एज ग्रेसफुल्ली

स्वप्ना साने 
सोमवार, 13 जुलै 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

वय वाढते तसे त्वचेमधील बदलही आपल्याला जाणवतात आणि दिसतात. ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि वयोमानानुसार त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचेवर सुरकुत्या येणे, ड्रायनेस, त्वचेतील लवचिकपणा कमी होणे या सगळ्या एजिंग साईन्स आहेत. बऱ्याच वेळा प्रदूषण, स्ट्रेस, स्ट्रिक्ट डाएटिंग, सतत मेकअप आणि कॉस्मेटिक्सचा मारा त्वचेवर होत असेल, तर प्री-मॅच्युअर एजिंग होऊ शकते. म्हणजेच, कमी वयातसुद्धा सुरकुत्या, ड्रायनेस, लूज स्किन ही लक्षणे दिसू शकतात.

एजिंग साईन्स

  •      कपाळावरच्या फाइन लाइन्स 
  •      क्रोव फीट मार्क्स, म्हणजेच डोळ्याच्या बाजूला बारीक लाइन्स 
  •      लाफ लाइन्स, म्हणजेच हसताना गालावर दिसणाऱ्या रेषा
  •      डबल चीन
  •      गळ्याभोवती त्वचा लूज होणे
  •      हातावरच्या फाईन लाइन्स प्रॉमिनंट दिसणे. 

त्वचेची योग्यरीत्या काळजी घेतली, तर आपण या प्री-मॅच्युअर एजिंगला रोखू शकतो. आजकाल कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी बरीच ॲडव्हान्स झाल्यामुळे त्वचा विकार आणि एजिंग कंट्रोल करण्यासाठी काही ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत.

     बोटोक्स थेरपी : या प्रक्रियेत इंजेक्शनद्वारे कपाळावरच्या बारीक रेषा आणि क्रोव फीट मार्क्स कमी केल्या जातात. त्वचेतील लवचिकता वाढते. इफेक्ट दिसायला साधारण एक आठवडा लागतो आणि हा इफेक्ट तीन ते चार महिन्यापर्यंत राहतो.

     केमिकल पिल्स : अर्थातच तज्ज्ञांकडून करावयाची ट्रीटमेंट आहे. या प्रक्रियेत त्वचेवरील सगळ्यात वरचा लेयर ॲसिड पिलने काढून टाकण्यात येतो. त्यामुळे फाईन लाइन्स आणि डार्क स्पॉट्स कमी दिसतात. स्किन ब्राइट दिसते. पण या क्रियेमुळे त्वचा लालसर दिसते आणि हील व्हायला एक आठवडा तरी वेळ लागतो. 

     लेझर स्किन रीसरफेसिंग : या प्रक्रियेत नवीन पेशींची ग्रोथ स्टिम्युलेट करतात. लेझरमुळे त्वचेमधील डीप लेयर आधी डॅमेज करतात आणि नंतर पिलिंग करून ती काढून टाकतात. त्यामुळे नवीन त्वचा स्मूथ आणि यंग दिसते. या प्रोसेसमुळे त्वचा लालसर होते आणि काही दिवस दुखतेही. काही दिवस त्वचेचे पिलिंगपण होत राहते.

     ड्रर्मल फिलर्स : या प्रोसेसमध्ये तज्ज्ञ त्वचेमध्ये कोलाजेन किंवा हॅल्यूरोनिक ॲसिड जेल आणि फॅटसारखे फिलर्स इंजेक्ट करतात. हे फिलर चेहऱ्यावर, ओठांमध्ये किंवा हातांवर वापरले जातात. याचा इफेक्ट लगेच दिसतो आणि दोन महिने ते तीन वर्षांपर्यंत राहतो; तुम्ही कोणत फिलर वापरता त्यावर हे अवलंबून आहे.

     डरमाब्रेझन आणि मायक्रो डरमाब्रेझन : यासुद्धा खूप कॉमन ट्रीटमेंट्स आहेत. यात रोटेटिंग ब्रशचा उपयोग होतो. मायक्रो डरमाब्रेझनमध्ये स्पेशल मशीनचा वापर होतो. पाहिजे तशा इफेक्टसाठी बरीच सेशन्स घ्यावी लागतात किंवा रेग्युलर बेसिसवर करावे लागते.

हे सगळे उपाय योग्य त्या तज्ज्ञांकडूनच करावेत. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुमच्या त्वचेला नेमके काय आणि कशाची गरज आहे ते ओळखून या ट्रीटमेंट्स कराव्यात. या ट्रीटमेंट्स टेम्पररी आहेत याची नोंद घ्यावी. 

खरे तर वेळात वेळ काढून थोडी स्वतःची काळजी घेतली, तर एजिंग पुढे ढकलता करता येते. योग्य आहार,  व्यायाम आणि स्किन केयर रुटीन केले, तर वरील टेम्पररी ट्रीटमेंट घायची गरज पडणार नाही. And one can really Age Gracefully! 

संबंधित बातम्या