गॅजेट्‌सची कवचकुंडले

समृद्धी धायगुडे
शुक्रवार, 27 जुलै 2018

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष ट्रेंड्‌स
 

पावसाळ्यात बहुतेकांची पावले ही पर्यटन स्थळांकडे वळतात. पर्यटन म्हणल्यावर कपडे कमी आणि गॅजेट्‌स जास्ती अशी अवस्था असते. पर्यटनाला जाताना हातात मोबाईल किंवा कॅमेरा असतोच त्याच्याशिवाय कुठलाही प्रवास अपूर्णच ! त्यामुळे या महागड्या गॅजेट्‌ससाठी काळजीदेखील तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे गॅजेट्‌सची कवचकुंडले प्रवासात नेहमी उपयोगी पडतात. याविषयी...

  •      ट्रेकला जाताना  आपले गॅजेट्‌स स्मार्ट प्रोटेक्‍टिंग केसमध्ये किंवा जाड प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घालूनच न्यावे. थोडे जास्त बजेट असेल तर ट्रेंडी कलर्सवाल्या कस्टमाइज्ड केसेसही बाजारात आहेत. अगदी २० रुपयांपासून ते थेट ४०० रुपयांपर्यंत या केसेस बाजारात उपलब्ध आहेत. 
  •      ट्रेकर्ससाठी कॅमेरा विशेषतः रेन प्रोटेक्‍टर कॅमेरा तर मस्ट असतो. मात्र पाऊस सुरू झाल्यास कॅमेरा जपावा लागतो. म्हणून कॅमेरासाठी तुम्ही खास रेन प्रोटेक्‍टर्स घेऊ शकता. पॉलीथिनपासून हे कॅमेरा प्रोटेक्‍टर्स बनवले जातात. हे तुम्हाला कॅमेराच्या शोरूमपासून गॅजेट्‌सच्या दुकानात कुठेही मिळतील. 
  •      प्लॅस्टिक असल्याने यामधूनही स्पष्ट फोटो क्‍लिक करता येतात. त्याशिवाय पावसाळ्यात कॅमेरा सुरक्षित ठेवण्यासाठी घरच्या घरी काय करता येईल याबद्दलचे बरेच व्हिडिओ युट्यूबवर मिळतील. त्याच्या मदतीने देखील तुम्ही टाकाऊपासून टिकावू रेन प्रोटेक्‍टर्स करू शकता.
  •      ट्रेकमध्ये मोबाईल भिजल्यास त्याची बॅटरी काढून तो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून द्यावा. घरी आल्यावर तो स्वच्छ पुसून तो तांदळाच्या डब्यात ठेवल्यास आर्द्रता शोषून घेतली जाते. त्यामुळे मोबाइलच्या लहान लहान भागांमधला पाण्याचा अंश शोषून घेतली जाते आणि विशेष म्हणजे हे करताना मोबाइलला कोणताही धोका नसतो.
  •      हल्ली गॅजेट्‌ससाठी खास रबरी बॉक्‍स टाइप बॅग्ज येतात. तुमचे सामान किती आहे त्यानुसार लहान-मोठ्या आकाराच्या बॅग्ज खरेदी केल्यास सर्व गॅजेट्‌स व्यवस्थित सुरक्षित राहतील. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या