योगाभ्यास

सुरेश वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जगभरातील लाखो व्यक्तींनी आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये योगाचा अंतर्भाव केला. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सक्षमता प्रदान करण्याची योगामधील शक्ती लोकांच्या ध्यानात आली. त्यामुळे हे करिअरसाठी एक वेगळे क्षेत्र ठरू शकते.

योगाकडे कोणत्याही वयोगटातील नागरिक सुलभतेने वळू शकतात हे त्याचे सर्वात मोठे बलस्थान. वयोमान, प्रकृती आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारची योगिक आसने करता येणे शक्य आहे. तज्ज्ञांच्या मते योगासनांच्या सातत्यपूर्ण सरावामुळे, गॅमा ॲमिनोब्युट्रिक ॲसिडची निर्मिती होते, त्यामुळे तणाव कमी होतो. वेगवेगळ्या भीतीची तीव्रता कमी होते. आनंदाच्या पातळीत वाढ होते.
योगासनांचे हे फायदे लक्षात घेऊन त्याचे उत्तम पद्धतीने मार्केटिंग करता येणे शक्य आहे. या विषयात कौशल्य मिळवल्यास ऑनलाइन पद्धतीनेही वेगवेगळ्या वयोगटांसाठी योग प्रशिक्षणाचे आयोजन करता येऊ शकते. फेसबुक, यूट्युबसारख्या समाजमध्यमांचा उपयोग करून संभाव्य ग्राहकांशी थेट संपर्क साधणे शक्य आहे. त्यासाठी आपली संपर्कसाखळी (नेटवर्किंग) वाढवावी लागेल. असा संपर्क साधल्यावर त्यांना योगाविषयी सातत्यपूर्ण माहिती देणे, त्यांच्या शंकाचे निरसन करणे आणि त्यांना योगाकडे वळण्यास प्रवृत्त करणे शक्य होऊ शकते. फेसबुक लाइव्ह, इन्स्टाग्रामवरील स्टोरीज्, शंकासमाधान करणारी प्रश्नोत्तरे, ब्लॉग, पॉडकास्ट याद्वारे ग्राहकांना बांधून ठेवणे शक्य होऊ शकते. या क्षेत्रातले तुमचे ज्ञान आणि त्याचे सतत केलेले उन्नतीकरण (अपग्रेडेशन) यामुळे संबंधित व्यक्ती यात तज्ज्ञ होऊ शकते. यामुळे अधिकाधिक ग्राहक आकर्षित होऊ शकतात.

योग इन्स्टिट्यूट  
मुंबईतील सांताक्रुझ येथे असणाऱ्या या संस्थेची स्थापना १९१८ साली, श्री योगेंद्रजी यांच्यामार्फत करण्यात आली. १०२ वर्षांचा इतिहास असणारी ही संस्था आपल्या देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक जुन्या योगविद्या संस्थांपैकी एक आहे. योगविद्येचा प्रचार आणि प्रसार यात या संस्थेने बजावलेल्या महत्त्वाच्या कामगिरीबद्दल २०१८-१९ साली पंतप्रधानांच्या हस्ते संस्थेला ‘सर्वोत्कृष्ट संस्था’ म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

अभ्यासक्रम - या संस्थेमार्फत वेगवेगळ्या कालावधीचे ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासक्रम चालवले जातात. (१) टीचर्स ट्रेनिंग कोर्स, (२) योगसूत्र सर्टिफिकेट कोर्स, (३) ॲडव्हान्स्ड रेग्युलर योगा टिचर क्लासेस, (४) योगा थेरपी कोर्स, (५) रेग्युलर गायडेड मेडिटेशन क्लासेस, (६) सर्टिफिकेशन प्रोग्रॅम ऑन योग फॉर कॅन्सर, (७) योग सायकॉलॉजी, (८) 21 डेज बेटर लिव्हिंग कोर्स, (९) योग प्रयास, (१०) आसन ऑनलाइन क्लासेस.

संपर्क : श्री योगेंद्र मार्ग प्रभात कॉलनी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई- ४०००५५, दूरध्वनी- ०२२-२६१२२१८५, ईमेल- info@theyogainstitute.org

अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूट
पुणे येथे असणाऱ्या रम्माणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूट मार्फत अय्यंगार योगाचे प्रशिक्षण दिले जाते. ही संस्था योगाचार्य बी. के. एस अय्यंगार यांनी १९७५ साली स्थापन केली. 
संपर्क : ११५०७, बी/१, हरे कृष्ण मंदिर रोड, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे- ४११०१६, दूरध्वनी- ०२०-२५६५६१३४, संकेतस्थळ- https://bksiyengar.com

शारीरिक शिक्षण महाविद्यालय 
अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामार्फत शारीरिक शिक्षण महाविद्यालय चालवण्यात येते. या महाविद्यालयाच्या योग विभागाने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. 

