ग्रहमान : २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर

अनिता केळकर
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

ग्रहमान : २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर

मेष
मनाची उमेद चांगली राहील. व्यवसायात सुसंवाद साधून काम करण्यावर भर राहील. नोकरीत कामानिमित्ताने ओळखी होतील. प्रवास घडेल. बेरोजगारांना कामधंदा मिळेल. महिलांचा कामात वेळ जाईल. सामुहिक कामात पुढाकार राहील. नवीन  खरेदीचे मनसुबे आखाल. प्रकृतीची कुरकूर कमी होईल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल.

वृषभ
ग्रहांची साथ मिळेल. नवीन योजना हाती घ्याल. व्यवसायात पूर्वीच्या अनुभवांचा चांगला उपयोग होईल. नोकरीत अधिकार व सवलतीची सुविधा मिळेल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. महिलांचा वेळ सत्कारणी लागेल. आनंदाची बातमी कळेल. प्रकृतीमान सुधारेल. तरुणांचा आत्मविश्‍वास बळावेल.

मिथुन
तडजोडीचे  धोरण अवलंबले तर विशेष लाभ होईल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन राहील. रागावर नियंत्रण ठेवलेत तर तुमचाच फायदा होईल. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागेल. टोकाचा निर्णय घेऊ नका. मतप्रदर्शन टाळा. महिलांनी संघर्ष व वाद टाळणे हितावह ठरेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.

कर्क
नवीन जबाबदाऱ्या घेऊन त्यात यश मिळवाल. येणी वसुल होतील. नोकरीत कामाचा झपाटा राहील. प्रवास घडेल. बेरोजगार व्यक्तींना कामधंदा मिळेल. स्वतःचे काम पूर्ण करून इतरांनाही कामात मदत कराल. महिलांना मनाप्रमाणे वागण्याची संधी मिळेल. विचारांची देवाणघेवाण करता येईल. आध्यात्मिक प्रगती साधता येईल.

सिंह
एकमेका साहाय्य करू असे धोरण राहील. व्यवसायातील प्रश्‍न सामंजस्याने सोडवाल. विस्ताराचे बेत सफल होतील. नोकरीत लवचिक धोरण राहील. वरिष्ठांच्या तुमचेकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. महिलांना गृहसौख्याचा आनंद घेता येईल. प्रियजन, आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करता येईल.

कन्या
विनय व शालीनता अंगी बाळगून सभोवतालच्या व्यक्तींना आपलेसे करून घ्याल. व्यवसायात घेतलेले निर्णय अचूक ठरतील. नोकरीत मिळालेल्या संधीचा व वेळेचा योग्य उपयोग करून घ्यावा. महत्त्वाची मागे मार्गी लागतील. महिलांना केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. मनाजोगते  
वागता येईल. ध्येयपूर्ती होईल.

तूळ
तुमच्या मूडी व हट्टी स्वभावाला लगाम घालून व्यवसायात लक्ष घालावे. संयमाने वागून प्रश्‍न मार्गी लावावेत. नोकरीत प्रयत्नात सातत्य ठेवावे. तणाव कमी करण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहावे. महिलांचा उत्साह वाढेल. भावनेच्या भरात जादाची कामे कराल. अंथरूण पाहून पाय पसरा. मुलांकडून सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना प्रगतिकारक सप्ताह.

वृश्‍चिक
व्यवसायात इतरांना कठीण वाटणार्‍या कामात यश संपादन कराल. केलेल्या कामाची शाबासकीही मिळवाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कामात बदल होण्याची शक्यता. जोडधंद्यातून विशेष लाभ. महिलांना नवीन खरेदीचा आनंद मिळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. प्रकृतीमान सुधारेल.

धनु
तुमच्या स्वच्छंदी स्वभावाची चुणूक दिसेल. मनातील सुप्त इच्छा आकांक्षा साकाराल. आर्थिक चिंता मिटेल. नोकरीत महत्त्वाचे पत्रव्यवहार  होतील. नवीन ओळखीतून  लाभ. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. महिलांनी अनावश्यक खर्चावर बंधन ठेवावे. कामाची विभागणी करून देखरेख करावी. कुटुंबासमवेत सहलीला जाण्याचे बेत आखाल. विद्यार्थ्यांनी चिंतन व मनन करावे.

मकर
प्रत्येक गोष्टीत नफा तोटा न बघता कामाचे महत्त्व ओळखून प्राधान्य दया. आर्थिक लाभ होतील. नोकरीत तुमची मते वरिष्ठांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. दगदग धावपळ कमी करा. कामात सहकारी मदत करतील. महिलांनी कामाचे वेळी काम करून इतर वेळी आराम करावा. विनाकारण कामे ओढवून घेऊ नयेत. तरुणांनी संयमाने वागावे.

कुंभ
तुमच्या धीरगंभीर व विचारी स्वभावाचे दर्शन घडवाल. व्यवसायात हातातील कामांना प्राधान्य द्याल मगच नवीन कामांकडे वळाल. नोकरीत वेळ व कृती यांची योग्य सांगड घालून कामांना गती  द्याल. कमीत कमी चुका करून प्रगती साधाल. महिलांनी न चिडता खुबीने सभोवतालच्या व्यक्तींकडून कामे करवून घ्यावीत. कामात गुप्तता राखावी. निराशावादी दृष्टिकोन बाजूला ठेवून प्रगती करावी.

मीन
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कृती कराल. नाचरेपणा कमी करून कामांवर लक्ष केंद्रित कराल. व्यवसायात कामाचा व्याप  वाढेल. अधिक गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. नोकरीत हलके कान न ठेवता तारतम्य बाळगावे. वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नये. विसंबून न राहता कामे करावीत. महिलांनी पैशाची काळजी करू नये. अवाजवी खर्चावर नियंत्रण ठेवावे. नवीन खरेदीचा मोह होईल.

संबंधित बातम्या