ग्रहमान ः २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२

अनिता केळकर
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

ग्रहमान ः २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२

मेष
कामाचे व वेळेचे नियोजन करून घर व व्यवसाय /नोकरीत आघाड्या सांभाळाव्या लागतील. केलेल्या प्रयत्नांना यश मिळेलच. व्यवसायात फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्या. मनाप्रमाणे कामे होतील. समाधान मिळेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष ठेवा. वरिष्ठांचा मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करून घ्या. कामात नवीन सुधारणा कराल. घरात पाहुण्यांची सरबराई करावी लागेल.

वृषभ
स्वतः जीवनाचा आस्वाद घेऊन त्यात सभोवतालच्या व्यक्तींनाही सामील करून घ्याल. मनोकामना सफल झाल्याचा आनंद मिळेल. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे मिळणाऱ्या फायद्याचेही प्रमाण वाढेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. नोकरीत पूर्वी केलेल्या कष्टाच्या कामाचे चीज होईल. आर्थिक वाढ होईल. घरात छोटासा समारंभ पार पडेल. कलाकार खेळाडूंना यश मिळेल.

मिथुन 
भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. एखाद्या गोष्टीचा साकल्याने विचार करून मगच ती हाती घ्याल. व्यवसायात कामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. देणी फेडून डोक्यावरचे ओझे कमी करा. जादा काम करून जादा पैसे मिळवता येतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या सल्ल्याला महत्त्व येईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. सहकारी कामात मदत करतील.

कर्क
ग्रहांची मर्जी असल्याने तुमच्या सुप्त इच्छा आकांक्षा वाढतील. व्यवसायात विरोधकांचा विरोध मावळेल व ते मित्रत्वाची भाषा बोलतील. आर्थिक स्थिती सुधारल्याने हायसे वाटेल. योग्य वेळी योग्य व्यक्तींची मिळालेली संगत कामांना गती देईल. नोकरीत कामात बिनचूक राहून आजचे काम आजच पूर्ण करा. पैशाची तात्पुरती सोय होऊ शकेल. सहकारी कामात मदत करतील. घरात मुलांच्या प्रगतीबाबत चांगली घटना घडेल. प्रियजनांचा सहवास मिळेल.

सिंह
कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. एखाद्या कामातील यशाचे स्वरूप लक्षात येईल. व्यवसायात पुढाकार घेऊन एखादी धाडसी कल्पना साकार करावीशी वाटेल. त्याला प्रतिष्ठित व्यक्ती व हितचिंतकांची साथही मिळेल. पैशाची चिंता दूर होईल. नोकरीत कोणाचीही मदत घेण्यापूर्वी त्यांच्या अपेक्षा जाणून घ्या. क्षमता ओळखून कामे स्वीकारा. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरात तडजोडीचे धोरण ठेवलेत तर लाभ तुमचाच होईल.

कन्या
सध्या ग्रहमान अनुकूल असल्याने तुमचे इरादे बुलंद राहतील. कामांना गती मिळेल. व्यवसायात कामाचा विस्तार करण्याचे तुमचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल. मोठ्या व्यक्तींचा सक्रिय सहभाग लाभेल. नोकरीत आवडीचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यामुळे कामाचा ताण जाणवणार नाही. जोडधंद्यातून जादा कमाई होईल त्यामुळे पैशाची ऊब मिळेल. घरात सहजीवनाचा आनंद घ्याल. चांगली बातमी कळेल.

तूळ
कामात चोखंदळ राहून कामे मिळवा. कामात सातत्य टिकवून ठेवून नवीन कामांचे नियोजन करा. व्यवसायात जास्तीत जास्त चांगले काम करून प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न राहील. केलेल्या प्रयत्नांचा लगेचच फायदा मिळेल, ही अपेक्षा नको. उधारीपेक्षा रोखीवर भर देऊन कामे मिळवा. नोकरीत हातातील कामे वेळेत संपवा. काम नीट पडताळून बघून मगच वरिष्ठांपुढे घेऊन जा.

वृश्चिक
सप्ताहात तुमच्या अंगी असलेल्या गुणांचा व कौशल्याचा योग्य वापर करून प्रगती साधा. व्यवसायात रेंगाळलेली कामे गती घेतील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. कामांत यश मिळेल. पैशाची तात्पुरती सोय होईल. देणी देता आल्याने समाधान राहील. नोकरीत कामामुळे वरिष्ठांची मर्जी राखू शकाल. सहकारी कामात मदत करतील. नवीन काम करण्याची संधी मिळेल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. नवीन खरेदीचा आनंद घेता येईल.

धनू
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करा, यश मिळेल. व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा इरादा बुलंद राहील, त्यामुळे कामातील प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. पैशाची तरतूद करण्यासाठी तुमची शक्ती व बराच वेळ जाईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर नावडते काम सोपवतील, सहकारी कामात मदत करतील, ही अपेक्षा नको. घरात मतलबापुरते नातेवाईक तुमचेकडे आशेने पाहतील तरी चार हात जरा लांबच राहा.

मकर
ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल त्याचा लाभ घ्या. व्यवसायात ज्या कामात दिरंगाई झाली होती, ती कामे झपाट्याने पूर्ण होतील. व्यवहारात तुमच्या कामात अनुकूल घटना घडतील. पैशाची चणचण कमी होईल. नोकरीत अनपेक्षित चांगल्या घटनेमुळे तुमचा उत्साह व्दिगुणीत होईल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात चांगली बातमी कळेल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीबाबतची चिंता कमी होईल.

कुंभ
आळस झटकून कामाला लागाल. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य लाभेल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. नोकरीत अंगी असलेले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. कामातून तुमचे खास गुण नजरेस पडतील. कामांमुळे नवीन ओळखी होतील.

मीन 
तुमच्या हौशी व आनंदी स्वभावात पूरक ग्रहमान  लाभत आहे. व्यवसायात साशंकता दूर झाल्याने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नवीन करारमदार होतील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. पैशाची वसुली होईल. नोकरीत कामानिमित्ताने लांबचा प्रवास घडेल. चांगल्या दर्जाचे काम करून स्वतःमधील वैशिष्ट्य इतरांसमोर दाखवाल. घरात चांगली घटना योग्य दिशा दाखवेल. तुमच्या जीवनात आनंदाची बातमी कळेल. 
 

संबंधित बातम्या