२० ते २६ फेब्रुवारी २०२१

अनिता केळकर
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

२० ते २६ फेब्रुवारी २०२१

मेष
कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करण्यावर भर राहील. मानसिक समाधान लाभेल. व्यवसायात महत्त्वाची कामे हाती घ्याल. कामामुळे धावपळ वाढेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत कंटाळवाणे काम संपेल. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याकडे कल राहील. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या. घरात ‘माझे तेच खरे’ हा अट्टहास सोडा. सलोख्याचे वातावरण राहील.

वृषभ 
जीवनाचा आस्वाद घेण्याची ऊर्मी उफाळून येईल, पण थोडी सबुरी ठेवा. व्यवसायात कर्तव्यपूर्तीला प्राधान्य द्या. नवीन करार करण्यापूर्वी त्याचा भविष्यात काय परिणाम होईल याचा अंदाज घ्या. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. तसेच बदल करावासा वाटेल पण असे निर्णय घाईने घेऊ नका. नवीन नोकरीत थोडा धीर धरावा.

मिथुन
आशावादी दृष्टिकोन ठेवून कामाची आखणी करा. व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून कामे हाती घ्या. उधार उसनवार शक्यतो टाळा. पूर्वी केलेल्या कामाचे आर्थिक स्वरूपात श्रेय मिळेल. कामामुळे मान व प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम केलेत तर समाधान मिळेल. पैशाच्या मोहापासून लांब राहिलात तर त्रास होणार नाही. कामात गुप्तता राखलीत तर लाभ तुमचाच होईल.

कर्क 
मनाला जे योग्य वाटेल तोच निर्णय घ्याल. व्यवसायात काही ठोस निर्णय घेऊन कार्यवाही कराल. आर्थिक सुधारणा करण्याकडे कल राहील. विचार व कृती यांची योग्य सांगड घालून कामे हातावेगळी कराल. नोकरीत हितशत्रूंपासून सावध रहा. कामात दक्ष रहा. तुमच्या स्पष्ट बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. घरात वादाचे प्रसंग टाळा. सामंजस्याने प्रश्नांची उकल करा. 

सिंह
तुमचा आत्मविश्‍वास उत्तम असल्याने तुम्ही पुढाकार घेऊन कामे कराल. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. त्यामुळे उडी मात्र नको. कामाबाबतीत कोणी डिवचले तर ते तुम्हाला सहन होणार नाही. तुमच्या वागण्या बोलण्याने हितसंबंध बिघडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. नोकरीत वरिष्ठांशी मनातील बेत व्यक्त करा. सुसंवाद चांगला ठेवा. सहकाऱ्यांकडून खुशीने काम करून घ्याल. घरात अपेक्षित प्रगती होईल.

कन्या
ग्रहमानाची साथ राहील त्यामुळे सुखाने श्‍वास घेऊ शकाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम व्यवसायावर जाणवेल. पैशाची बाजू समाधानकारक राहील. कामानिमित्ताने प्रवासयोग. नोकरीत तुम्ही तुमचे धोरण लवचिक ठेवलेत तर त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. वरिष्ठ तुमच्या कामाच्या पद्धतीत व स्वरूपात फेरबदल करतील.

तूळ
एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याकडे कल राहील. त्यामुळे नेमके कशाला प्राधान्य द्यायचे असा थोडा संभ्रम होईल. व्यवसायात भावनावेग आवरा व कर्तव्याला प्राधान्य देऊन तसेच व्यवहारी दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावेत. क्षमतेपेक्षा जास्त धोका कामात पत्करू नका. पैशाची क्षमता व तांत्रिक अडथळ्यांचा विचार करून नवीन गुंतवणूक करा. घरात आहे त्यात समाधानी राहावे.

वृश्‍चिक
बदलत्या ग्रहमानामुळे तुम्हाला तुमचे निर्णय परिस्थितीनुरूप बदलावे लागतील. व्यवसायात, कामात स्वयंसिद्ध राहून कामे संपवावी लागतील. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करावी लागतील. नोकरीत वरिष्ठांचा मानापमान सांभाळून कामे करावीत. सहकाऱ्यांकडून घेतलेल्या मदतीची परतफेड करावी लागेल. जमतील तेवढीच कामे करा. घरात रागावर नियंत्रण ठेवून बोलताना शब्द जपून वापरा.

धनू
व्यवसायात आश्वासने देताना आपली क्षमता ओळखून सावधगिरीने आश्वासन द्या व ते पाळा. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत कोणावरही विसंबून राहू नका. नवीन हितसंबंध जोडताना त्या व्यक्तीची विश्वासार्हता पडताळून बघा. घरात अतिविचार न करता कृतीवर भर राहील. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण पडेल.

मकर
कामात विनाकारण झालेली धावपळ दगदग कमी होईल. कामातील त्रुटी भरून निघतील. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. अनपेक्षित खर्च होईल. नोकरीत वरिष्ठांचे दुटप्पी धोरण तुम्हाला बुचकळ्यात टाकेल. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश येईल. घरात टाळता न येणारे खर्च होतील. पैशाची तजवीज करून ठेवावी लागेल.

कुंभ
अतिविचार न करता बेधडक निर्णय घेण्याकडे कल राहील. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी ठोस उपाय कराल. कमी श्रमात जास्त यश मिळवाल. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. अचूक पारख करून कामे मिळवाल. कामात सुधारणा होईल. घरात तणावाचे वातावरण कमी होईल.

मीन
सभोवतालच्या व्यक्तींचा नवीन अनुभव घ्याल. व्यवसायात कामात प्रगती असली तरी फायदा मिळायला वेळ लागेल. पैशाची थोडी चणचण भासेल. मनाला पटेल रूचेल तीच कामे करा. नोकरीत नको त्या कामात वेळ जाईल. जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. कामानिमित्ताने प्रवासयोग. घरात तुम्ही तुमचे विचार परखडपणे मांडाल. ‘शब्द हे शस्त्र आहे’ हे लक्षात ठेवा. मतलबी व्यक्तींपासून चार हात लांब रहा.

संबंधित बातम्या