ग्रहमान २४ ते ३० नोव्हेंबर २०१८

अनिता केळकर
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

ग्रहमान
 

मेष ः तुमच्या आनंदी व उत्साही स्वभावाला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल घडवून कामांना वेग आणाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत अवघड कामाची जबाबदारी तुमच्यावर येईल. वरिष्ठ तुमची एकप्रकारे सत्त्व परीक्षाच घेतील. परंतु त्यातही यशस्वी व्हाल. जोडधंद्यातून कमाई होईल. घरात वातावरण आनंदी राहील.

वृषभ ः गृहसौख्याचा आनंद देणारे ग्रहमान. मनातील स्वप्ने प्रत्यक्षात साकार होतील. व्यवसायात विनाकारण होणारी दगदग, धावपळ कमी होईल. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. रेंगाळलेली कामे गती घेतील. नवीन गुंतवणुकीतून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल. प्रवासयोग येतील. आर्थिक चिंता मिटेल.

मिथुन ः तुमच्या बुद्धीचातुर्याचा लाभ तुम्हाला होईल. अनपेक्षित मानसन्मान व मोठे पद भूषवाल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. व्यवसायात चांगली कामगिरी हातून घडेल. वेळेत कामे पूर्ण होतील. समाधान मिळेल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठ व सहकारी कामाची दाद देतील. पैशाची आवक वाढेल. घरात कौशल्याला वाव मिळेल. शुभकार्य ठरतील.

कर्क ः भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्याल. व्यवसायात महत्त्वाची कामे प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करावी. पैशाची तात्पुरती सोय होईल. जोडधंद्यातून फायदा मिळेल. ओळखीतून नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत उत्साह वाढवणारी कामगिरी वाट्याला येईल. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नये. पैशाचे व्यवहारात दक्ष राहावे.

सिंह ः ग्रहांची अनुकूलता तुम्हाला कामात सक्रिय बनवेल. नवीन काहीतरी घडवण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. तुमच्यातील धडाडी व उत्साह वाखाणण्याजोगा राहील. व्यवसायात कामातील कौशल्य दाखवून स्वतःची प्रतिमा निर्माण कराल. मनातील योजना प्रत्यक्षात साकार होतील. नोकरीत तुमच्या गुणांचे चीज होईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील.

कन्या ः अनपेक्षित मोठ्या खर्चाची नांदी होईल. परंतु तो खर्च चांगल्या कामासाठी असल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात ध्येयधोरणे ठरवून त्याप्रमाणे कृती कराल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करून पैशाची जमवाजमव कराल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत नवीन वर्तुळात काम करण्याचा आनंद मिळेल.

तूळ ः सध्या तुमची ‘कळतं पण वळत नाही’ अशी अवस्था आहे, तरी थोडे सबुरीचे धोरण ठेवावे. व्यवसायात येणाऱ्या संधीचा योग्य तो लाभ करून घेतलात, तर बरेच काही मिळवाल. योग्य व्यक्तींची मदत कामात घ्यावी. नोकरीत वरिष्ठांच्या सल्ल्याचा मान राखावा. मनाविरुद्ध वागावे लागले तरी शांत राहावे. शब्द हे शस्त्र आहे लक्षात ठेवावे. घरात वादविवाद टाळावेत.

वृश्‍चिक ः चिकाटी व धैर्य या गुणांच्या जोरावर कामात बाजी माराल. व्यवसायात वारा वाहिल तशी पाठ फिरवण्याचे तंत्र अवलंबलेत तर उपयोग होईल. कामे गती घेतील. पैशाची स्थिती समाधानकारक असेल, त्यामुळे छोटी गुंतवणूकही करू शकाल. स्वतःच्या मर्यादा ओळखून कामे करावीत. कामासाठी जादा सुविधा व सवलती मिळतील.

धनू ः तुमच्या धाडसी वृत्तीला खतपाणी घालणारे ग्रहमान. व्यवसायात नवीन कामांना गती येईल. आवश्‍यक ते सहकार्य मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. जुनी रेंगाळलेली कामेही मार्गी लागतील. पैशाची तजवीज होईल. नोकरीत तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. वरिष्ठ कामासाठी जादा सुविधा देतील. सहकारी कामात मदतीचा हात देतील.

मकर ः सतत पुढे जाण्यासाठी चालणारी धडपड यशस्वी होईल. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावे. व्यवसायात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे लक्षात ठेवून निर्णय घ्यावेत. कार्यपद्धतीत बदल घडवून नवीन योजना कार्यान्वित करण्याचा मानस राहील. कार्य तत्पर राहून कामे उरकावीत. घरात मानसिक समाधान मिळेल.

कुंभ ः  तुमच्या मार्गातील अडथळे हळूहळू दूर झाल्याने तुमचा हुरूप वाढेल. व्यवसायात नवीन कल्पना अमलात आणाल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य राहील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. नोकरीत सहकाऱ्यांवर फार मोठी भिस्त ठेवू नये. पूर्वी हातून निसटलेली संधी पुन्हा मिळेल, त्याचा लाभ घ्यावा.

मीन ः खर्चावर नियंत्रण ठेवून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. गढूळ परिस्थिती निवळल्याने मनाला हायसे वाटेल. व्यवसायात प्रयत्नांती परमेश्‍वर हे लक्षात ठेवावे व कामे करावीत. कामात धोका न पत्करता जे मिळेल त्यात समाधान मानावे. नोकरीत वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा. आळस झटकून वेळेत कामे पूर्ण करावीत. घरात अनावश्‍यक खर्च टाळावा.

संबंधित बातम्या