रिसर्चमधील करिअर खुणावतेय 

भूषण जोशी, आयुका, पुणे 
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
उत्तम संधी देणाऱ्या इंजिनिअरिंग करिअरमध्ये आपल्याकडे एक महत्त्वाचा घटक मात्र उपेक्षित राहतो, तो म्हणजे संशोधन (रिसर्च). ‘भारतात संधी कुठे आहेत पण?’ हा वरील वाक्‍यावर हमखास विचारण्यात येणारा प्रश्न. काहींच्या मते इंजिनिअर फक्त सॉफ्टवेअर लिहिण्यापुरते असतात. हे संशोधन वगैरे शास्रज्ञ करतात. इंजिनिअर आणि संशोधन हे आपल्याकडे पचनी पडायला थोडंसं अवघड समीकरण.

बारावीची परीक्षा संपली की बहुतांश विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते ती म्हणजे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स exam ची. आजकाल पालकचं काय, पण पाल्यांचंदेखील करिअरसंबंधी मत ‘सेट’ असत, इंजिनिअरिंग ! एक हमखास, सहा आकडी पगार देणारं आणि बोनसमध्ये परदेशात स्थाईक होण्याची (सुवर्ण) संधी देणारं (सोपं) करिअर म्हणून इंजिनिअरिंगकडे पाहिलं जातं.
भारतात सोडा, पण फक्त पुण्यातून दरवर्षी इंजिनिअर होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अफाट आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये मार्कांसाठी सुरू झालेली स्पर्धा इंजिनिअरिंगनंतर लागलेल्या नोकरीत टिकण्यासाठी, प्रमोशनसाठी आणि on site साठी सुरूच राहते.  
मला माझ्या इंजिनिअरिंगच्या प्रोफेसरांनी सांगितलेलं एक वाक्‍य नेहमी आठवतं आणि ज्याच्याशी मी सहमत आहे ते म्हणजे ‘‘ 
इंजिनिअरला कोणत्याही एन्विरोन्मेंटमध्ये टाका, तो स्वतःला सेट करून घेतो.’’ यामुळेचं की काय, इंजिनिअरची डिमांड अजूनही जास्तच आहे. उत्तम संधी देणाऱ्या इंजिनिअरिंग करिअरमध्ये आपल्याकडे एक महत्त्वाचा घटक मात्र उपेक्षित राहतो, तो म्हणजे संशोधन (रिसर्च). ‘भारतात संधी कुठे आहेत पण?’ हा वरील वाक्‍यावर हमखास विचारण्यात येणारा प्रश्न. काहींच्या मते इंजिनिअर फक्त सॉफ्टवेअर लिहिण्यापुरते असतात, हे संशोधन वगैरे शास्रज्ञ करतात. इंजिनिअर आणि संशोधन हे आपल्याकडे पचनी पडायला थोडंसं अवघड समीकरण.  शालेय जीवनात मला खगोल शास्त्राची भयानक आवड होती. शाळेतील शिक्षकांनी त्यांना जमेल तेव्हढं प्रोत्साहन दिलं. घरात वातावरण पूर्ण technical, त्यातच इलेक्‍ट्रॉनिक्‍सची आवड निर्माण झाली. घरच्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं (पोरगं इंजिनिअर होऊन सेटल होईल ही सामान्य पालकांसारखी भाबडी आशा). विज्ञान विषय घेऊन जेव्हा बारावी झालो तेव्हा खूप मोठं प्रश्नचिन्ह समोर होतं.

संशोधन की इंजिनिअरिंग!
या सगळ्या वैचारिक कलहात विजय झाला तो इंजिनिअरिंगचा. इंजिनिअर होऊन नोकरी करण्यापेक्षा entrepreneur होण्याकडे जास्त भर दिला. माझ्या पालकांनासुद्धा पोरगं ‘सेटल’ झाल्याचं कौतुक वाटलं; पण मनात संशोधनाची एक अतृप्त इच्छा घर करून होतीच. बायकोने हे ओळखून एकदा एका नोकरीसंबंधी जाहिरात दाखवली आणि ती माझ्यासाठी खास होती. कारण, आयुका (IUCAA) संस्थेला खगोल शास्त्रातील  उपकरणासाठी इंजिनिअर हवा होता. मी संधी न सोडता त्याचा फायदा घेतला आणि आज पूर्णतः इंजिनिअर असून, खगोलशास्रात संशोधन करतो आहे. आयुकात आल्यावर मला या क्षेत्रात माझ्यासारखी इंजिनिअर असून काम करणारी भरपूर लोकं भेटली. एव्हढंच नाही, तर इस्रोसारख्या नामवंत भारतीय संस्थेसोबत काम करण्याचीदेखील संधी मिळत आहे.
लहानपणी आवड म्हणून छोट्या दुर्बिणीने आकाश बघता बघता आता मला आयुकाच्या मीटर व्यासाच्या दुर्बिणीवर काम करण्याची संधीसुद्धा मिळाली. माझ्या टीमने केलेल्या संशोधनामध्ये आता भारताबाहेरील संस्थासुद्धा रस घेत आहेत. आयुकात भारतीय प्रकल्पासोबतच काही बहुराष्ट्रीय प्रकल्पसुद्धा आहेत, जसे TMT (Thirty Meter Telescope, तीस मीटर दुर्बीण)  जी जगातील सगळ्यात मोठ्या दुर्बिणींपैकी एक असेल. भारताबरोबर अजून काही देश एकत्र या दुर्बिणीवर काम करत आहेत. नुकताच LIGO (The Laser Interferometer Gravitational-wave observatory) हा बहुराष्ट्रीय प्रकल्प भारतात येऊ घातला आहे. असे कित्येक प्रकल्पांसाठी भविष्यात इंजिनिअरची गरज नक्कीच भासू शकते.
‘भारतात संधी कुठे आहेत पण?’ या प्रश्नाला उत्तर म्हणून जर फक्त गुगल सर्च केलंत तर भारतात अशा अनेक संशोधन संस्था सापडतील, ज्यामध्ये निष्णात इंजिनिअरर्सची गरज दिसेल. माझ्यासारखी संशोधनात आवड असलेल्या आणि इंजिनिअरिंगनंतर काय, हा प्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयुकाची निवड प्रक्रिया खाली देत आहे. आयुकात इंजिनिअरिंग नंतर तुम्ही खगोलशास्त्रात  Ph.D. करू शकता. त्यासाठी तुम्हाला INAT ही प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. या संबंधीची सगळी माहिती खालील लिंकवर तुम्हाला मिळेल. https://www.iucaa.in/~inat/

