हेल्मेट आवश्‍यक का?

-संपादक
मंगळवार, 29 जानेवारी 2019

कव्हर स्टोरी
 

वाहतुकीचे नियम आणि पुणेकर यांचे तसे फार सख्य नाही. सरकारचा कायदा काहीही असो; पण येथील वाहनचालकांचे स्वतःचे असे काही ‘नियम’ आहेत आणि त्यानुसारच इथली रहदारी चालते. त्यामुळे दुचाकी चालविणाऱ्यांनी हेल्मेट वापरले पाहिजे, असा आदेश खुद्द सर्वोच्च न्यायालयाने देऊन काही वर्षे झाली असली, तरी त्याचा सार्वत्रिक अंमल पुण्यनगरीत अद्याप होऊ शकला नाही. पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी नवीन वर्षात हे चित्र बदलण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यातून सुधारणा होईल किंवा कसे, हे बघायचे. 

पुण्यातील वाहतुकीची दैना होण्यामागे खड्डेमय रस्ते, विस्कळित सिग्नलयंत्रणा, पदपथांवर अतिक्रमणे झाल्यामुळे रस्त्यावरून चालणारे पादचारी ही कारणे आहेतच. त्या बरोबरच किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहनचालकांमधील वाढती बेशिस्त. त्यातून अनेक जीवघेणे अपघात सातत्याने होत आहेत. या वर्षभरात सप्टेंबरपर्यंत वेगवेगळ्या दुर्घटनांत १५८ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी वाहनचालकांतील एक ठळक साम्य म्हणजे अपघात झाला, तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते. अपघाताचे स्वरूप तीव्र असल्यामुळे, हेल्मेट असूनही इतर काही जण दगावले आहेत; पण त्यांची संख्या अत्यल्प आहे. हेल्मेट असल्यामुळे अपघात होऊनही बचावले, अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे या जीवरक्षक साधनाची उपयुक्तता पटवून देण्याची वेळच खरे तर येऊच नये. 

तर अशा या हेल्मेटसक्तीच्या अनुषंगाने आरोग्याच्या दृष्टीने हेल्मेटची आवश्‍यकता आणि या संदर्भात कायदा काय सांगतो, यादृष्टीने केलेली चर्चा.
 

संबंधित बातम्या