ग्रहमान : ११ ते १७ सप्टेंबर २०२१

अनिता केळकर
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

ग्रहमान : ११ ते १७ सप्टेंबर २०२१

मेष 
मानसिक आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ मानून कामे कराल. यशाची कमान उंचावेल. नोकरीत ओळखीचा उपयोग होईल. अपेक्षित पत्रे हाती येतील. महिलांना चांगली बातमी कळेल. सणासुदीच्या निमित्ताने नवीन खरेदी कराल. कलाकार, खेळाडूंना मानमरातब, प्रसिद्धी मिळेल. प्रियजनांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. कुटुंबासमवेत सहजीवनाचा आनंद घ्याल.

वृषभ 
योग्य वेळी घेतलेले निर्णय व्यवसायात फायदा मिळवून देतील. नवीन कामे मिळतील. स्वतःची क्षमता ओळखून पुढे जा. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा आला असेल तर छोटी सहल काढा. आवडत्या छंदात वेळ रमवाल. महिलांनी अनावश्यक खर्च करू नयेत. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण घेऊ नये. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान.

मिथुन 
व्यवसायात नोकरीत प्रगती होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. अतिस्पष्टवक्तेपणामुळे त्रास होण्याची शक्यता. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. परदेशगमनाचे योग येतील. महिलांना प्रियजन व आप्तेष्ट यांच्या सहवासाने आनंद मिळेल. सुवार्ता कळेल. नवीन घराचे स्वप्न साकार होईल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान. नवीन जागा, वास्तू खरेदी कराल.

कर्क 
कामाची योग्य आखणी केल्याने यश संपादन कराल. अर्धवट राहिलेली कामे गती घेतील. व्यवसायात विस्ताराच्या कल्पना फलद्रूप होतील. नोकरीत वरिष्ठांना तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व कळून येईल. कौतुकास पात्र असे काम हातून घडेल. अनपेक्षित लाभ होतील. घरकामात महिलांचा वेळ मजेत जाईल. नवीन खरेदी होईल. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात दिरंगाई करू नये.

सिंह 
महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत तेव्हा तुमचा उत्साह वाढता राहील. व्यवसायात बदल करून फायदा मिळवून देणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी येतील. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाची कामे तुमच्यावर सोपवतील. त्यात यशश्री संपादन कराल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांचा वेळ पाहुण्यांच्या दिमतीत जाईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या 
व्यवसायात /स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क राहावे लागेल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे हाताळा. कामात गरजेप्रमाणे लवचिक धोरण ठेवा. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करा. मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करून घ्या. कामानिमित्ताने  प्रवास घडेल. महिला गृहसजावटीसाठी पैसे खर्च करतील. मनाप्रमाणे कामे झाल्याने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

तूळ 
व्यवसायात अनपेक्षित पण चांगले बदल होतील. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. आर्थिक प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. महिलांचा वेळ नको त्या कामात जाईल. तरुणांनी अतिसाहस टाळावे.

वृश्‍चिक 
व्यवसाय वृद्धिंगत होण्यास अनुकूल काळ आहे. कामात बदल करून फायदा मिळविण्याकडे कल राहील. नवीन घडामोडी व नवीन विचार फायदेशीर ठरतील. नोकरीत मनातील सुप्त इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सहकारी कामात मदत करतील. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. जादा कामातून पैसे मिळतील. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. अलिप्त धोरण ठेवून कामे उरकावीत. विद्यार्थ्यांनी नाचरेपणा करू नये.

धनू 
‘प्रयत्नांती परमेश्‍वर’ हा तुमचा बाणा असेल. व्यवसायात नवीन उत्पन्नाचे साधन मिळाल्याने आनंद वाटेल. पूर्वी केलेल्या कामातून आता फायदा मिळेल. कामात कार्यतत्पर राहिल्यास फायदा होईल. नोकरीत तुमच्या अंगी असलेले कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. उच्च शिक्षणासाठी परदेशगमनास चांगला काळ. महिलांनी हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे. राग आवरावा.

मकर 
मनाची झालेली द्विधा मनःस्थिती बरीचशी कमी होईल. व्यवसायात शेअरमधून फायदा होईल. नवीन कामे मिळतील. नवीन आशावाद जागृत होईल. चांगली बातमी कळेल. नोकरीत महत्त्वाची कामे हातावेगळी करा. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. नवीन महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. जोडधंद्यातून फायदा होईल. महिलांनी अतिहव्यासापोटी जादाची कामे स्वीकारू नयेत.

कुंभ 
 ग्रहमान हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे कामाचा उत्साह दिवसेंदिवस वाढेल. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. अनपेक्षित कामे होतील. कामात विस्तार करण्याचे बेत सफल होतील. नोकरीत कमी श्रमात जास्त यश संपादन करू शकाल. बेकारांना नवीन नोकरीची संधी. कलाकार खेळाडूंना मानमरातब मिळेल. महिलांची अध्यात्मात प्रगती होईल.

मीन 
तुमच्या रसिक व कल्पक स्वभावाला पूरक ग्रहमान लाभल्याने जीवनाचा आनंद पुरेपूर लुटाल. कामातील अडथळे दूर झाल्याने व्यवसायात कामांना गती येईल. खेळत्या भांडवलाची गरज हितचिंतकाच्या मदतीने भागेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात असतील. नोकरदार व्यक्तींना मनाप्रमाणे कामे केल्याने आनंद मिळेल. कामाचे वेळी काम व इतर वेळी आराम मिळेल. एखादी सवलतही वरिष्ठ देतील.

संबंधित बातम्या