 • आयुकातील संशोधनातील नोकरीविषयक संधींची माहिती तुम्हाला खालील लिंकवर मिळेल https://www.iucaa.in/Opportunities.html
 • जर तुम्हाला संशोधनात आवड असेल आणि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी असाल, तर तुम्ही इंटर्नशिपसुद्धा करू शकता.
 • IIST (Indian Institute of Space Science and Technology) ध्ये खाली दिल्याप्रमाणे तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. 
 • B.Tech. in Aerospace Engineering ( ४ year )
 • B.Tech. in Electronics & Communication Engineering (with specialization in Avionics)  (४ year )
 • Dual Degree (B.Tech. + Master of Science/Master of Technology)  ( ५ year )
 • Dual Degree programme leads to B.Tech. degree in Engineering Physics and any of the following Post-Graduate degree specializations (५ year)
 • Master of Science (Astronomy & Astrophysics) 
 • Master of Technology (Earth System Science) 
 • Master of Science (Solid State Physics) 
 • Master of Technology (Optical Engineering) (There is no exit option at the end of four years).
 • IIST ची खासीयत म्हणजे शिक्षण पूर्ण झालं की लगेच तुम्ही इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ORGANISATION) ध्ये रुजू होऊ शकता. अर्थात, त्यासाठी मार्कांची अट नक्कीच आहे. अधिक माहिती, अटी आणि नियम तुम्हाला खालील लिंकवर मिळतील. https://www.iist.ac.in/admissions/undergraduate

जर तुम्ही इलेक्‍ट्रॉनिक्‍स, कॉम्पुटर, कम्युनिकेशन अथवा मेकॅनिकल इंजिनिअर असाल तर  IIA (Indian Institute of Astrophysics) या संस्थेत तुम्ही M.Tech + Ph.D. असा एकत्रित कोर्स करू शकता जो ॲस्ट्रॉनॉमिकल इंस्ट्रुमेंटेशन मध्ये असतो. यात कमीतकमी पहिली दोन वर्ष M.Tech कोर्स जो Department of Applied Optics and Photonics, University of Calcutta (CU) शी संलग्न असून, कोलकात्यात पूर्ण करावा लागतो. साधारण या संपूर्ण कोर्सचा कालावधी हा ६ वर्षांचा असून, या दरम्यान तुम्हाला सरकारी नियमांनुसार छात्रवृत्तीदेखील मिळते. प्रवेश प्रक्रियेची माहिती तुम्हाला खालील लिंकवर मिळेल  https://www.iiap.res.in/intmtech.html

 • IISER (Indian Institutes of Science Education and Research)  या संस्था बऱ्हाणपूर, भोपाळ, कोलकाता, मोहाली, पुणे, तिरुवनंतपुरम आणि तिरुपती या शहरांमध्ये स्थित आहे. IISER पुणे येथे खालीलप्रमाणे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
 • BS-MS Programme
 • Integrated Ph.D. Programme
 • Ph.D. Programme
 • International Ph.D. प्रोग्रॅम

खालील चॅनेलद्वारे ईसारमध्ये प्रवेश घेता येतो. 

 • Kishore Vaigyanik Protsahan Yojana (KVPY) channel
 • Joint Entrance Examination (JEE-Advanced) of the Indian Institutes of Technology
 • State and Central Boards Channel (SCB) 
 • खालील लिंकवर प्रवेश पात्रतेची पूर्ण माहिती मिळेल. https://www.iiseradmission.in/eligibility/
 • बहुतेक सर्व IISER ध्ये बायॉलॉजी, केमिस्ट्री, गणित आणि फिजिक्‍स विषयात कोर्स उपलब्ध आहेत. काही खास विषयातील अभ्यासक्रम तुम्ही ज्या त्या IISER च्या वेबसाइटवर पाहू शकता.
 •     जेव्हा तुम्ही खरंच तुमच्या आवडीचं करिअर निवडता, तेव्हा खालील ओळ १००% पटते 

‘‘You should make your passion into your career, so you’ll never work a day in your life.’’  

संबंधित बातम्या