पोषण आहार तज्ज्ञ

सुरेश वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

पोषण आहाराबद्दल बरीच जाणीवजागृती झाल्याने कोरोनोत्तर काळात या क्षेत्रात करिअरच्या विविध संधीही उपलब्ध होतील.

सुदृढ मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी पोषक आहार महत्त्वाचा घटक असतो. आरोग्यदायी वजन वाढ, वजन घट, पोटाचा आकार कमी करणे यासाठी पोषण आहार तज्ज्ञ साहाय्य करतात. मधुमेहासारख्या आजाराला दूर ठेवण्यासाठी वा नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा या तज्ज्ञांचे सल्ले उपयुक्त ठरतात. सध्या काॅर्पोरेट धर्तीवरची पंचतारांकित आणि मोठी रुग्णालये सर्वत्र उभी राहत आहेत. या रुग्णालयांमध्ये इतर वैद्यकीय सेवांबरोबर पोषण आहार तज्ज्ञांची सेवा चोवीस तास उपलब्ध करून दिली जाते. अनेक आजारांमध्ये डॉक्टरमंडळी रुग्णांना विशिष्ट प्रकाराचा आहार घ्यायला सांगतात. पोषण आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारातील विविध घटकांचे नियोजन केले जाते. या विषयात कौशल्य प्राप्त तज्ज्ञांना मोठी मागणी असते. अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये हे तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्त केले जातात. खासगीरीत्याही अशी सेवा पुरवली जाते. बरेच मोठे खेळाडू, चित्रपट अभिनेते/अभिनेत्री, राजकीय नेते यांच्याकडे स्वतःचे खासगी तज्ज्ञ असतात. 
संस्था आणि अभ्यासक्रम 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन-
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेने पोषण आहारातील संशोधन क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी जगभर ख्याती प्राप्त केली आहे. प्रथिन ऊर्जा कुपोषणासंदर्भात संस्थेचे संशोधन महत्त्वाचे समजले जाते. प्रयोगशाळा, रुग्‍णालये आणि समाज या तीन घटकांच्या समन्वय आणि सुसूत्रिकरणाद्वारे पोषण आहारासंदर्भातील संशोधनावर संस्थेमार्फत लक्ष केंद्रित केले जाते. सध्याच्या सामाजिक व आर्थिक चौकटीस अनुसरून पोषण आहारासंदर्भातील समस्यांचे वस्तुनिष्ठ निराकरण करण्यावर भर दिला जातो. देशातील लोकसंख्येच्या विविध स्तरातील पोषण आहाराच्या समस्या जाणून घेतल्या जातात. यासंदर्भातील समस्यांच्या प्रभावी निराकरणाचे व्यवस्थापन केले जाते. राष्ट्रीय पोषण कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे, पोषण आहारासंदर्भात तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करणे, शासनाला सल्ला देणे ही कामेही या संस्थेकडून अपेक्षित आहेत.
उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद 

(१) एम.एस्सी. इन क्लिनिकल न्यूट्रिशन, पात्रता- बी.एस्सी. इन होम सायन्स/ ॲप्लाइड न्यूट्रिशन/ बायोकेमिस्ट्री/ नर्सिंग किंवा बी.एस्सी. इन न्यूट्रिशन/ फूड ॲण्ड न्यूट्रिशन/ होम सायन्स/ प्राणिशास्त्र/ ॲप्लाइड न्यूट्रिशन ॲण्ड पब्लिक हेल्थ/ क्लिनिकल न्यूट्रिशन ॲण्ड डायेटेटिक्स/ फूड सायन्स किंवा न्यूट्रिशन डायेटेटिक्स किंवा एमबीबीएस. कालावधी - दोन वर्षे. प्रवेश चाळणी परीक्षेद्वारे. 

