ग्रहमान - २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२२

अनिता केळकर
सोमवार, 31 जानेवारी 2022

ग्रहमान - २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२२

मेष 
या सप्ताहात तुम्ही आनंदी व उत्साही राहाल. अवघड कामे बेधडकपणे करून यश मिळवाल. व्यवसायात योग्य व्यक्तींचे सहकार्य मिळेल. कामांना गती येईल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आत्मविश्‍वास वाढेल. सहकारी कामात मदत करतील. घरात तुमचा सक्रिय पाठिंबा व सल्ला उपयोगी पडेल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात अभ्यास करता येईल.

वृषभ 
मानसिक अस्वस्थता कमी होईल. डोळ्यासमोर नवीन उद्दिष्ट  ठेवून वाटचाल कराल. व्यवसायात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. नोकरीत कामाच्या पद्धतीत बदल होतील. अपेक्षित बातमी कळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात सर्वांचे एकमत होणे कठीण जाईल, तरीही घरात शांतता राखण्यात यशस्वी व्हाल.

मिथुन 
कामात सुधारणा झाल्याने तुमचा उत्साह वाढेल. सबुरीचे धोरण स्वीकारल्याचा लाभ होईल. अवघड कामात यश मिळेल. कष्टाचे चीज होईल. व्यवसायात प्रगतीचे पाऊल पडेल. पैशाची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठ जादा सवलतींसाठी तुमची निवड करतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात सहजीवनाचा आनंद घेऊ शकाल.

कर्क 
कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. व्यवसायात सहज वाटणाऱ्या कामात विलंब होईल. जिद्द व चिकाटीच्या जोरावर कठीण कामात यश मिळवाल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना? याकडे लक्ष द्या. कामामुळे जादा भत्ते व सवलत मिळेल. घरात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. पैशाच्या बाबतीत काटेकोर राहा. महिलांनी विनाकारण होणारी दगदग कमी करावी विद्यार्थ्यांनी भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा. 

सिंह 
रटाळपणा/ कंटाळा अशा शब्दांना तुमच्या जीवनात थारा नसतो. त्यामुळे अविश्रांत कष्ट करून यश मिळवाल. व्यवसायात नवीन करार व भागीदारीचे प्रस्ताव येतील. निष्णात व्यक्तींच्या सल्ल्याशिवाय कोणतीही कृती करू नका. मात्र खेळत्या भांडवलाची सोय करावी लागेल. नोकरीत जुने हितसंबंध संपून नवीन हितसंबंध  निर्माण होतील. कामात मात्र सहकाऱ्यांवर विसंबून राहू नका. घरात वातावरण सलोख्याचे राहील.

कन्या 
सध्या ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल त्यामुळे प्रगतिपथावर राहाल. व्यवसायात काही कडू गोड अनुभव येतील. त्याकडे लक्ष न देता काम चालू ठेवा. पैशाचे नवीन आव्हान पेलावे लागेल. त्यासाठी जादा कष्टाची तुमची तयारी असेल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील, त्यासाठी जादा सुविधा व अधिकारही देतील. मानसिक समाधान मिळेल.

तूळ 
‘प्रयत्नांती परमेश्‍वर,’ ही म्हण लक्षात ठेवून त्याप्रमाणे कृती करा. नशिबावर विसंबून न राहता प्रयत्नांत सातत्य राखा. व्यवसायात वृद्धी करण्यासाठी नवे विचार व योजना मनात घोळतील. जुनी देणी द्यावी लागतील. परदेश व्यवहारास गती येईल. नवीन करार करताना घाई नको. नोकरीत थोडे सबुरीचे धोरण ठेवा. पूर्वी केलेल्या मागण्या वरिष्ठ मान्य करतील. घरात वादाचे मुद्दे टाळावेत.

वृश्चिक 
रेंगाळलेल्या कामांना गती येईल. हितचिंतकांची मदत मिळेल. व्यवसायात नवीन कामांना मुहूर्त लाभेल. नवीन बोलणी व करार होतील. पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत बदल किंवा बदलीची शक्यता आहे. सभोवतालच्या व्यक्तींशी सांभाळून वागा. घरात काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. पैशाचे गणित चुकण्याची शक्यता आहे, तरी वायफळ खर्चावर बंधन ठेवावे. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. आध्यात्मिक प्रगती करावी.

धनू 
स्वतःहून कामे ओढवून घेऊ नका. कामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी योग्य वेळी विश्रांती घ्या. कामाचे मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात कामाचा विस्तार वाढेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. कामाचा आनंद मिळेल. वरिष्ठ खूष होतील. घरात सहजीवनाचा आनंद मिळेल. सुवार्ता कळेल. मनोबल उंचावेल. प्रकृतीच्या सर्व तक्रारी संपतील. डोळ्यांचे आजार कमी होतील.

मकर 
विचार कमी करून कृती केलीत तर फायदा तुमचाच होईल. अतिविचार नको. व्यवसायात कामाचे नियोजन कामाचा भार हलका करेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामासाठी तुमची खुशामत करतील, तरी बळी पडू नका. प्रकृतीची हेळसांड होणार नाही याची दक्षता घ्या. पुरेशी विश्रांती घेऊन कामे करा. आप्तेष्ट, नातेवाइकांच्या भेटीने आनंद मिळेल.

कुंभ 
साध्या सरळ कामात झालेला विलंब सहन होणार नाही. त्यामुळे कामाचा उरक पाडाल. व्यवसायात कामे मार्गी लावाल. धावपळ दगदग वाढेल. नोकरीत प्रतिष्ठित व्यक्तींचे तंत्र सांभाळून कामे कराल. पोटाच्या तक्रारी कमी झाल्याने घरात कामे कराल. स्वच्छता, टापटीप राखण्यावर भर राहील. डोळ्यांचे आजार कमी होतील. सहकुटुंब छोटीशी सहल काढाल. मन आनंदी राहील.

मीन 
‘अति तेथे माती,’ हे लक्षात ठेवून वागा. व्यवसायात दुसऱ्यांना खूष ठेवण्यासाठी स्वतःहून कामे ओढवून घेऊ नका. कामाचे वाटप करून कामे संपवा. नोकरीत प्रकृतीमान साथ देईल. त्यामुळे भरपूर प्रवास कराल. खाण्यापिण्याचे चोचले पुरवले जातील. घरात वातावरण चांगले राहील. एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्यानिमित्ताने आप्तेष्ट भेटतील. डोळ्यांचे आजार कमी होतील. डोकेदुखीही थांबेल. संयम बाळगाल.

संबंधित बातम्या