न्यूड मेकअप

स्वप्ना साने
सोमवार, 1 मार्च 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

गेल्या काही दशकांत वेगवेगळे मेकअप ट्रेंड्स आले. जुन्या ट्रेंडमध्ये थोडे फार फेरबदल झाले आणि नवीन ट्रेंड म्हणून त्याला स्त्रियांनी पसंती दिली. पण कधीही आउट डेटेड न झालेला मेकअप लुक म्हणजे, न्यूड मेकअप लुक.

हल्ली सेलिब्रिटींमध्येसुद्धा फारच पॉप्युलर झालेला हा न्यूड मेकअप लुक, अगदी सोप्या स्टेप्समध्ये करता येतो. न्यूड लुक म्हणजे नो-मेकअप नव्हे, तर कमीत कमी प्रॉडक्ट्सचा वापर करून, आपल्या स्किन टोनला नॅचरल आणि फ्रेश लुक देणे. 
कसा करावा न्यूड मेकअप 

  • क्लिन्सिंग लोशन किंवा क्लिन्सिंग जेल वापरून सर्वप्रथम त्वचा क्लीन करावी. गरज असल्यास त्वचा स्क्रब करून घ्यावी. मेकअप स्मूथ त्वचेवर चांगला सेट होतो.
  • गरजेनुसार मॉइस्चरायझर लावावे, त्वचा भरपूर हायड्रेट करावी. 
  • मेकअप चांगला सेट होण्यासाठी आणि लॉँग लास्टिंग इफेक्टसाठी स्किन प्रायमर लावणे आवश्यक आहे. प्रायमर लावल्यामुळे मेकअपसाठी स्मूथ कॅनव्हास इफेक्ट मिळतो. 
  • आता फाउंडेशन लावावे. पण न्यूड लुकसाठी फाउंडेशनची शेड आपल्या त्वचेच्या टोनबरोबर मिळतीजुळती हवी; म्हणजेच परफेक्ट ब्लेंड होणारी शेड वापरावी. न्यूड लुकमध्ये फाउंडेशनचा रोल फार महत्त्वाचा आहे. कारण फाउंडेशनची जास्त हेवी किंवा ब्राईट शेड वापरली, तर त्याला नॅचरल लुक म्हणता येणार नाही. म्हणूनच फाउंडेशन विकत घेताना चेहऱ्याला लावून बघावे आणि जी शेड पूर्णपणे स्किन टोनमध्ये ब्लेंड होईल ती शेड सिलेक्ट करावी. हायड्रेटिंग फाउंडेशनचा वापर केल्यास इफेक्ट छान येतो.
  • कॉम्पॅक्ट पावडरची शेड पण स्किन टोनला मॅच करणारा हवी. मार्केटमध्ये लाइट ट्रान्सल्युसन्ट पावडर पण मिळतात, त्याने फिनिशिंग छान येते. 
  • ब्लशरचा वापर करताना न्यूड शेड्स सिलेक्ट कराव्यात. नॅचरल टिंटेड ब्लशचा सिंगल स्ट्रोक द्यावा. आय शॅडोची शेड बेज किंवा नॅचरल ब्राउन घ्यावी. न्यूड मेकअप लुकसाठी बाकी कुठल्याही अतिरिक्त शेड्स वापरू नयेत. 
  • काजळ आणि आय लायनर नेहमीप्रमाणे लावावे. ट्रान्स्परन्ट मस्कारा लावावा, त्यामुळे एनहान्स्ड लुक दिसतो. 
  • लिपस्टिक लावताना स्वतःच्या ओठांच्या रंगाप्रमाणे निवडावा. न्यूड लुकचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे लिपस्टिक. या लुकमध्ये तुम्ही फक्त नॅचरल लुक देता, म्हणजेच आहे त्या फेशिअल फीचर्सना हायलाइट करता आणि एनहान्स्ड इफेक्ट देता. त्यामुळे लिपस्टिक पण अगदी लिप कलरला मॅच करणारी हवी. ग्लॉस इफेक्ट हवा असेल तर लिप ग्लॉस वापरू शकता.
  • न्यूड मेकअप कोणी व कधी करावा?
  • न्यूड मेकअप कोणी करावा, कधी करावा यावर कोणतेही बंधन नाही. अगदी फुल टाइम होम मेकरपासून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला हा न्यूड मेकअप लुक करू शकतात. ज्यांना मेकअप करायची सवय नाही, त्यांना हा नॅचरल लुक सहज कॅरी करता येईल.

संबंधित बातम्या