(१) बी.ए.(योगशास्त्र), पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण, कालावधी- ३ वर्षे, (२) एम.ए. (योगशास्त्र), पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- २ वर्षे, (३) डिप्लोमा इन योग एज्युकेशन, पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- १ वर्ष, (४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी, पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी-२ वर्षे.
संपर्क : शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती-४४४६०५, दूरध्वनी- ०७२१-२५७३७८८, फॅक्स- २५७२७५७, ईमेल-principal.dcpe@hvpm.org, संकेतस्थळ- dcpehvpm.org

गोरधनदास सेकसारिया कॉलेज ऑफ योग ॲण्ड कल्चरल सिंथेसिस 
कैवल्यधाम या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या महाविद्यालयातील लघु मुदतीचे अभ्यासक्रम खालीलप्रमाणे-

 • सर्टिफिकेट कोर्स इन योगा - हा चार आठवड्यांचा अभ्यासक्रम असून तो जानेवारी, मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. हा अभ्यासक्रम योगा असोसिएशनची संलग्न असून योगा सर्टिफिकेट बोर्डाच्या योगा वेलनेस इन्स्ट्रक्टरच्या दुसऱ्या पातळीचा (लेव्हल टू) आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अठरा वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीस हा अभ्यासक्रम करता येतो. 
 • डिप्लोमा इन योग थेरपी- रुग्णालये/ सामाजिक/ शैक्षणिक संस्था येथे योगामार्फत आरोग्य विषयक उपचारांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. पात्रता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी आणि इंडियन योगा असोसिएशनमार्फत योगविद्येतील किमान प्रमाणपत्र अभ्यासक्रम. वयोमर्यादा नाही. अभ्यासक्रमाचा प्रारंभ १ ऑगस्ट रोजी होईल. कालावधी दोन सत्रे आणि सहा महिन्यांची इंटर्नशिप.
 • पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन योग एज्युकेशन- योग गुरू/शिक्षक होऊन या क्षेत्रात करिअर करण्यास उपयुक्त ठरण्याच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. यंदाचे सत्र ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी आणि उत्कृष्ट मानसिक व शारीरिक आरोग्य. वयोमर्यादा नाही. अभ्यासक्रमाचा कालावधी साधारणतः ९ महिने. हा अभ्यासक्रम इंडियन योगा असोसिएशनशी संलग्न असून योगा सर्टिफिकेशन बोर्डाच्या योगा टिचर ॲण्ड इव्हॅल्युअरच्या तिसऱ्या पातळीच्या (लेव्हल थ्री) अभ्यासक्रमाशी समकक्ष आहे. विद्यार्थ्यांना स्वतंत्ररीत्या इंडियन योगा असोसिएशनबरोबर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
 • बी.ए. इन योगशास्त्र- रामटेक येथे असणाऱ्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी हा अभ्यासक्रम संलग्न आहे. कालावधी- तीन वर्षे. पात्रता- कोणत्याही ज्ञानशाखेतील ४५ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण. वयोमर्यादा नाही.
 • एम.ए. इन योगशास्त्र- हा अभ्यासक्रम कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्न आहे. कालावधी दोन वर्षे. पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेचा किमान सहा महिन्यांचा योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम. वयोमर्यादा- २१ ते ६०. संपर्क :  (१) स्वामी कैवल्यधाम मार्ग, लोणावळा- ४१०४०३, दूरध्वनी- ०२११४-२७३००१, (२) ईश्वरदास चुनिलाल योगिक हेल्थ सेंटर, कैवल्यधाम, ४३ नेताजी सुभाष रोड, मरिन ड्राईव्ह, तारापोरवाला मत्स्यालयाच्या जवळ, मुंबई- ४००००२, दूरध्वनी- ०२२-२२८१८४१७, २२८१०४९४, ईमेल- kdhmayogcenter@gmail.com संकेतस्थळ- kdham.com

