महिलांचे आजार

डॉ. मीनाक्षी देशपांडे 
गुरुवार, 21 जून 2018

कव्हर स्टोरी : आरोग्य विशेष
 

महिलांच्या आरोग्याविषयी आतापर्यंत खूप काही लिहिले गेले आहे व लिहिले जात आहे. या लिखाणाची खूप आवश्‍यकता आहे, त्यामुळे कुटुंबात, समाजात आणि व्यक्तिशः स्त्रीमध्ये त्या विषयी जागरूकता निर्माण होऊन कितीतरी आजार टाळता येतात अथवा सुरवातीच्या अवस्थांत हेरले गेल्यामुळे यशस्वीरितीने हाताळता येतात. उदा. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग यांचे प्राथमिक अवस्थेत निदान होणे आवश्‍यक असते. या लेखाचा प्राथमिक उद्देश हा आहे, की स्त्रियांच्या आजाराचे स्वरूप कालानुरूप बदलते आहे. जुने आजार चालूच आहेत. त्यात नवीन आजारांची भर (Life style diseases) पडत आहे. आपण या समस्यांचे दोन भागात वर्गीकरण करू शकतो.

ॲनिमिया(रक्तक्षय)
 आहारातून लोह व इतर घटकांची कमतरता (CB१२+folucacH) 

 अति रक्तस्राव अ) गरोदरपणा व बाळंतपणातील ब) मासिक पाळीतील a- DUB  b- fibroid इत्यादी

गरोदरपणातील मातामृत्यू
या पूर्वीच्या आजारांबरोबर आता नवीन आजारांची भर पडली आहे. तसे बघितले तर हे नवीन आजार पूर्णतः नवीन नाहीत. पण पूर्वी याचे प्रमाण नगण्य होते आता महत्त्वपूर्ण झाले आहे.
     स्थूलता, वजनात खूप वाढ त्याबरोबर येणारे सोबती

मधुमेह
     PCOD (Polycystic Ovarian Disease) व त्या अनुषंगाने येणाऱ्या पाळीच्या तक्रारी
PCOD बद्दल थोडक्‍यात : यात, व्यायामाचा अभाव, बैठे काम/ अभ्यास, मैदानी खेळांचा अभाव (Games Mobile वरच खेळले जातात), त्याच जोडीने जंक फूडचे अतिसेवन (बर्गर, कोक, आईस्क्रीम, वडा -पाव, इत्यादी) या सर्वांमुळे स्थूलता वाढते व त्या जोडीने संप्रेरकामध्ये (Hormons) बदल होऊ लागतो, इन्शुलिन रेझिस्टंस व त्यामुळे मधुमेह व त्यामुळेच PCOS व पाळीची अनियमितता सुरू होते.

स्थूलता कशी ओळखाल? BMI २३ पेक्षा जास्त
     wt in kg
    (ht in mt)२
उदा.      ७० kg. 
      (१.५)२
याच्या जोडीने थायरॉइडचे आजार वाढीला लागलेले आहेत. संप्रेरकाच्या असंतुलन (Hormonal Imbalance) आल्यामुळे अंडाशयाचे आवरण कडक होऊन स्त्री अंडी तयार होणे व वाढणे ही प्रक्रिया मंदावते ज्यालाच PCOD (Polycystic Ovarian Disease) असे म्हणतात. यामुळे होणारी पाळीची अनियमितता व अंगावरची लव/नको असलेल्या केसांची वाढ होते. (उदा. थोडी जास्त मिसरूड येणे, पोटावर/चेहऱ्यावर केस येणे) हेच असंतुलन पुढे जाऊन गर्भधारणेला त्रासदायक ठरू शकते.

यासाठी अर्थात उपाय वयात येण्यापासून करायला हवेत. जादा मेद येऊ घातल्यास लगेच उपाययोजना करायला पाहिजेत.

गर्भारपणातली गुंतागुंत
हे सुद्धा आज-काल वाढीला लागलेले आहेत. Gestatwnal Diabets Mellitis अर्थात गर्भारपणातला मधुमेह, हायपोथायरॅडिझम व रक्तदाब यामुळे कमी दिवसांचे बाळंतपण व धोक्‍याचे बाळंतपण वाढले आहे. सतत गुगलवर जाऊन माहिती काढून डॉक्‍टरांना विचारणे व सल्लामसलत करण्याने पण स्ट्रेस लेव्हल वाढली आहे.

मेनोपॉज (रजोनिवृत्ती) च्या रक्तस्रावाव्यतिरिक्त इतर तक्रारी
१) मानसिक दौर्बल्य निराशा 
२) हॉट फ्लॅशेस 
३) हाडामधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे त्या अनुषंपागने अस्थिभंग होणे 
४) मेमोपॉजनंतर हृदयविकाराच्या तक्रारी (coronary artery diseas) वाढणे 
५) अतिरिक्तदाबाच्या आजाराने त्रस्त होणे

स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगांचे वाढते प्रमाण 
सर्व जगात स्तनाचा कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग हे स्त्रियांचे सर्वात जास्त मारक व घातक रोग ठरले आहेत. त्यांचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे व योग्य उपचार देऊन जीव वाचविणे, यासाठी नवनवीन उपाययोजना शोधल्या पाहिजेत. नवीन मशिनरीच्या साहाय्याने हे साध्य झाले आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांकडे वेळोवेळी तपासणी करून घेतली तर, या सर्व तपासण्या करून घेता येतात. स्तनाची स्वतःची स्वतः केलेली रोज तपासणी खूप उपयोग ठरते. त्यानंतर PAPs smear, पोटाची सोनोग्राफी नियमित करावी. तज्ज्ञांनी सांगितले तर Colposeopy, Mammography & Biopsy सुद्धा जरूर वाटल्यास लगेच करून घ्यावी तरच कर्करोगाची प्राथमिक अवस्थेत निदान करता येईल व धोका टाळता येईल.

संबंधित बातम्या