सण आले, तयारीला लागा!

स्वप्ना साने
सोमवार, 27 सप्टेंबर 2021


बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

गणेशोत्सव उत्साहात पार पडला. आता येईल नवरात्र, मग दसरा आणि दिवाळी. या सणांची तयारी करता करता आपण स्वतःचीही तयारी करायला हवी. त्या तयारीची सुरुवात त्वचेची काळजी घेण्यापासून करायला हवीय. चला तर होऊया फेस्टिव्हलसाठी रेडी... 

साधारण दोन आठवड्याच्या अवधीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी त्वचेची काळजी घेता येते. सर्वप्रथम निरीक्षण करून आपल्याला काही स्किन प्रॉब्लेम आहेत का ते बघावे, आणि त्यानुसार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करावे. 

काही होम मेड प्रॉडक्ट्स वापरून आपण आपल्या फेस्टिव्ह ब्यूटीसाठी रेडी होऊ शकता.

    त्वचेला रोज क्लिन्सिंग करावे. स्पेशली तुम्ही जर मेकअप करत असाल तर हे खूप आवश्यक आहे. त्यासाठी खोबऱ्याच्या तेलात कापसाचा बोळा बुडवून त्याने चेहऱ्यावरचा मेकअप पुसून काढावा. नॉर्मल आणि ड्राय स्किनसाठी हे खूप छान आहे. त्वचा ऑइली असेल तर दही लावून मग कापसाने पुसावे. तुम्ही बदामाचे तेलही वापरू शकता. त्यानंतर रोज वॉटर स्प्रे करून स्किन टोन अप करावी. नंतर त्वचेनुसार मॉइस्चरायझिंग करावे. 

    आठवड्यातून दोन वेळा स्किन स्क्रब करावी. डेड स्किन निघून जाते आणि टॅनही कमी होतो. त्यासाठी शुगर, कॉफी आणि ऑलिव्ह ऑइल सम प्रमाणात मिक्स करून हळुवार स्क्रबिंग करावे. त्वचा ऑइली असेल तर उटण्याचे स्क्रब वापरावे. त्यामुळे त्वचेतील अतिरिक्त ऑइल कमी होऊन चेहरा फ्रेश दिसेल. 

    आठवड्यातून तीन वेळा फेस पॅक लावावा. नॉर्मल आणि ड्राय स्किनसाठी साधे ओट्स आणि दही मिक्स करून पॅक तयार करावा. १५ मिनिटांनी धुऊन घ्यावा. तसेच, त्वचा जर ऑइली असेल तर क्ले पॅक लावावा, जसे मुलतानी चंदन पावडर मिक्स करून किंवा बेसन आणि दही, त्यात चिमूटभर हळद मिक्स करून पॅक लावावा. १५ मिनिटांनी धुऊन घ्यावा. इन्स्टन्ट ग्लो दिसेल. शीट मास्कदेखील उत्तम असतात. अल्टरनेट डे तुम्ही क्ले व शीट मास्क आणि एखादवेळी घरगुती मास्क असे रुटीन ठरवू शकता. 
    चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या असतील तर चंदन आणि तुलसी पावडरचा लेप लावावा. जमल्यास त्यात कडुलिंबाच्या पानांची पावडरपण मिक्स करू शकता. हा पॅक वापरल्यास त्वचा हील होऊन मुरूम पुटकुळ्या कमी होतात.

    योग्य आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. बॅलन्स्ड डाएट आणि भरपूर पाणी शरीराला आणि त्वचेला निरोगी ठेवते. 

    फेस्टिव्हलसाठी तयार होत असताना फक्त चेहऱ्याचीच नव्हे तर केसांची, हाताची, पायांची, निगा राखणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करावे. पाठीला निग्लेक्ट करून चालणार नाही, त्यामुळे बॅक पॉलिशही नियमित करावे. 

    काही घरगुती उपचार, तर काही बाजारात उपलब्ध असलेले ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरून तुम्ही आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता. काही स्किन प्रॉब्लेम असल्यास तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. 

वरील सर्व टिप्स तुम्ही वेळ असेल तसा किंवा वेळात वेळ काढून नक्की करून बघा. कारण सणांसाठी घर सजवू, पण त्या घराला खरी शोभा तुमच्यामुळे. त्यामुळे तयारी करा ॲण्ड बी फेस्टिव्हल रेडी.

संबंधित बातम्या