पावसाळ्यातील खरेदी

समृद्धी धायगुडे 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी

सीझन कुठलाही असला तरी शॉपिंग मस्ट आहे. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे ट्रेंड्स येतात. पावसाळा आला, की फॅशनसुद्धा बदलते. त्यादृष्टीने खरेदी करावी. मुंबई-पुणे यासारख्या मोठ्या शहरात स्ट्रीट शॉपिंग करताना प्रचंड व्हरायटी बघायला मिळते. कपडे, ॲक्सेसरीज, बॅग्ज, पादत्राणे यांचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात.

पावसाळ्यात शक्यतो गुडघ्यापर्यंत किंवा शॉर्ट ड्रेसेसना तरुण प्राधान्य देतात. मुंबईतील वांद्रे लिंक रोड-हिल रोड, अंधेरी लोखंडवाला मार्केट, फॅशन स्ट्रीटसारख्या ठिकाणी कपडे, चपला, दागिने या सगळ्यांवर सेल सुरू असतात. येथे भेट दिल्यास तुम्हाला मिक्स ॲन्ड मॅच कॉम्बिनेशनचे कपडे आणि वेगवेगळ्या ॲक्सेसरीज सहज मिळतील.

     पावसाळ्यात कपड्यांनंतर पादत्राणांच्या खरेदीला महत्त्व असते. पावसाळा हा एकच सीझन असतो जेव्हा आपण कलरफुल आणि पारदर्शक पादत्राणे वापरू शकतो. सध्या बाजारात फ्लॅट्स, क्रॉक्स, फ्लिप-फ्लॉप्स असे प्रकार आहेत. परंतु इतरवेळी घालायला लेसचे शूज, वेजेस, हिल्स हे तुम्ही सेलमध्ये घेऊ शकता. थोडे वेगळी खरेदी करायची असल्यास गमबूट्स ट्राय करावे. गमबूट्स इतर पादत्राण्यांपेक्षा महाग असले, तरी ते जीन्स, थ्री फोर्थ, स्कर्ट वनपीस सगळ्यांवर उठून दिसतात.

     मुलींच्या ॲक्सेसरीजपैकी तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे ज्वेलरी. पावसाळ्यात हेवी आणि महागडी ज्वेलरी घेण्यापेक्षा हलकीफुलकी आणि कमी धातू असलेली ज्वेलरी निवडावी. पावसाळ्यात धातूचे दागिने लवकर खराब होतात त्यामुळे अशा दागिन्यांची खरेदी सहसा टाळावी. त्यामुळे रिंग, कानातले, गळ्यातले, पैंजण सगळ्याच गोष्टी कमीत कमी धातू असलेल्या वापराव्या.

     रेनी बॅग्समध्येही पारदर्शक किंवा रबरी बॅग, क्लचेस वापरल्यास तुमचे सर्व सामान सुरक्षित राहते आणि दिसायला छान दिसते. रेनकोटच्या मटेरिअलमध्येही मोठ्या बॅग उपलब्ध आहेत. या बॅगवरच्या वेगवेगळ्या प्रिंट्समुळे त्या आकर्षक दिसतात.

     मान्सून सीझनमध्ये लागणाऱ्या सेलचा पुरेपूर फायदा घेऊन पुढच्या सीझनची तयारी जरूर करावी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या