ग्रहमान ः २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२०

अनिता केळकर 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

ग्रहमान ः २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२०

मेष
व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. यशाची कमान वाढत जाईल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत वेळेचे भान ठेवून कामे करावीत. वरिष्ठांच्या सल्ल्याचा मान राखावा. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांचा कामाचा उरक दांडगा राहील. हौसेमौजेखातर खर्च कराल. विद्यार्थ्यांना उत्तम एकाग्रता साधता येईल. 

वृषभ 
शुभग्रहांची साथ लाभल्याने कामात विस्तार करून फायदा मिळवाल. व्यवसायात ओळखीमुळे नवीन कामे मिळतील. संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. नोकरीत नवीन अनुभव घ्याल. अनपेक्षितपणे चांगली कामे होतील. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. नोकरदार महिलांच्या मनोबल वाढवणाऱ्या प्रिय घटना घडतील. घरातील कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. 

मिथुन 
पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून विशेष लाभ होईल. व्यवसायात कामांना वेग येईल. जुनी येणी वसूल होतील. नोकरदार व्यक्तींनी बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. बेरोजगार व्यक्तींना कामधंदा मिळेल. महिलांनी संयमाने वागून कामे करावीत. प्रियजनांच्या भेटीने आनंद वाढेल. नवीन खरेदीचे बेत ठरतील. प्रकृतिमान सुधारेल. विद्यार्थ्यांना विचारांची योग्य दिशा मिळेल. 

कर्क 
‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात दुर्लक्षित कामांकडे लक्ष देऊन कामे कराल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. आर्थिक आवक वाढेल. नोकरीत पूर्वीच्या चुका दुरुस्त करण्याची संधी वरिष्ठ देतील. सहकारी कामात मदत करतील ही अपेक्षा ठेवू नये. कामात गुप्तता राखावी. महिलांनी अनावश्यक खर्च टाळावेत. झेपेल तेवढेच काम करून विश्रांती घ्यावी. विद्यार्थ्यांनी धांदरटपणा कमी करावा. 

सिंह 
हाती घ्याल ते तडीस न्याल. व्यवसायात आव्हाने स्वीकारून कामे कराल. बँका व हितचिंतकांच्या मदतीने पैशाची सोय होईल. आत्मविश्‍वास दांडगा राहील. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा अधिकार व सवलती देतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांनी घरातील प्रश्‍न सामंजस्याने सोडवावेत. रागांवर नियंत्रण ठेवावे. एखादी सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. 

कन्या 
मनोबल वाढेल. त्यामुळे व्यवसायात धडाडीने पुढे जाल. आर्थिक गुंतवणूक अचूक कराल. कामाचे व वेळेचे योग्य नियोजन फायदेशीर ठरेल. नोकरीत रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. अपेक्षित पत्रव्यवहारांना चालना मिळेल. नवीन ओळखीचा चांगला उपयोग होईल. घरातील ताणतणावातून महिलांची सुटका होईल. आवडत्या छंदात मन रमविता येईल. तरुणांचे विवाह जमतील. खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. 

तूळ 
व्यवसायात कर्तव्यदक्ष राहाल. कामात बदल करून फायद्याचे प्रमाण वाढवाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. जोडधंद्यात विशेष लाभ होतील. महिलांना कलागुण दाखवता येतील. वातावरण आनंदी राहील. कुटुंबासमवेत आनंदाचे क्षण साजरे कराल. विद्यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे. 

वृश्‍चिक 
स्वप्ने साकार झाल्यामुळे आनंद द्विगुणित होईल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नवीन कार्यक्षेत्र निवडाल. नोकरीत नवीन आव्हाने स्वीकारून तीत यश मिळवाल. इतरांना कामात मदत कराल. परदेशगमन व परदेशव्यवहार पूर्ण होतील. महिलांचा गृहव्यवस्थापनात बराच पैसा खर्च होईल. आध्यात्मिक प्रगती करू शकाल. कलाकार, खेळाडूंना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान. 

धनू 
ग्रहमानाची साथ आहेच तरी निर्धाराने कामाला लागा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे हाती घ्यावीत. व्यवसायात प्रत्येक कामात यश संपादन कराल. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने मनासारखा खर्च करू शकाल. नोकरीत सरकारी कामे गती घेतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील. महिलांना कामामुळे दगदग होईल. विश्रांती घ्यावीशी वाटेल. सभोवतालच्या व्यक्तींबाबत नवीन अनुभव येतील. विद्यार्थ्यांना कष्टाचे फळ चांगले मिळेल. 

मकर 
 व्यवसायात कामाचे समाधान मिळेल. कामांना वेग येईल. नवीन दिशा सापडेल. तुमचा हुरुप व उत्साह वाढेल. नोकरीत अनपेक्षित लाभाची शक्यता. इतरांचे सहकार्य कसे मिळवता यावर यश अवलंबून राहील. नोकरदार महिलांनी दगदग कमी करावी. महिलांनी घरात आपली हेकेखोरवृत्ती ठेवू नये. चिडचिड कमी करावी. बेफिकीर वागू नये. विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्‍वास टाळावा. 

कुंभ 
काळाबरोबर राहून बदल केलात तर व्यवसायात यश संपादू शकाल. व्यवसायात सुसंवाद साधून कामे करण्यावर भर राहील. नवीन ओळखीचा चांगला उपयोग होईल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत अधिकाराचा योग्य वापर कराल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. प्रवासयोग संभवतो. महिलांना मनःस्वास्थ्य जपता येईल. नवीन खरेदीचा मोह होईल. विद्यार्थ्यांना उजळणीची संधी मिळेल. 

मीन 
अत्यंत धोरणी राहून प्रत्येक कृती कराल. व्यवसायात कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक ठेवाल. कामात चोखंदळ राहाल. नोकरीत तुमची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामातील बेत गुप्त ठेवावा. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मिळालेल्या  संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. महिलांनी सहनशीलता बाळगून कामे करावीत. आरोग्यास जपावे. विद्यार्थ्यांना स्पृहणीय यश मिळेल.

संबंधित बातम्या