नकोसे केस

स्वप्ना साने
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

एखाद्या स्त्रीचे डोक्यावरचे केस काळेभोर, लांब आणि दाट असतील तर तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. पण असे केस चेहऱ्यावर असतील, तर मात्र ते नकोसेच वाटतात. 

स्त्रियांच्या चेहऱ्यावर, जसे ओठांच्या वरचा भाग, हनुवटी आणि गालांवर केस येणे याला हिरसुटीसम म्हणतात. शरीरावर बारीक लव असणे ही सामान्य बाब आहे. पण हीच लव जाड केसात रूपांतरित होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. 

हार्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा मेल हार्मोन म्हणजेच अँड्रॉजेनचे प्रमाण वाढल्यामुळे स्त्रियांना दाढी मिश्यांसारखे केस येऊ शकतात. प्युबर्टी किंवा मेनोपॉजच्यावेळी हार्मोनल चेंजेस होतात. त्यावेळी असे केस वाढण्याची शक्यता असते.

‘पॉलीसिस्टिक ओव्हरीयन सिंड्रोम’मुळेसुद्धा (पीसीओडी) चेहऱ्यावर किंवा इतरत्र केसांची वाढ होऊ शकते. 

  • कुशिंग सिंड्रोम - शरीरात जर स्ट्रेस हार्मोन म्हणजेच कॉर्टिसोलचे प्रमाण जास्त झाले आणि अधिक काळ असले, तर हिरसुटीसम होऊ शकतो. 
  • काही शारीरिक व्याधींसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे हार्मोनल लेव्हलमध्ये बदल होतात. त्यामुळेसुद्धा चेहऱ्यावर आणि शरीरावर अनवॉन्टेड हेअर ग्रोथ होते. 
  • काही बाबतीत अनुवंशिकतेमुळेही चेहऱ्यावर हेअर ग्रोथ होऊ शकते. 
  • ओबेसिटी म्हणजे वजन वाढल्यामुळेदेखील मेल हार्मोन्सचे प्रमाण अधिक होऊन अनवॉन्टेड हेअर ग्रोथ होऊ शकते. 

उपाय  

  • शेव्हिंग ः रेझर किंवा इलेक्ट्रिक शेव्हरने नको असलेले केस काढता येतात. ही प्रक्रिया रोज करावी लागते आणि नंतर सूदिंग क्रीम लावावे. 
  • थ्रेडिंग ः ही सगळ्यात कॉमन प्रोसेस आहे, पण यामुळे त्वचेला त्रास होतो, दुखते आणि रॅश येऊ शकते. थ्रेडिंग सलूनमध्ये जाऊन करावे. 
  • वॅक्सिंग ः कटोरी वॅक्स किंवा कोल्ड वॅक्सने मुळासकट केस निघून जातात. पण परत काही दिवसांनी केसांची ग्रोथ होते. हे सलूनमध्येच करावे. 
  • हेअर रिमूव्हर क्रीम ः डेपीलेटरी क्रीम किंवा हेअर रिमूव्हिंग क्रीममध्ये स्ट्रँग केमिकल्स असतात, ज्यामुळे केस काढणे सोपे होते. पण हे वापरताना त्वचेच्या थोड्या भागावर लावून पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे, कारण केमिकल्समुळे त्वचेवर रॅश येऊ शकतो. 
  • इलेक्ट्रॉलिसीस ः यामध्ये केसांच्या मुळांना करंट पास करून जाळून टाकतात. वारंवार केल्यानंतर अनवॉन्टेड केसांची ग्रोथ थांबते. अर्थात हा उपाय तज्ज्ञांकडूनच करावयाचा असतो, आणि याच्या काही सिटिंग्ज कराव्या लागतात. 
  • लेझर हेअर रिमूव्हल ः या ट्रीटमेंटमध्ये लेझर हीटमुळे केसांची मुळे नष्ट होऊन केस नाहीसे होतात. पण ही प्रोसेस वारंवार करावी लागते आणि ती तज्ज्ञांकडूनच करून घ्यावी. जरा पेनफुल प्रोसेस आहे. थोडी स्किन डॅमेज होण्याची शक्यता असली ती कालांतराने हिल होते. 

वरील नमूद केलेले सर्व उपाय कमी जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह आहेत. आपल्याला नेमके काय आणि कशाची गरज आहे याचा सल्ला आपल्या ब्यूटी थेरपिस्ट कडूनच घ्यावा आणि तज्ज्ञांकडूनच योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी.

संबंधित बातम्या