स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था युनिव्हर्सिटी 

 • बी.एस्सी. इन योग ॲण्ड कॉन्शसनेस (पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण, कालावधी- ३ वर्षे),  
 • एम.एस्सी. इन योग ॲण्ड कॉन्शसनेस (पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण, कालावधी - २ वर्षे), 
 • बी.एस्सी. इन नेचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्स (पात्रता - जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण, कालावधी - ५ वर्षे), 
 • बी.एस्सी. इन योग थेरपी (पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण, कालावधी - ३ वर्षे), 
 • एम.एस्सी. इन योग थेरपी (पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी -२ वर्षे), 

     योगा इन्स्ट्रक्टर कोर्स (पात्रता - दहावी उत्तीर्ण, कालावधी- एक महिना)  
संपर्क :  स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था युनिव्हर्सिटी, प्रशांती कुटिरम, विवेकानंद रोड, कल्लूबल्लू पोस्ट, जिगानी, अनेकल, बंगळूर - ५६०१०५, दूरध्वनी - ०८०- २२६३९९६८ आणि २२६३९९६१, फॅक्स - २६६०८६४५, ई-मेल- info@svyasa.edu.in आणि admissions@svyasa.org, संकेतस्थळ - http://www.svyasa.edu.in. 

इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन 
अभ्यासक्रम - १) एम.ए. इन योग एज्युकेशन, कालावधी 
दोन वर्षे. २) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग एज्युकेशन, पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष. 
संपर्क :  रजिस्ट्रार, लक्ष्मीबाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, शक्तिनगर, रेसकोर्स रोड, ग्वाल्हेर - ४७४००२, दूरध्वनी - ०७५१ - ४०००९०२, ४०००९१७, ४०००९००, फॅक्स -४०००९९२,  ई-मेल- registrar@ lnipe.edu.in आणि vc@lnipe.edu.in, संकेतस्थळ - www.lnipe.net. 

राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ 
अभ्यासक्रम - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी ॲण्ड स्ट्रेस मॅनेजमेंट, कालावधी- एक वर्ष, इंटर्नशिप- सहा महिने, पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी. अभ्यासक्रमाची संरचना पतंजली योगशास्त्रावर करण्यात आली आहे. 
संपर्क : राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती, आंध्रप्रदेश- ५१७५०७, दूरध्वनी- ०८७७- २२८७८०९, ईमेल- registrar_rsvp@yahoo.co.in, संकेतस्थळ- rsvidyapeetha.ac.in

मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग 
या संस्थेची स्थापना भारत सरकारने १९९८ साली केली. योग शिक्षण आणि प्रशिक्षणासंदर्भात सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून ही संस्था विकसित करण्यात येत आहे. 

अभ्यासक्रम
     बी.एस्सी. इन योग, कालावधी- तीन वर्षे, पात्रता- बारावी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात सरासरीने ५० टक्के गुण. प्रत्येक विषयात स्वतंत्ररीत्या उत्तीर्ण होणे आवश्यक. १ ऑगस्ट रोजी उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा अधिक नसावे. हा अभ्यासक्रम गुरू गोविंदसिंग इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

 • डिप्लोमा इन योग सायन्स, कालावधी- एक वर्ष, पात्रता- कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणप्राप्त पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी ४५ टक्के गुण. पदव्युत्तर पदवी असल्यास प्रवेशाच्या वेळी ५ टक्के वेटेज दिले जाते. वयोमर्यादा - १ ऑगस्ट रोजी ३० वर्षांपेक्षा कमी.
 • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी, कालावधी- एक वर्ष, पात्रता- ५० टक्के गुणांसह वैद्यकीय किंवा फिजिओथेरपी किंवा पॅरामेडिकल विषयातील पदवी. 
 • सर्टिफिकेट कोर्स इन योग फॉर प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर, कालावधी- ३ महिने, पात्रता- १० वी. 
 • सर्टिफिकेट कोर्स इन योग फॉर वेलनेस इन्स्ट्रक्टर, कालावधी- ३ महिने, पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी. 

     एम.एस्सी. इन योग, कालावधी- दोन वर्षे, पात्रता- ५० टक्के गुणांसह बी.एस्सी. (योग) किंवा १ वर्ष कालावधीच्या डिप्लोमा इन योग या पात्रतेसह विज्ञान, वैद्यकीय, फिजिओथेरपी, पॅरामेडिकल शाखेतील पदवी.

संपर्क :  मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग, ६८, अशोका रोड गोल डाकखाना, नवी दिल्ली- ११०००१, दूरध्वनी- ०११-२३७३०४१७/१८, फॅक्स- २३७११६५७, ईमेल- mdniy@yahoo.co.in, संकेतस्थळ- http://www.yogamdniy.nic.in/

संबंधित बातम्या