नॅचरल रेमेडीज्

स्वप्ना साने
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने
कला आणि संस्कृती

त्वचेवर कुठल्याही प्रकारचे डाग असलेले कोणालाच आवडत नाही. पिंपल्समुळे राहिलेले डाग असोत अथवा, हायपर पिगमेंटेशन किंवा प्रदूषण अन् उन्हामुळे काळवंडलेली त्वचा असो; डाग कोणालाच नको असतात. त्यात जर त्वचेवर ओपन पोअर्स असतील, तर चेहरा आणखीनच निस्तेज दिसतो. अनेकवेळा या सगळ्याबरोबर ब्लॅक हेड्स, पिंपल्सही दिसू लागतात. अशावेळी नॅचरल आणि होम मेड प्रॉडक्ट्स रेमेडी म्हणून वापरता येऊ शकतात.

शुगर स्क्रब 
चेहरा सतेज दिसण्याकरिता मृत त्वचेचा थर काढणे गरजेचे आहे. घरगुती उपायांमध्ये लिंबाच्या फोडीवर थोडी साखर घेऊन चेहऱ्यावर हळुवार स्क्रब करावे आणि पंधरा मिनिटांनी चेहरा धुऊन घ्यावा. हा एक उत्तम एक्सफोलिएटिंग स्क्रब आहे. आठवड्यातून एकदा याने स्क्रब केल्याने अतिरिक्त ऑइल आणि मृत त्वचा निघून जाते. ओपन पोअर्सही काही प्रमाणात श्रिंक होतात. डाग फिकट होतात आणि काही दिवसातच चेहरा टवटवीत दिसतो.

टोमॅटो स्क्रब
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्‍स असतात, त्यामुळे एजिंग प्रोसेस स्लो होते. शिवाय त्यात अस्ट्रिंजेंट प्रॉपर्टीही असते. त्यामुळे त्वचेला टाइटनेस येतो. एक चमचा टोमॅटोच्या रसात तीन ते चार थेंब लिंबाच्या रस घालावा आणि चेहऱ्यावर वीस मिनिटे हा ज्यूस लावून ठेवावा. नंतर गार पाण्याने धुऊन घ्यावे. असे नियमित केल्यास चेहऱ्यावर चमक येईल आणि डागपण कमी होतील. ओपन पोअर्स श्रिंक होऊन चेहरा खुलून दिसेल.

बेकिंग सोडा
एक अगदी कॉमन पदार्थ म्हणजे बेकिंग सोडा. घरोघरी सहज उपलब्ध असलेला हा पदार्थ त्वचेसाठी फार उपयुक्त आहे. यात अँटी बॅक्टेरिअल प्रॉपर्टी असल्याने एकन आणि पिंपल्स हील होतात. चेहऱ्याचे पीएच बॅलन्स करून, त्वचा सतेज करतो. दोन चमचे बेकिंग सोड्यामध्ये दोन चमचे पाणी घालून ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि पाच मिनिटांनी गार पाण्याने धुऊन घ्यावे. पंधरा दिवसांतून एकदा हे करावे, नक्की फायदा होतो.

काकडीचा रस
ओपन पोअर्स असलेल्या त्वचेला रोज दहा मिनिटे काकडीचा रस लावून ठेवावा. यामुळे त्वचा टाइट होते. शिवाय काळे डाग, डार्क सर्कल किंवा सन बर्न ठीक होण्यास मदत होते. त्वचा ड्राय असेल तर काकडीच्या रसात एक चमचा मध घालून हा पॅक लावावा. काही दिवसांतच त्वचा ग्लो करेल. 

एग व्हाइट पॅक
अंड्याच्या पांढऱ्या भागात थोडा मध घालून हा पॅक चेहऱ्याला लावावा. पंधरा मिनिटांनी गार पाण्याने धुऊन घ्यावा. उत्तम अँटिएजिंग पॅक आहे. तसेच स्किन पोअर्स टाईट होण्यास मदत होते. सर्व स्किन टाइप्सला सूट होणारा पॅक आहे. 
वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि अगदी नॅचरल आहेत. सहज करता येण्यासारखे आहेत. नियमित केल्यास त्वचा नितळ, कोमल आणि सतेज दिसेल आणि नॅचरल ग्लोइंग त्वचा तर सर्वांनाच हवी हवीशी असते, नाही का!

संबंधित बातम्या