९ ते १५ ऑक्टोबर २०२१

अनिता केळकर
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

९ ते १५ ऑक्टोबर २०२१

मेष 
ग्रहांची साथ मिळेल. आर्थिक सुधारणा होईल. व्यवसायात तुम्ही तुमच्या निर्णयाशी ठाम राहाल. इतरांना तुमची एखादी कल्पना परवडली/ पटली नाही तरीही त्याच कल्पनेचा तुम्ही पाठपुरावा कराल. नोकरीत प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुमचे प्रयत्न राहतील. कामात शॉर्टकट घेऊन काम संपवाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास होईल. घरात इतरांशी मिळतेजुळते घ्या नाहीतर खटके उडतील.

वृषभ 
योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. व्यवसायात प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब कराल. कामामुळे सभोवतालचे वर्तुळही बदलेल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती आल्याने पैशाची नड भागेल. खेळत्या भांडवलाची सोयही होईल. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर असेल. त्यामुळे कामाचा व्याप वाढेल. अधिकारही प्राप्त होईल. घरात अत्यावश्यक खरेदी होईल.

मिथुन 
परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्या ध्येयधोरणात बदल केलात तर त्याचा लाभ होईल. व्यवसायात पैशाची चणचण जाणवली तरी तात्पुरती पैशाची सोय होईल. वायफळ खर्चावर बंधन ठेवा. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत नवीन करार होतील. काही ठोस निर्णय घेता येतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश येईल. कामाचा ताण कमी होईल. घरात वातावरण आनंदी राहील.

कर्क 
पैशाची आवक जावक समसमान राहील. व्यवसायात जी कामे हाती घेतली होती त्यांना वेग येईल. आर्थिक स्थिती बरी राहील. विशिष्ट कामासाठी जोडलेले संबंध संपुष्टात येतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. परंतु न रागावता काम करीत रहा. घरात तरुणांना विवाहासंबंधीचे निर्णय घेणे कठीण होईल. थोडी सबुरी ठेवा. भावनिक चढउतार / वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.
 

सिंह 
आशावादी दृष्टिकोन ठेवून प्रत्येक काम हाती घ्याल. व्यवसायात कंटाळवाणे काम संपल्याने हायसे वाटेल. रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरीत गरजेनुसार वेगळे काम हाताळण्याची संधी मिळेल. जोडधंदा असणाऱ्यांना अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रतिष्ठा मिळेल. तरुणांना नवीन मित्रमंडळींचे आकर्षण वाटेल. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत ठरतील. महिलांना अंगी असलेले गुण दाखवण्याची संधी मिळेल.

कन्या 
अंथरूण पाहून पाय पसरा. व्यवसायात नवीन योजनांना मूर्त स्वरूप देता येईल. नवीन कामे मिळतील. त्यामुळे जादा भांडवलाची उभारणी करावी लागेल. पैशाची सोय होईल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांनी त्या दृष्टीने वाटचाल करावी. बोलण्याने जवळची माणसे दुरावण्याची शक्यता आहे. घरात लांबलेले कार्य ठरेल. तरुणांनी मिळणाऱ्या संधीचा फायदा उठवावा.

तूळ 
आर्थिक स्थैर्य व दिलासा देणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात कामे नियंत्रणात ठेवण्यात यश येईल. सरकारी कामात सुधारणा होईल. नवीन व्यक्तींशी हितसंबंध जोडले जातील. नोकरीत कंटाळवाणे काम संपेल. कामानिमित्ताने परदेशगमनाचा मानस राहील. मनाजोगता खर्च करता येईल. घरात नवीन जागा खरेदीसंबंधीचा निर्णय होईल. आप्तेष्टांच्या सहवासाने आनंद वाटेल.

वृश्‍चिक 
कामांवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यावर तुमचा भर राहील. व्यवसायात योग्य व्यक्तींशी संपर्क साधून कामे मार्गी लावाल. सण व उत्सवानिमित्ताने नवीन योजना आखून विक्री व उलाढाल वाढवाल. नोकरीत नवीन कामाची सुरुवात होईल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. तुमच्यावर वरिष्ठांची मर्जी राहील. अपेक्षित पैसे मिळतील. घरात नवीन जागा, वास्तू खरेदीचा विचार विनिमय होईल.

धनु
वेळेचे व कामाचे योग्य नियोजन करून प्रगती करण्याचा मानस असेल. त्यात यश मिळेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. खेळते भांडवल उभारणीसाठी बँक व वित्तीय संस्था आदींची मदत होईल. नोकरीत महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. स्वतः लक्ष घालून कामे पूर्ण कराल. सहकारी कामात मदत करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील.

मकर 
विश्‍वासार्हता पडताळून इतरांवर कामे सोपवलीत तर बरीच कामे मार्गी लागतील. व्यवसायात संमिश्र ग्रहमान राहील. जुने काम संपून नवीन काम हाती घ्याल. बाजारातील चढउतारांकडे लक्ष देणे गरजेचे होईल. नोकरीत आपल्या मर्यादा ओळखून काम करा. कोणत्याही गोष्टीची मागणी करताना वरिष्ठांचा कल बघून करा. अट्टाहास ठेवू नका. घरात सहजीवनाचा आनंद मिळेल.

कुंभ 
साशंकता न ठेवता कामे करीत रहा. कामाचा वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. व्यवसायात आवश्यक तेव्हा निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. पैशाचा मोह टाळा. कुसंगत धरू नका. नोकरीत/ कामात फेरबदल होतील. आडमुठे धोरण बाजूला ठेवून सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागावे लागेल. घरात तुम्ही तुमचे कौशल्य दाखवा. मोठ्या खर्चाचा बोजा तुमच्यावर येईल.

मीन 
 ग्रहमानाची साथ राहील. काही अनपेक्षित कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन हितसंबंध जोडले जातील. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्याच प्रमाणात यश येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील, त्यामुळे जादा सुखसुविधा मिळतील. जुन्या हितसंबंधांना उजाळा मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. घरात छोटा समारंभ ठरेल. विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल. महिलांना गृहसौख्य मिळेल. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील.

संबंधित बातम्या