ग्रहमान :  ९ ते १५ एप्रिल २०२२

अनिता केळकर
सोमवार, 11 एप्रिल 2022

ग्रहमान

मेष
नोकरी /व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. अनपेक्षित बदल होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. दगदग, धावपळ वाढेल. महिलांनी अलिप्त धोरण ठेवून आपल्या छंदात मन रमवावे. कामाचा मनस्वी कंटाळा आला असेल तर कुटुंबासमवेत छोटी सहल काढा. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे. यश मिळेल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

वृषभ
नोकरी व व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल नको. कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक पावले टाका. राग आला तरी प्रकट करू नका. शांत राहा. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांनी इतरांशी तात्त्विक मुद्द्यांवरून होणारे वादविवाद टाळावेत. मुलांकडून सुवार्ता कळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात गोंधळ करू नये.

मिथुन
पैशाची सध्याची स्थिती उत्तम राहील. त्यामुळे तुमचा उत्साह व आनंद द्विगुणित होईल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत केलेल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. महिलांना घरात प्रियजनांच्या सहवासाने आनंद मिळेल. पाहुण्यांची ये-जा राहील. खेळाडू, कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. तरुणांनी अतिसाहस करू नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनुकूल ग्रहमान.

कर्क
बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. आर्थिक आवक वाढेल. कामात बदल करून नवीन विस्ताराचे बेत मनात येतील. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे करून कामे ओढवून घेऊ नका. पैशाच्या मोहमयी वातावरणापासून दूर राहा. महिलांची घरात नवीन खरेदी होईल. गृहसजावटीसाठी चार पैसे जादा खर्च होतील. अनपेक्षित लाभ होईल. विद्यार्थ्यांनी मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

सिंह
माणसांची पारख करणे जिकिरीचे होईल. खरे व खोटे यातील फरक ओळखा. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा मोह होईल. व्यवसायात प्रत्येक पाऊल विचाराने टाकावे. निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत परदेशगमनाचे योग येतील. नवीन ओळखी होतील. महिलांनी कामाचा उरक पाडावा.  बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी चालून येईल. प्रकृतीची काळजी घ्यावी. तरुणांनी स्वतःचे कामाचे  कौशल्य वाढवावे. विद्यार्थ्यांनी यशदायक ग्रहमान.

कन्या
कामाचे व पैशाचे योग्य नियोजन करून कामात उलाढाल वाढवाल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिकीकरण कराल. नोकरीत कामात बिनचूक राहून वरिष्ठांना चुकांवर बोटे ठेवण्याची संधी देऊ नका. मनाविरुद्ध वागावे लागेल. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. घरातील व्यक्तींकडून तुमचे व तुमच्या कामाचे कौतुक होईल. पूर्वी दुर्लक्षित केलेल्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल.

तूळ
वातावरणानुसार लवचिक धोरण ठेवलेत तर फायदा होईल. व्यवसाय वृद्धिंगत होईल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत तत्त्वाला मुरड घालून तडजोड करावी लागेल. नको त्या कामात बराच वेळ व पैसे खर्च होतील. कौटुंबिक स्वास्थ्याचा अनुभव घ्याल. महिलांच्या मनाप्रमाणे कामे होतील. केलेल्या कामाचा आनंद मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांचे विवाह ठरतील.

वृश्‍चिक
ग्रहमान अनुकूल असल्याने सुप्त इच्छाआकांक्षा सफल होतील. पूर्वी केलेल्या कामाचे यश आर्थिक स्वरूपात मिळेल. व्यवसायात नवीन घडामोडी घडतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामात सहकाऱ्यांवर अवलंबून राहू नका. कामानिमित्ताने प्रवास कराल. घरात लांबचे नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. सुवार्ता कळेल. कलाकार, खेळाडूंना, राजकारणी व्यक्तींना मागणी राहील.

धनू
नोकरी /व्यवसायात स्वतःची क्षमता ओळखून पुढे जा. कुणावरही अवलंबून राहू नका. आर्थिक गुंतवणूक करण्याआधी सखोल विचार करा. पैशाची थोडी तंगी जाणवेल. परदेश व्यवहाराच्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहाल. बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी चालून येईल. महिलांनी ऐकीव  बातमीवर  विश्‍वास न ठेवता त्याची शहानिशा करावी. भागीदाराचे विचार न पटल्याने वादविवाद होतील. तरुणांनी अविचाराने वागू नये.

मकर
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तरतूद केलेली लाभदायक ठरेल. व्यवसायात अडथळ्यांवर मात करून यश मिळवाल. अर्थप्राप्ती चांगली होईल. जोडधंदा फायदा मिळवून देईल. अनपेक्षित लाभाची शक्यता. तुमचे महत्त्व वाढेल. सुवार्ता कळेल. प्रकृतीमान सुधारेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल. घरात आपल्याच माणसांकडून नवीन अनुभव घ्याल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

कुंभ
ग्रह तुमच्या दिमतीला असतील, त्याचा लाभ घ्या. पैशाची फारशी फिकीर नसल्याने खर्चावर बंधन राहणार नाही. व्यवसायात नवीन विचार व कार्यपद्धतीचा अवलंब करून उलाढाल वाढविण्याकडे कल राहील. नोकरीत वरिष्ठ मनाप्रमाणे काम करण्याची मुभा देतील. वेगळ्या पद्धतीचे काम हाताळण्याची संधी मिळेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. महिलांना कुटुंबासह प्रवासाचे योग येतील.

मीन
परिस्थितीनुसार ध्येय धोरणात बदल केल्यास लाभ होईल. व्यवसायात पैशाची चणचण जाणवली तरी पैशाची तात्पुरती सोय होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत नवीन करार होतील. काही ठोस निर्णय घेता येतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश येईल. कामाचा ताण कमी होईल. मुलांकडून अपेक्षित यश कळेल. मनोबल उंचावेल. प्रकृतीची साथ मिळेल. कलावंत, खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

संबंधित बातम्या