ग्रहमान : २५ जुलै ते ३१ जुलै २०२०

अनिता केळकर 
मंगळवार, 28 जुलै 2020

अनिता केळकर
ग्रहमान

मेष – भावनेला महत्त्व द्याल. व्यवसायात तुमची महत्त्वाकांक्षा वाढत जाईल. उलाढाल वाढवून फायदा मिळवण्याचा सतत विचार कराल. पैशांची चिंता दूर होईल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नवीन ओळखी व वेगळ्या वातावरणाचा आनंद तुम्ही घ्याल. पगारवाढ व बढतीचे योग येतील. घरात छोटासा समारंभ साजरा कराल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल. महिलांना कामाचा आनंद मिळेल.

वृषभ – कामाचा तणाव दूर होईल, त्यामुळे हायसे वाटेल. व्यवसायात कामातील अडथळे दूर होऊन कामे मार्गी लागतील. हितचिंतक व मित्रमंडळी तुमच्या मदतीला ययेतील. अनपेक्षित पैशांची ऊब मिळेल. नोकरीत अपेक्षित सवलती मिळाल्याने काम करायला हुरूप येईल. नवीन कामाची संधी मिळेल. घरात लांबलेली कामे पुन्हा हाती घ्याल. प्रियजनांच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरे कराल. आप्तेष्टांच्या भेटीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन वर्तुळात ताजेतवाने वाटेल.

मिथुन – स्वच्छंदीपणे जगण्याचा आनंद उपभोगाल. ताणतणावातून मुक्तता झाल्याने नव्या उमेदीने कामास लागाल. व्यवसायात रेंगाळलेल्या कामात सुधारणा होईल. कामात तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीत कंटाळवाणे काम संपेल. वरिष्ठ व सहकारी तुम्हाला मदत करतील. मानसन्मानाचे योग येतील. घरात व्यक्तींना दिलासा देणारी घटना घडेल. नवीन खरेदीचे मनसुबे सफल होतील. मित्रमंडळींच्या सहवासात वेळ मजेत जाई. तरुणांना विवाहासंदर्भात जो मनात घोळ असेल, तो दूर होईल. महिलांना मानसिक समाधान मिळेल. 

कर्क – वेळ व काळाचे गणित आखून त्याप्रमाणे कामाचे नियोजन कराल. कामाबरोबर तुमच्या अंगी असलेले सुप्त कलागुणही दाखविण्याची संधी तुम्हाला मिळेल. व्यवसायात मध्यस्थांच्या मदतीने कामांना गती द्याल. सरकारी कामात यश मिळेल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशांची चणचण दूर होईल. नोकरीत इतरांवर अवलंबून न राहता स्वतः कामे कराल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. घरात गरजेच्यावेळी इतरांना तुमची आठवण होईल, तरी रागवू नका. कर्तव्यदक्ष राहून कामे संपवा. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. 

सिंह – मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात ज्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते, ते अडथळे आता दूर होतील. अपेक्षित व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. कामात केलेले बदल तुमच्या फायद्याचे ठरतील. नोकरीत मिळणारे फायदे तुमचा हुरूप वाढवतील. बढती किंवा बदल इ. कामांचा तुर्तास विचार लांबणीवर पडेल. घरात तुमच्या व इतर व्यक्तींच्या गरजांना प्राधान्य द्याल. आवडत्या व्यक्ती व प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. मुलांकडून अपेक्षित यश मिळेल. महिलांना योग्य दिशा सापडेल. 

कन्या – कर्तव्यपूर्तीसाठी तुम्ही सदैव दक्ष असता, मात्र या सप्ताहात कर्तव्य व विरंगुळा असा तुमचा दिनक्रम राहील. मन आवडीच्या क्षेत्रात रमेल. व्यवसायात खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. पैशांच्या विचाराने थोडे अस्वस्थ व्हाल. परंतु, जुन्या वसुलीमुळे कामात मार्ग निघेल. नोकरीत स्वतःची वेगळी प्रतिमा उमटवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना कामात सहभागी करून घ्याल. घरात दुरुस्ती, डागडुजी यावर खर्च कराल. नवीन जागा, वाहन खरेदीचे बेत मनात येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मूड येईल.

