टी टेस्टर व्हायचंय? 

सुरेश वांदिले 
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चहा करिअर
 

‘चाय पे चर्चा आणि चाय पे खर्चा’ हे कधी शक्‍य होतं, तर चहाची चव उत्तम असेल तेव्हा! ही चव कोण बरं ठरवतं? हे ठरवणाऱ्या व्यक्तीला ‘टी टेस्टर’ असं म्हणतात. चहा उत्पादकांकडं या टेस्टर्सना करिअरची संधी मिळते. प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती होण्याआधी चहाची चव, सुगंध यांचं परीक्षण केलं जातं. हे परीक्षण करण्याचं कौशल्य प्रशिक्षणानं प्राप्त करता येतं. मात्र त्याचबरोबर या वेगळ्या करिअरबाबत पॅशनही हवं. चहाची चव सांगण्याची कला अवगत केलेल्या उमेदवारांना चांगल्या संधी मिळू शकतात. 

संस्था : 
१) डिप्रास इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज, कोलकता. 
संपर्क : http://www.dipras.in/ 
अभ्यासक्रमाचा कालावधी : दोन महिने. 
हा अभ्यासक्रम कुणालाही करता येतो. 

२) दार्जिलिंग टी रिसर्च अँड मॅनेजमेंट असोसिएशन 
संपर्क : http://nitm.in/tea_tasting.html. 
अभ्यासक्रम : सर्टिफिकेट कोर्स इन टी टेस्टिंग 
पात्रता : पदवी.  
कालावधी : चार महिने.

संबंधित बातम्या