सजूया नववर्षादिनी!

स्वप्ना साने
सोमवार, 12 एप्रिल 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नववर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपरिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लित होवो तुमचे जीवन
सुगंधित जसे चंदन

गुढीपाडवा म्हणजे मराठी नूतन वर्षाची सुरुवात. हा भारतीय सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. चैत्र नवरात्र, रामनवमी, चैत्र गौर हळदी कुंकू, असा पूर्ण उत्साहपूर्ण महिना असतो. चला तर या नूतन वर्षाचे स्वागत करूया, छान नटून थटून आणि उत्साहाने.   

    नवीन वर्षाची सुरुवात करा, अभ्यंगस्नान करून : नारळाचे तेल किंवा बदामाचे तेल संपूर्ण शरीराला अभ्यंग करत लावावे. यामुळे त्वचेतील रूक्षपणा निघून त्वचा मऊ होते. साबणाऐवजी उटणे लावावे. घरी पारंपरिक उटणे नसेल, तर मसूर डाळीचे पीठ दुधात कालवून बॉडी स्क्रब करावी किंवा कॉफी आणि साखर थोड्या तेलात मिक्स करून याचा उटण्यासारखा वापर करावा. त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग दिसेल. 

    स्वतः शृंगार करून मग गुढीला तयार करा : पारंपरिक सण आहे त्यामुळे नऊवार साडी किंवा सहा वार साडी खूपच खुलून दिसेल. या लुकला आणखी एन्हान्स करायला क्विक मेकअप करावा. 

असा करावा इन्स्टंट मेकअप.

  • त्वचा मॉइस्चराइझ करून, त्यावर तुमच्या त्वचेला मॅच होणारे फाउंडेशन लावावे. तुमचे फाउंडेशन क्रीम फॉर्ममध्ये असेल, तर ते तुम्ही मॉइस्चरायझरमध्ये मिक्स करून पण लावू शकता. असे केल्यास सोप्या पद्धतीने ते लावता येते. खूप हेवी लुक नको असेल तर ही बेस्ट टेक्निक आहे. 
  • आता कॉम्पॅक्ट पावडर लावून फाउंडेशन सेट करावे. कॉम्पॅक्ट पावडर नसेल, तर साधी फेस पावडर घेऊन त्याने बेस सेट करावा. 
  • काजळ आणि आय लायनर लावून बेसिक आय मेकअप करावा. आयब्रो लाइट असेल, तर पेन्सिलचे स्ट्रोक देऊन डार्क करावे. आय शॅडोचा हलका बेस लावावा. असे केल्यास आय मेकअप खुलून दिसतो, डोळे ब्राईट दिसतात. 
  • शेवटी, लिप लायनर लावून आऊटलाइन काढावी आणि लिपस्टिकची सॉफ्ट शेड लावावी. सॉफ्ट शेड म्हणजे, खूप भडक नाही आणि अगदी न्यूड पण नाही; तुमच्या वेषभूषेला मॅच होणारी शेड वापरावी.
  • तुमचा हा लुक कम्प्लिट करण्यासाठी टिकली जरूर लावावी; चंद्रकोर किंवा साधी गोल टिकली आणि त्याखाली काळा डॉट. असे केल्याने साधा सिम्पल मेकअप आणि वेशभूषेमुळे तुमचे सौंदर्य खुलून दिसेल. 

हेअर स्टाइल
इतके छान तयार झाल्यावर, केशभूषाही हवीच! तुमच्या केसांचा खोपा येत असेल, तर खोपा घालावा किंवा जुडा स्विच पण मार्केटमध्ये मिळतात, अगदी सोप्या पद्धतीने ते फिक्स करता येतात. या खोप्याला एक गजरा गुंडाळला की एकदम परफेक्ट ट्रॅडिशनल लुक तयार.

संबंधित बातम्या