(२) एम.एस्सी. इन स्पोर्ट्स न्यूट्रिशन, पात्रता- बी.एस्सी. इन होम सायन्स/ न्यूट्रिशन/ फूड न्यूट्रिशन/ ॲप्लाइड न्यूट्रिशन ॲण्ड पब्लिक हेल्थ/ क्लिनिकल न्यूट्रिशन ॲण्ड डायेटेटिक्स/ फूड सायन्स ॲण्ड क्वालिटी कंट्रोल किंवा बी.एस्सी. इन लाइफ सायन्स (वनस्पती शास्त्र/ प्राणिशास्त्र/ जैवरसायनशास्त्र/ पोषण आहार/ गृहविज्ञान/ सूक्ष्मजीवशास्त्र/अनुवंश शास्त्र) किंवा एमबीबीएस/ बीएएमएस. कालावधी - दोन वर्षे. प्रवेश चाळणी परीक्षेद्वारे. 

(३) पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन न्यूट्रिशन, कालावधी - १० आठवडे, पात्रता - जैविकशास्त्र किंवा जैववैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा एमबीबीएस/ बीडीएस/ बीएएमएस/ बीएचएमएस/ बीपीटी/ बीयूएमएस. संपर्क ः हेड एक्स्टेंशन ॲण्ड ट्रेनिंग डिव्हिजन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, जामिया-उस्मानिया, हैदराबाद- ५००००७, दूरध्वनी- ०४०-२७१९७२४७, संकेतस्थळ- nin.res.in, ईमेल-petninhyd@yahoo.com

एसएनडीटी विद्यापीठ

 • पीएचडी इन फूड सायन्स ॲण्ड न्यूट्रिशन, कालावधी - ३ ते ६ वर्षे, पात्रता - संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी. 
 • मास्टर्स इन फूड सायन्स ॲण्ड न्यूट्रिशन, कालावधी - २ वर्षे, पात्रता - संबंधित विषयातील  पदवी. 
 • मास्टर्स इन क्लिनिकल न्यूट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स, कालावधी - २ वर्षे, पात्रता - संबंधित विषयातील पदवी. 
 • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स, कालावधी - १ वर्ष आणि ४ महिने इंटर्नशिप, पात्रता - संबंधित विषयातील पदवी. 
 • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन न्यूट्रिशन ॲण्ड फूड प्रोसेसिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, कालावधी - १ वर्ष आणि ४ महिने इंटर्नशिप, पात्रता - संबंधित विषयातील पदवी. 
 •  पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स सायन्स, फिटनेस ॲण्ड न्यूट्रिशन, कालावधी - १ वर्ष आणि ४ महिने इंटर्नशिप, पात्रता - संबंधित विषयातील पदवी. हे अभ्यासक्रम केल्यावर अन्नपदार्थ प्रयोगशाळांमध्ये संशोधक म्हणून संधी मिळू शकते. अन्न सुरक्षा, अन्नपदार्थ उद्योगांमध्ये गुणवत्ता निरीक्षक/अधिकारी, पोषण आहार सल्लागार, अन्नपदार्थ निर्मिती उद्योग, अन्नपदार्थ सेवा आणि व्यापार कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते.
 • सर्टिफिकेट कोर्स इन डायबेटिक केअर ॲण्ड एज्युकेशन. 

संपर्क ः डिपार्टमेंट ऑफ फूड सायन्स ॲण्ड न्यूट्रिशन, एसएनडीटी वूमेन्स युनिव्हर्सिटी, जुहू कॅम्पस, सर विठ्ठल विद्याविहार, जुहू रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई- ४०००४९, दूरध्वनी- ०२२-२६६०८८५५, संकेतस्थळ- http://fsn.sndt.ac.in/, ईमेल- fsn@sndt.ac.in

कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतन (मुंबई) 

 • एम.एस्सी. होम सायन्स इन फूड, न्यूट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स, 
 • एम.एस्सी. इन स्पोर्ट्स न्यूट्रिशन, कालावधी - २ वर्षे, पात्रता - कोणत्याही विषयातील बी.एस्सी. होम सायन्स किंवा बी.एस्सी. बायोकेमिस्ट्री/ बी.एस्सी.- जैविकशास्त्र/ बी.एस्सी.- नर्सिंग/ फिजिओथेरपी. हा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम आहे. 
 • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स ॲण्ड ॲप्लाइड न्यूट्रिशन, कालावधी- एक वर्षे आणि दोन महिने इंटर्नशिप, पात्रता- बी.एस्सी (होम सायन्स/ बी.एस्सी-मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ लाइफ सायन्स) संपर्क : निर्मला निकेतन, कॉलेज ऑफ होम सायन्स, ४९, न्यू मरिन लाइन्स, मुंबई- ४०००२०, दूरध्वनी- ०२२-२२०७६५०३, फॅक्स- २२००३२१७, संकेतस्थळ-www.nirmalaniketan.com, ईमेल- office@nnchsc.edu.in

