बुकशेल्फ

रोहित हरीप
गुरुवार, 24 मे 2018

बुकशेल्फ
 

वेड्यांची शर्यत
लेखक : उत्तम कांबळे
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे
किंमत : १४० रुपये.   पाने : ११२

काळजात धावतोय ससा... 
लेखक : उत्तम कांबळे
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे
किंमत : १४० रुपये.   पाने : १११

आयुष्याच्या वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर अनेक माणसे भेटत असतात. या माणसांच्या चेहऱ्यामागे दडलेल्या असतात अनेक अनामिक गोष्टी, काही किस्से, प्रत्येकाच्या आयुष्याच्या संघर्ष ... लेखकाच्या फिरस्तीत अशी अनेक माणसे त्यांना भेटली.  वास्तव आयुष्याचे अनेक पदर या प्रवासात लेखकासमोर उलगडत गेले. हे अनुभव टिपण्याचे कसब लेखकाकडे होते. आयुष्यात भेटलेल्या माणसांच्या जगणाच्या या कथा या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आल्या आहेत.


अपराजित
लेखक : नितीन साठे
अनुवाद : सुनीती जैन
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे
किंमत : २५० रुपये
पाने : १९२
भारतीय वायुसेनेतला तडफदार फ्लाइंग ऑफिसर अनिल कुमार उज्वल भवितव्याची चित्रे रंगवत असताना एका विचित्र अपघातात कायमचा जायबंदी होतो. आकाशात उडणारे त्याचे आयुष्य हॉस्पिटलमधल्या पलंगापुरते मर्यादित होऊन जाते. या अपघाताने खचून न जाता, तो निराशेची भावना झटकून टाकतो आणि उर्वरित आयुष्य अर्थपूर्ण बनवतो. पूर्णतः अंथरुणाला खिळलेला हा सैनिक हार न मानता आयुष्य कसे जगावे याचा एक वस्तुपाठ घालून देतो. प्रेरणादायक आयुष्याची ही कथा नितीन साठे यांनी सदर पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.


विदेश - दर्शन
लेखक : यशवंतराव चव्हाण
संग्राहक-संपादक : रामभाऊ जोशी
प्रकाशक : सुरेश एजन्सी, पुणे
किंमत : ३५० रुपये
पाने : ३११
महाराष्ट्राचे भूषण असलेले यशवंतराव चव्हाण एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून देशात आणि परदेशातही प्रसिद्ध होते. भारताचे विदेश मंत्री, अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री या नात्याने त्यांना विविध देशांचा दौरा करण्याची संधी मिळाली. या दौऱ्यादरम्यान वेगवेगळ्या देशांमधील संस्कृती, निसर्ग, खानपान यांचा आस्वाद त्यांनी घेतला त्याच बरोबर वेगवेगळ्या लोकसमुदायांनाही त्यांना भेटता आले. हे सर्व अनुभव यशवंतराव पत्र लिहून आपल्या पत्नीला नियमितपणे कळवत असत. ही सर्व पत्रे स्वतः यशवंतरावांनी त्यांचे मित्र आणि चरित्रकार रामभाऊ जोशी यांच्याकडे सोपवली होती. या सर्व पत्रांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.मध्यम वर्ग
संपादक : राम जगताप
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत : ३५० रुपये
पाने : २७२
मध्यम वर्ग हा शब्द आपल्या कानावर वरचेवर पडत असला तरी या शब्दाची शास्त्रीय आणि प्रमाणित अशी व्याख्या करता येत नाही. हा वर्ग समाजकारण असो, राजकारण असो किंवा अर्थकारण सर्वच क्षेत्रांत कायम महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. या वर्गाची उत्पत्ती केव्हा आणि कशी झाली इथपासून ते या वर्गाची जीवनशैली. त्यांचे आचारविचार पद्धती, राजकीय जाणिवा अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या लेखांचा संग्रह सदर पुस्तकात करण्यात आला आहे. अरुण टिकेकर, कुमार केतकर, सुहास पळशीकर यासारख्या मान्यवरांचे लेख असणारे हे पुस्तक नक्कीच संग्रही असायला हवे.एसीएन नंबियार
लेखक : वपाला बालचंद्रन
अनुवाद : सुजाता गोडबोले 
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत : ३५०
पाने : ३१७
एसीएन नंबियार... हे नाव कधी कुठे ऐकल्याचे, वाचल्याचे आठवत नाही. इतिहासातसुद्धा या नावाचे फारसे उल्लेख नाही. पण या माणसाने स्वातंत्र्यपूर्व काळात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली होती. ही कामगिरी त्यांच्यावर सोपवली होती खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अत्यंत विश्‍वासू राजनैतिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या आणि पडद्याआड राहून अनेक मोहिमा चोख पार पाडणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारे पुस्तक.

संबंधित बातम्या