ग्रहमान ः २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१

अनिता केळकर
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

ग्रहमान ः २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१

मेष 
व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामे स्वीकारताना स्वतःची पात्रता ओळखून पुढे जा. अपेक्षित पत्रे हाती येतील. बौद्धिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल. महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मूड लागेल. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यास करावा.

वृषभ 
आर्थिक बाबतीत तुम्ही अत्यंत दक्ष असता, तेव्हा कामाचे योग्य नियोजन करून उलाढाल वाढवाल. व्यवसायात जुनी येणी वसुलीकडे लक्ष केंद्रित कराल. फायदा मिळवून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्याल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. महिलांच्या मनाप्रमाणे कामे होतील. कलावंत, लेखक यांना प्रसिद्धीचे योग.

मिथुन 
पैसा मिळाला तरी खर्चही तसाच राहील. व्यवसायात बदल करून विस्तार कराल. नवीन कामे मिळतील. स्वभाव आनंदी राहील. नोकरदार व्यक्तींच्या मनात व्यवसायाचा विचार येईल. वरिष्ठांनी दिलेली कामे व्यवस्थित पार पाडाल. महिलांना कामाचा मनस्वी कंटाळा येईल. वृद्ध व्यक्तींमध्ये वैराग्य निर्माण होईल. तरुणांनी तूर्तास लग्नाची घाई करू नये.

कर्क 
व्यवसाय /धंदा वृद्धिंगत होण्यासाठी काही ठोस पावले उचलाल. पूर्वी केलेल्या कामातून पैसे मिळतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. वरिष्ठांच्या विश्‍वासास पात्र ठराल. महिलांचा दिनक्रम धावपळीचा जाईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल.

सिंह 
ग्रहमानाची साथ लाभल्याने मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसायात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. ओळखीचा उपयोग होईल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व वाढेल. सर्वांच्या कौतुकास पात्र असे काम हातून घडेल. महिलांची अध्यात्मात प्रगती होईल. अचानक धनलाभाची शक्यता. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांनी मनोनिग्रह करावा.

कन्या 
या सप्ताहात उत्साह वाढता राहील. व्यवसायात विस्ताराचे बेत मनात घोळतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिकीकरण कराल. नोकरदार व्यक्तींना नवीन अनुभव येतील. वरिष्ठांच्या विक्षिप्त व चमत्कारिक स्वभावामुळे त्रास संभवतो. घरात आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीगाठीमुळे आनंद मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. महिलांना वैवाहिक सुख चांगले मिळेल.

तूळ 
व्यवसायात खेळत्या भांडवलाची आवश्यकता लाभेल. त्यासाठी बँका व हितचिंतकांची मदत घ्याल. कामात बिनचूक राहून कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यवहारचातुर्याने काही क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीत कामाचा बोजा वाढेल. दगदग धावपळ कराल. जादा कामातून पैसे मिळवता येतील. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

वृश्‍चिक 
ग्रहमानाची अनुकूलता लाभल्याने कामातील आत्मविश्‍वास बळावेल. व्यवसायात यांत्रिक क्षेत्रात उत्तम प्रगती होईल. धंदा उत्तम चालून पैसाही मिळेल. नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. महिलांचा वेळ गृहसजावट व गृहखरेदीत जाईल. सूचक स्वप्ने पडतील. नवविवाहितांना अपत्यसुखाची चाहूल लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत काळजी घ्यावी.

धनु 
आर्थिक लाभ अनेक तऱ्हेने होतील. बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आशा सोडून दिलेल्या कामात प्रगती होईल. व्यवसाय वृद्धिंगत होण्यास अनुकूल ग्रहमान नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून सवलती व अधिकार मिळतील. मात्र त्याचा गैरवापर करू नये. जादा कामातून पैसे मिळतील. महिलांनी तडजोडीचा अवलंब करून कामे उरकावीत. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्यावे.

मकर 
व्यवसायात कामाचे नियोजन करून कामे मार्गी लावाल. नवीन कामे मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. शेअर, जमीन खरेदी-विक्री यातून लाभ होण्याची शक्यता. नोकरीत गोड बोलून सहकाऱ्यांकडून कामे करून घ्याल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून इतरांशी संबंध प्रस्थापित कराल. उधार उसनवार बंद कराल. महिलांचा नवीन आशावाद जागृत होईल.

कुंभ 
व्यवसायात बदल करून वाढविण्याकडे कल राहील. आर्थिक बाजू सशक्त असण्यासाठी तात्पुरत्या कर्जाची सोय कराल. कार्यतत्पर राहून कामे मार्गी लावाल. नोकरीत सहकारी व वरिष्ठांशी जमवून घ्यावे लागेल. जोडधंद्यातून विशेष कमाई करता येईल. उच्च शिक्षणासाठी परदेशगमनास योग्य काळ. लेखक, कलावंत, साहित्यिक यांना प्रसिद्धी मिळेल.

मीन 
तुमच्या हरहुन्नरी स्वभावात पूरक ग्रहमान लाभेल. त्यामुळे तुम्ही काहीसे विलासी बनाल. व्यवसायात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. पैसे मिळतील, तेवढेच खर्चही होतील. बेकारांना नवीन नोकरीची संधी येईल. नोकरदार व्यक्तींना मनाप्रमाणे कामे केल्याचे समाधान मिळेल. पगारवाढ व बदल होण्याची शक्यता. महिला नव्या घराचे स्वप्न साकारू शकतील. वैवाहिक सुख उत्तम राहील.

संबंधित बातम्या