ग्रहमान : १२ ते १८ डिसेंबर २०२०

अनिता केळकर
सोमवार, 14 डिसेंबर 2020

ग्रहमान : १२ ते १८ डिसेंबर २०२०

मेष
व्यवसायात  केलेल्या कष्टाचे चीज होईल. पैशाची चिंता मिटेल. मान व प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत हितशत्रुंपासून सावध रहा. कामात गुप्तता राखा. वरिष्ठ व सहकार्‍यांची मदत मिळेल. महिलांना मनाप्रमाणे खर्च करता येईल. मनाजोगत्या गोष्टी घडतील. मुलांकडून चांगली वार्ता कळेल. प्रकृतीमान सुधारेल.

वृषभ
कामाचे वेळी काम करून इतर वेळी आराम कराल. व्यवसायात कामात दक्ष रहा. हातून चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. तडजोडीचे धोरण आवश्यक असल्यास स्वीकारा. नोकरीत आपलेच म्हणणे खरे करू नका. खर्चावर बंधन ठेवा. अतिहव्यासापोटी वाईट मार्ग स्वीकारू नका. महिलांनी खाण्यापिण्याबाबत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे.

मिथुन
अपेक्षित लाभ होईल. व्यवसायात कामाचा ताण वाढेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत प्रतिष्ठा सांभाळून वागा. कामात गुप्तता राखा. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करावे. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी. कार्य वेग साधून स्वास्थ्याचा आनंद घ्यावा.

कर्क
व्यवसायात नवीन जबाबदारी स्वीकाराल. नवीन कामाची संधी चालून येईल. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. नोकरीत सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा. कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रवास घडेल. महिलांचे आरोग्य उत्तम राहील. जिभेचे चोचले पुरवाल. सुवार्ता कळेल.

सिंह
अंथरूण पाहून पाय पसरा. व्यवसायात आपल्या ताकदीचा नीट अंदाज घेऊन पावले टाका. अन्यथा प्रयत्न निष्फळ ठरतील. नोकरीत बेफिकीर वृत्ती त्रासदायक ठरेल. बोलण्या वागण्याचे  तंत्र सांभाळा. महिलांनी अतिविश्‍वास टाळावा. मनन व चिंतन करावे. पैशाचा दुरुपयोग होणार नाही. याकडे लक्ष दयावे.  प्रियजन, आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.

कन्या
कार्यसिद्धी करण्यासाठी झपाटा राहील. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरदार लोकांनी आपली जबाबदारी यथासांग पार पाडावी. अपेक्षा ठेवू नये. पैशाचे व्यवहारात चोखंदळ  राहावे. बेकार व्यक्तींना कामधंदा मिळावा. घरात महिलांनी मनावर ताबा ठेवावा. शब्दाने शब्द वाढवू नये. आवडत्या छंदात वेळ घालवावा.

तूळ
व्यवसायात प्रगती करण्यासाठी ठोस पावले उचलाल. आवश्यक असल्यास बदल कराल. वादाचे प्रसंग बाजूला ठेवून कामांना प्राधान्य द्याल. नोकरीत जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. सरकारी कामात यश येईल. घरात महिलांना स्वप्नपूर्तीचा आनंद मिळेल. पैशाची चिंता मिटेल. प्रकृतीची कुरबूर राहील. तरी वेळीच लक्ष द्या.

वृश्‍चिक
हाती घेतलेल्या कामात यश मिळाल्याने आनंद द्विगुणित होईल. व्यवसायात ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. महत्त्व वाढेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांना कौटुंबिक सुख मिळेल. आनंदवार्ता कळतील. तरुणांचे विवाह ठरतील. मानसिक शांतता मिळेल.

धनू
“मन चिंती ते वैरी न चिंती” या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात झालेल्या गैरसमजुतीमुळे मनस्ताप होईल. नवीन कामे दृष्टीक्षेपात असतील परंतु सुरू होण्यास विलंब होईल. नोकरीत प्रवास योग्य संभवतो. मतभेद होतील त्यामुळे शांत रहा. कामे चोख पूर्ण करा. महिलांनी झेपेल तेवढेच काम करावे. विसंबून राहू नये. अतिविश्‍वास टाळा.

मकर
स्वकष्टाने कामे पूर्ण कराल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. व्यवसायात तडजोड करून कामे मार्गी लावाल. पैशाचे व्यवहारात गाफील राहू नका. नोकरीत सहकार्याची अपेक्षा न ठेवता कामाचा उरक पाडा. “मौनं सर्वार्थ साधनम्” याचा  विशेष लाभ होईल. अनपेक्षित लाभ घडेल. महिलांना सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. प्रकृतीमान चांगले राहील.

कुंभ
अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. त्याचा फायदा घ्या. व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. नवीन कामे मिळतील. हाती घेतलेल्या कामांना मूर्त स्वरूप येईल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत कष्टाची तयारी असेल तर कमाई चांगली होईल. चांगली बातमी कळेल. वरिष्ठांची मर्जी तुमचेवर असेल. नवीन ओळखी होतील. महिलांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कृतीशील राहावे. अतिविश्‍वास टाळावा.

मीन
नाचरेपणा कमी करून सत्य पडताळावे. जशास तसे धोरण स्वीकारून वागावे. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. पैशाचे बजेट आखून कामे हाती घ्या. वेळेचे बंधन पाळा. नोकरीत आडमुठे धोरण त्रासदायक ठरेल. अनोळखी व्यक्तींचा सहवास लाभेल. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. आध्यात्मिक मार्गक्रमणा कराल. मनःशांती मिळेल. प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. 

संबंधित बातम्या