नागपूर विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ होम सायन्स 
या संस्थेत एम.एस्सी. इन फूड सायन्स ॲण्ड न्यूट्रिशन हा दोन वर्षे कालावधीचा आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल न्यूट्रिशन ॲण्ड पेशंट काउन्सिलिंग हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. संपर्क : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, रवींद्रनाथ टागोर मार्ग, नागपूर- ४४०००१, दूरध्वनी- ०७१२-२५००३७०, संकेतस्थळ- www.nagpuruniversity.org

सोफिया कॉलेज फॉर वूमेन, मुंबई

 • सर्टिफिकेट कोर्स फॉर डाएट ट्रेनर्स, 
 • सर्टिफिकेट कोर्स ऑन बेसिक्स इन फूड ॲण्ड न्यूट्रिशन.  पात्रता - कोणत्याही शाखेतील बारावी, कालावधी - एक वर्ष.

संपर्क : सोफिया कॉलेज फॉर वूमेन, भुलाबाई देसाई रोड, मुंबई - ४०००२६, दूरध्वनी- ०२२-२३५१२६४२, फॅक्स- २३५१३१८३, संकेतस्थळ- www.sophiyacollegemumbai.com, ईमेल- sophiyacollegemumbai@gmail.com

फूड ॲण्ड न्यूट्रिशन डिपार्टमेंट, दिल्ली विद्यापीठ

 • एम.एस्सी. इन फूड ॲण्ड न्यूट्रिशन, पात्रता - ५५ टक्के गुणांसह बी.एस्सी. - होम सायन्स (ऑनर्स) - स्पेशलायझेशन इन फूड ॲण्ड न्यूट्रिशन, निवड चाळणी परीक्षेद्वारे, कालावधी - दोन वर्षे
 • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स ॲण्ड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन, पात्रता - ५० टक्के गुणांसह बी.एस्सी. - होम सायन्स/ बी.एस्सी फूड टेक्नॉलॉजी/ बी.एस्सी. - मायक्रोबायोलॉजी/ बी.एस्सी.- बायोकेमिस्ट्री/ बी.एस्सी.- नर्सिंग. निवड - या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर. कालावधी - एक वर्ष 
 • पीएचडी इन फूड ॲण्ड न्यूट्रिशन. संपर्क : लेडी इरविन कॉलेज, सिकंदरा रोड, नवी दिल्ली- ११०००१, टेलिफॅक्स- ०११-२३७११२२२, संकेतस्थळ- www.ladyirwin.edu.in, ईमेल- director@lic.du.ac.in

स्कूल ऑफ कंटिन्यूईंग एज्युकेशन

 • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कंटिन्यूईंग एज्युकेशन मार्फत पुढील अभ्यासक्रम चालवले जातात.
 • मास्टर ऑफ सायन्स इन फूड ॲण्ड न्यूट्रिशन, कालावधी किमान दोन वर्षे, पात्रता - बी.एस्सी. होम सायन्स वुईथ स्पेशलायझेशन इन फूड ॲण्ड न्यूट्रिशन/ डायटेटिक्स/ क्लिनिकल न्यूट्रिशन
 • ग्रॅज्युएट डिप्लोमा इन न्यूट्रिशन ॲण्ड हेल्थ एज्युकेशन, कालावधी - एक वर्ष, पात्रता - कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.
 • संपर्क : स्कूल ऑफ कंटिन्यूईंग एज्युकेशन, रूम नंबर-१०१, ब्लॉक-जी, झाकिर हुसेन भवन, आयजीएनओयू, मैदान घारी, 

नवी दिल्ली- ११००६८, दूरध्वनी- ०११-२९५७२५१३, २९५३६३४७, संकेतस्थळ- www.ignou.ac, ईमेल- soce@ignou.ac

संबंधित बातम्या