तूळ – दिलासा देणारे ग्रहमान आहे. अडचणींवर मात करून प्रगती कराल. प्रत्येक गोष्टीत माझे तेच खरे असा तुमचा अट्टाहास असेल. व्यवसायात भोवतालच्या परिस्थितीशी मिळतेजुळते घेतलेत तर फायदा तुमचाच होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळेल. त्यामुळे कामाचा भार सुसह्य होईल. कामामुळे तुमचे महत्त्व इतरांना समजेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नांत तोडेफार यश मिळेल. घरात एखादे शुभकार्य ठरेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे आनंद मिळेल. 

वृश्चिक – नको त्या कामात तुमचा बराच वेळ जाईल. त्यामुळे दैनंदिन कामे पूर्ण होण्यास विलंब होईल. व्यवसायात बाजारातील चढउतारांमुळे तुमच्या धोरणात बरेच बदल करावे लागतील. पैशांचे गणित कोलमडेल. अशावेळी योग्य व्यक्तींची निवड करून काही कामे त्यांच्यावर सोपवून पूर्ण करा. नवीन कामात गुप्तता राखा. नोकरीत नवीन कल्पना तुम्हाला भारावून टाकेल. मात्र लगेचच कृती नको. आपले काम बरे आणि आपण बरे, हे धोरण उपयोगी पडेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. पाहुण्यांची ये-जा राहील. 

धनु – कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कामे हाती घ्याल. येणाऱ्या अनपेक्षित अडचणी व अडथळ्यांवर मात करण्यासाठी सज्ज राहाल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी धोरणात बदल कराल. कार्यपद्धतीत बदल करून कामात सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न राहील. जुन्या ओळखीचा उपयोग करून नवीन कामे मिळतील. नोकरीत कामात आशावादी दृष्टिकोन राहील. कमी श्रमात जास्त यश मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. घरता प्रियजनांच्या जीवनातील शुभप्रसंग साजरे कराल. त्यात वेळ मजेत जाईल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. 

मकर – काही सुखद अनुभव या सप्ताहात येतील. व्यवसायात बरेच प्रयत्न करूनही प्रगती होत नाही असे वाटत असतानाच अपेक्षित चांगले बदल होतील. पैशांची सोय होईल. मनुष्यबळही मिळेल. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून तुमचे मत मांडा. नवीन नोकरीच्या कामातील अडथळे दूर होतील. घरात सबुरीचे धोरण ठेवलेत तर काही मार्ग निघेल. मुलांकडून चांगली वार्ता कळेल. प्रकृतीमान उत्तम राहील. सकारात्मक भावना जागृत होईल. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये योग्य मार्गदर्शन मिळेल.

कुंभ – मनःस्थास्थ जपलेत तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात प्रत्येक काम स्वतःच्या पद्धतीने हाताळण्याचा अट्टाहास करू नका. कामाच्या कार्यपद्धतीत फेरफार करून ती सुटसुटीत करण्याचा प्रयत्न राहील. अपेक्षित पैसे वेळेवर हातात न पडल्याने तात्पुरती पैशांची सोय करावी लागेल. नोकरीत शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवा. गैरसमजुतीने होणारे वाद टाळा. घरात आवडत्या व्यक्तींच्या सहवासाने ताण कमी होईल. महिलांची धावपळ, दगदग बरीच कमी होईल व शांत चित्ताने प्रत्येक गोष्टीचा रस घेता येईल. 

मीन – अस्थिरता कमी होऊन वातावरण शांत होईल. व्यवसायात महत्त्वाच्या प्रश्नांना महत्त्व देऊन कामे मार्गी लावाल. कामात शिथिलता येऊ न देता कामाची आखणी करून ती वेळेत पूर्ण कराल. नोकरीत वरिष्ठांनी कितीही तगादा लावला, तरी स्वतःच्या मतानुसार कामे कराल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. घरात मनःस्वास्थ अनुभवता येईल. तरुणांचे विवाह ठरतील. पूर्वी बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल. विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल. 

संबंधित बातम्या