश्मी कापशीकर चार धामच्या प्रत्येक क्षेत्राचा अनोखा महिमा आहे. हिमालयाच्या भव्य आणि दिव्य निसर्गासमोर आपण किती क्षुद्र आहोत, याची जाणीव होते. अशा निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या चार धाम यात्रेला जाऊन धन्य वाटते! आम्ही चार धामची यात्रा करून परतलो तरी मन अजूनही तिथेच रेंगाळत होते. मी, माझे मिस्टर, माझी आई, माझ्या दोन मावश्या आणि एका मावशीचे मिस्टर असे आम्ही सहा जण ट्रॅव्हल्समार्फत …

आणखी वाचा...

सुट्टी आणि प्रवास..

लेखादिव्येश्वरी चंद्रात्रे उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मोठी ट्रिप तर होतेच. बुकिंगचा टप्पा पार पडला की त्यापुढचा टप्पा असतो पॅकिंगचा. काय घेऊ? काय काय लागेल? काय नेले नाही तरी चालेल? आणि सगळ्यात महत्त्वाचे बॅगेत किती सामान बसेल? असे प्रश्न निघेनिघेपर्यंत पाठ सोडत नाहीत. आमच्याकडेही काही वेगळी परिस्थिती नसायची. प्रवासादरम्यान उपयुक्त, गरजेच्या आणि बॅगेत भरून नेण्यासाठी सोप्या काही गोष्टी आम्ही शोधल्या… रणरणत्या उन्हात …

आणखी वाचा...

अर्थपूर्ण रंगांचा आनंदी देश

चंद्रशेखर जोशी समुद्रसपाटीपासून ३१०० मीटर उंच असलेली टाकसंग मॉनेस्ट्री बघायला जाताना चढाईमध्ये दर दहा मिनिटांनंतर थांबून श्वासांचे संतुलन करणे भाग पडत होते. तिथे प्रत्यक्ष पोहोचल्यावर मात्र डोळ्याचे पारणे फिटले. सर्व कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटले. थकवा पळून गेला. सर्व बाजूंनी हिरव्यागार दऱ्या आणि डोंगर, मधूनच डोळे मिचकवणारा सूर्य आणि भव्य अशा कातळावर असलेले मॉनेस्ट्रीचे भव्य बांधकाम… अनोखेच दृश्य होते ते! भूतान …

आणखी वाचा...

निष्काळजीपणा नकोच!

ओंकार ओक उन्हाळ्याच्या सुट्या आणि ट्रेकिंचा सीझन येतो आहे. ट्रेकिंग करताना वाट चुकून, कुठून तरी पडून जबर जखमी होणं किंवा मृत्यू ओढावणं, सेल्फी किंवा साधा फोटो काढायच्या नादात कड्यावरून पाय घसरून अपघात होणं, मुख्य वाट सोडून शॉर्टकट घेण्याच्या अट्टहासामुळे पाय घसरणं वगैरे गोष्टी निष्काळजीपणामुळे सर्रास घडतात. नव्याण्णव टक्के अपघात माणसाच्याच चुकीमुळे होत असल्यानं यात ‘ट्रेकिंग हा अत्यंत रिस्की खेळ आहे’ …

आणखी वाचा...

बॉँबे टू गोवा… सायकलने!

श्रीनिवास निमकर प्रवासात आमच्या सायकल राइडबद्दल विविध प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शालेय मुलांना तर खूपच कौतुक वाटायचे. कित्येकांकडून ‘हॅलो रायडर’ अशी हाक यायची. ‘रेसिंग सायकल बघ!’ हीदेखील प्रातिनिधिक प्रतिक्रिया. ‘म्हातारों जोसांत मारतां हां सायकल!’ हा एक कौतुकमिश्रित उद्गार… आणि याउलट ‘सायकल मारून कशांस xx दुखवून घेतांव, फक्त दोनशे रुपये तिकीट आसां रेल्वेचा मुंबईसून…’ असेही मत एकाने व्यक्त केले! ‘बॉँबे टू …

आणखी वाचा...

इस्राईल : वाळवंटातील नंदनवन

डॉ. नरेंद्र पटवर्धन कारमेल पर्वतावर वसलेल्या हाइफा या सुंदर गावाला मोठा समुद्र किनारा आहे व इस्राईलचे सर्वात मोठे बंदर आहे. डोंगरावर छोटी घरं, बिल्डिंग्ज व गगनचुंबी इमारती आहेत. येथे बहाई धर्मियांचं प्रसिद्ध मंदिर आहे. येथून समुद्राचा, बंदराचा देखावा खूप सुरेख दिसतो. पश्चिम आशियातल्या चिमुकल्या परंतु अत्यंत प्रगत आणि शक्तिशाली अशा इस्राईल या देशाच्या पर्यटनाचा योग २०१६मध्ये अचानकच आला. इस्राईलला गेल्यावर …

आणखी वाचा...
error: Content is protected !!