पुस्तक दिन शब्दकोडे 

किशोर देवधर
सोमवार, 25 एप्रिल 2022

पुस्तक दिन शब्दकोडे 

आडवे शब्द : 
१.     आधुनिक भाषातील बाबा पद्मनजी लिखित १८५७मध्ये प्रकाशित झालेली पहिली मराठी कादंबरी, मात्र मराठी साहित्याचा प्रवास कथासंग्रहापासून सुरू झाला, 
६.     अभिमान, प्रतिज्ञा, 
७.     ताकात आले वगैरे घालून केलेला कालवणाचा एक प्रकार, 
८.     नहर, कालवा किंवा जमिनीवर बसण्याचे लाकडी साधन, 
९.     ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी ३९वा सर्वात प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या साहित्यकाराचे टोपणनाव, 
१०.     भाव, किंमत, 
११.     इस्लाम धर्माचा प्रमुख ग्रंथ, 
१३.     बासुंदीपेक्षा जास्त दूध आटवून केलेले एक पक्वान्न, 
१६.     जबरी चोरी करणारा, दरोडेखोर, 
१७.     निवडक लेखांच्या ‘अक्षरमाधव’ या संग्रहाबद्दल साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले वैदर्भीय राजकीय नेते, 
१८.     मरातब, पदवी, 
२०.     घुसळण्याची क्रिया, 
२१.     चिरीमिरी, विडीकाडीसाठी दिलेले पैसे, 
२३.     देशाचे, प्रांताचे दोन तुकडे, 
२४.     हातमागावर विणलेले वस्त्र जे गांधींजींमुळे प्रसिद्ध झाले, 
२५.     शरीरयष्टी किंवा मुकटा, 
२६.     काम करणारा पैसा, 
२७.     क्रौंच, चक्रवाक पक्षी, 
२९.     आदळआपट, डोक्यात राख घालणे, 
३०.     मराठी समाजास दिशा देणारा म्हणून ज्याचे वर्णन केले जाते तो मुकुंदराज यांचा काव्यसंग्रह ज्यात शंकराचाऱ्यांच्या वेदांतावर निरुपणात्मक विवेचन केले आहे,
 
उभे शब्द : 
१.     संन्यासी, विरक्त, 
२.     मंत्र्याच्या नावामागे लावण्यात येणारे मानाचे विशेषण, 
३.     चेला, शिष्य, 
४.     डाक, पत्रे, 
५.     अभिनेता, भूमिका वठवणारा, 
६.     मराठीतील अजरामर रहस्यकथा लेखक, चंद्रकांत चव्हाण असे मूळ नाव असलेल्या या लेखकाची १०९२ कथा लिहिल्यावर ‘गिनीज बुक’मध्ये नोंद झाली होती, 
१०.     बखर वाचण्यासाठी या शिवकालीन लिपीचे ज्ञान आवश्यक, 
१२.     चीनमधील डनहयुआंग येथील बौद्ध भिक्षूने प्रकाशित केलेले जगातील पहिले छापील पुस्तक, मजकुराचे लाकडी ठसे करण्यात आले होते आणि ते चीनमध्ये तयार झालेल्या कागदावर उमटवून हे पुस्तक मुद्रित करण्यात आले होते, 
१४.     मराठीतील पहिले चरित्रपर पुस्तक, दया पवार यांनी शब्दबद्ध केलेल्या या पुस्तकात दलित साहित्यावर प्रकाश टाकण्यात आला होता, 
१५.     मराठी कवितेचे जनक केशवसुत यांनी प्रचलित केलेला शब्द ज्याचा अर्थ झापाटलेले जगणे असा आहे किंवा ‘जा मुली जा’ असे वाक्य वेगाने उच्चारल्यास असा ध्वनी ऐकू येतो, 
१८.     जडीबुटीचे वस्त्र, 
१९.     ब्याद, नसती पीडा, 
२२.     ठिणगी किंवा छोटी लढाई, 
२६.     गुरे बांधण्याची लांब दोरी, 
२७.     संत, सज्जन, 
२८.     पूर्ण भरतीची वेळ किंवा संवत्सर

संबंधित बातम्या