सेल्फ केअर

स्वप्ना साने
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने
कला आणि संस्कृती

घर टिपटाप ठेवून सगळी नाती जपणारी कर्तव्यदक्ष होम मेकर असो किंवा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपल्या टॅलेंटचा उपयोग करून प्रगती करणारी वर्किंग वूमन असो; या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक महिला ‘सुपर वूमन’ आहे. अशा या सुपर वूमनसाठी हेल्थ, ब्यूटी आणि सेल्फ केअर महत्त्वाचे आहे. या तिन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. हा बॅलन्स नीट असेल तर महिलांचे आरोग्य उत्तम राहील. मेडिटेशन, योगा, म्युझिक, डान्स, वाचन याबरोबरच ब्यूटी थेरपीही महत्त्वाची आहे. त्यासाठी काही सोप्या टिप्स बघूया, ज्या सोप्या पद्धतीने करता येतील आणि बिझी लाइफमध्ये सहज करता येतील. 

डेली केअर 
सकाळी अंघोळ झाल्यावर बॉडी लोशन आणि फेस मॉइस्चरायझिंग लोशन लावावे. CTM म्हणजेच क्लिन्सिंग, टोनिंग आणि मॉइस्चरायझिंग रोज रात्री झोपण्यापूर्वी करावे. 

वीकली केअर
आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब करावा आणि नरीशिंग पॅक लावावा. तसेच बॉडी स्क्रब किंवा उटणे वापरावे आणि नंतर बॉडी लोशन लावावे. 

मंथली केअर
महिन्यातून एकदा स्वतःसाठी वेळ काढून ब्यूटी थेरपिस्टकडून क्लीनअप किंवा फेशियल करावे. शक्य असल्यास बॉडी स्पा करावा. केसांची काळजी घ्यावी. पेडिक्युअर करावे. यामुळे सर्वांग रिलॅक्स होते आणि बॉडी डीटॉक्स होते. नवीन पेशींना पोषण मिळते आणि स्किन हेल्दी होते. 

काही गोष्टी घरच्या घरी करणे शक्य असते. उदाहरणार्थ, स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे टोमॅटो, काकडी, यांचा रस चेहऱ्याला लावणे. काकडीची चकती पाच मिनिटे डोळ्यावर ठेवणे. एखाद्या दिवशी बेसन, दही मिक्स करून हा पॅक अंघोळीच्या आधी दहा मिनिटे लावून तेवढ्या वेळात कामे आटोपून घेता येतात. 

ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनी स्वतःजवळ वेट वाईप्स कॅरी कराव्यात. हल्ली क्लिन्सिंग, टोनिंग, मॉइस्चरायझिंगपासून सनस्क्रीन वाईप्सपर्यंत सगळेच उपलब्ध आहे. वापरायलाही सोपे असते. जेल आय कुलिंग बॅग्ज मिळतात. लंच टाईममध्ये किंवा अधेमधे त्या डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांवरचा ताण कमी होतो.

आउटडोअर ॲक्टिव्हिटी अथवा क्रिडाप्रकारांत सहभागी असल्याऱ्या महिलांनी सनस्क्रीन अवश्य लावावे. चार तासांनी ते पुसून शक्य असल्यास चेहरा धुऊन मग परत लावावे. यामुळे चेहरा ऑईली किंवा स्टिकी फील होत नाही. 

यासगळ्याबरोबरच पौष्टिक आहार घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. वेळ नाही म्हणून जंक फूड आणि फास्ट फूडच्या नादी लागू नये. तसेच रूटीन मेडिकल चेकअप करणे आणि सोबतच रूटीन स्किन केअर आणि बॉडी केअर घेणे या गोष्टी आपल्या लिस्टमध्ये प्रायोरिटीवर असाव्यात. 

लक्षात असू द्या.. सेल्फ केअर इज नॉट सेल्फिश... इट इज नेसेसिटी!

 

संबंधित बातम्या