आरोग्य व्यवस्थेचा आधार

सुरेश वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

आरोग्य व्यवस्थेमध्ये केवळ डॉक्टरांचा समावेश होत नाही. कोरोना काळात डॉक्टरांच्या सोबतीनेच जगभरातील नर्सेस (परिचारकांनी) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी मोठी भूमिका बजावली. म्हणूनच या श्रेत्रात करिअरसाठी मोठी संधी उपलब्ध आहे.   

नर्सिंग  
सध्या चांगल्या प्रशिक्षित नर्सेसची गरज आणि उपलब्धता यात बरीच तफावत आहे. त्यामुळे नर्सिंगमध्ये करिअरच्या उत्तमोत्तम संधी देशविदेशात मिळू शकतात. या करिअरचा गाभा सेवा हाच असला, तरी यातून स्वतःसाठी व कुटुंबीयांसाठी उत्तम आयुष्य जगण्यासाठी संधीसुद्धा मिळते. चांगले वेतन/मानधन मिळणारे हे क्षेत्र आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये नर्सेसची गरज कधीच कमी होणारी नाही. रुग्णालयांची संख्या वाढत जाणारी आहे. त्यामुळे या पुढील काळात प्रशिक्षित नर्सेसची गरज अधिकाधिक भासणार आहे. अमेरिकेने २५ हजार नर्सेसची भरती करणार असल्याची घोषणा गेल्या वर्षीच केली होती. आता मोठ्या संख्येने पर्सनलाइज्ड म्हणजे व्यक्तिगत स्तरावरही नर्सेसची सेवा घेण्याकडे कल वाढत चालला आहे. अशा नर्सेसना चांगले सेवा-शुल्क दिले जाते. या क्षेत्रातही पदव्युत्तर पदवी आणि सूक्ष्म स्पेशलायझेशनच्या सुविधा आहेत. त्यामुळे आणखी संधी मिळू शकतात.
 इतर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही म्हणून नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा पर्याय ठेऊ नये. विद्यार्थिनींनी ठामपणे या ज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घ्यावा. पालकांनी त्यासाठी मुलींना प्रोत्साहन द्यावे. यंदा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना पुढील चार ते पाच वर्षात महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही चांगल्या संधी मिळू शकतात.

बी.एस्सी. नर्सिंग (ऑनर्स)
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स)च्या दिल्ली, जोधपूर, पाटणा, भोपाळ, भुवनेश्वर, रायपूर आणि ऋषिकेश या सहा कॅम्पस बरोबरच २०२१च्या शैक्षणिक सत्रापासून नागपूर आणि देवघर येथेही बी.एस्सी. नर्सिंग (ऑनर्स) अभ्यासक्रम करता येतो. या सर्व एम्समध्ये एकूण ६७१ जागा चाळणी परीक्षेद्वारे भरल्या जातात. भारत सरकारच्या नियमानुसार वेगवेगळ्या संवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या जातात. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमाला केवळ महिला उमेदवारांनाच प्रवेश दिला जातो. बारावीमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात, खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना सरासरीने किमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सूट असते. 

प्रवेश प्रकिया ः 
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दिल्ली एम्सच्यावतीने चाळणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीची आहे. बी.एस्सी. नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची चाळणी परीक्षा देशातील विविध केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये मुंबईचा समावेश आहे. इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची परीक्षा केवळ दिल्ली येथेच घेतली जाते. बी.एस्सी. नर्सिंग प्रवेशासाठीचा चाळणी पेपर १०० गुणांचा आणि इंग्रजी व हिंदी भाषेत असतो. या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयातील प्रत्येकी ३० गुणांचे आणि सामान्य ज्ञानावरील १० गुणांचे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. परीक्षेचा कालावधी दोन तास असतो. 

इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा चाळणी पेपर १२० गुणांचा आणि इंग्रजी व हिंदी भाषेत असतो. या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र गणित आणि रसायनशास्त्र या विषयातील प्रत्येकी ३० गुणांचे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी जीवशास्त्र किंवा गणित यापैकी कोणत्याही एका विषयाचे प्रश्न सोडवू शकतात. परीक्षेचा कालावधी दीड तास असतो. 

संपर्क ः असोसिएट डिन (एक्झाम), एआयआयएमएस, नवी दिल्ली- ११०६०८, संकेतस्थळ - www.aiims.edu, ईमेल - parr.aiims.bscmsc@gmail.com
बी.एस्सी. (नर्सिंग) हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील बहुतेक सर्व शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहे. शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. बारावी विज्ञान शाखेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या अभ्याक्रमाला प्रवेश मिळू शकतो. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 
नाशिकस्थित या संस्थेमार्फत नर्सिंग विषयाशी संबंधित पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम शासकीय वैद्यकीय व काही खासगी महाविद्यालयांमध्ये करता येतात. (१) बी.एस्सी. इन नर्सिंग, (२) बेसिक बी.एस्सी. इन नर्सिंग (३) फेलोशिप कोर्स इन ऑर्थोपेडिक अँड रिहॅबिलिटेशन इन नर्सिंग, (४) फेलोशिप कोर्स इन ऑपरेशन रूम नर्सिंग, (५) पोस्ट सर्टिफिकेट इन बी.एस्सी. इन नर्सिंग, (६) सर्टिफिकेट इन बी.एस्सी. इन नर्सिंग, (७) सर्टिफिकेट इन रिनल नर्सिंग, (८) एम.एस्सी. इन नर्सिंग.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
कोरोना प्रकोप सुरू होण्यापूर्वी राज्यात एक किंवा दोन प्रयोगशाळा होत्या. आता ही संख्या ६००च्या आसपास पोहचली आहे. वर्षभरातला हा विस्तार मोठा आहे. इतक्या प्रयोगशाळा म्हणजेच तितक्याच प्रमाणात मनुष्यबळाची गरज वाढली आहे. वैद्यकांना अधिक उत्तमपद्धतीने निदान करण्यासाठी किंवा अचूकतेपर्यंत जाणारा औषधोपचार सुचवण्यासाठी प्रयोगशाळेतील वैद्यकीय अहवाल उपयुक्त ठरतात. वेगवेगळ्या वैद्यकीय समस्यांसाठी वैद्यकांकडून चाचण्यांचा सल्ला दिला जातो. ही संख्या वाढलेली आहे, त्या प्रमाणात प्रयोगशाळा व तंत्रज्ञांची गरज वाढतच राहणार आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम करून कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना चांगल्या रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी मिळू शकते. 

काही संस्था 

 • सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स - बी.एस्सी. इन मेडिकल टेक्नॉलॉजी, संपर्क ः संकेतस्थळ - sihspune.org, ईमेल - admin@sihspune.org
 • मणिपाल कॉलेज ऑफ हेल्थ सायन्स - बी.एस्सी. इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क ः संकेतस्थळ - manipal.edu, ईमेल - admissions@manipal.edu
 • जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सायन्स - बी.एस्सी. इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क ः संकेतस्थळ - jipmer.edu.in, 
 • एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स - बी.एस्सी. इन लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क ः संकेतस्थळ - mgmuhs.com, ईमेल - registrar@mgmuhs.com,
 • डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर - सर्टिफिकेट कोर्स इन ॲडव्हान्स्ड मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरी टेक्निक, संपर्क ः संकेतस्थळ - dpu.edu.in, ईमेल - info.medical@dpu.edu.in,
 • भारती विद्यापीठ - डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क ः संकेतस्थळ - mcpune.bharatividyapeeth.edu, ईमेल - bvumedicalpune@gmail.com
 • अम्रिता सेंटर फॉर अलाइड हेल्थ सायन्सेस - बी.एस्सी. इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क ः संकेतस्थळ- aims.amrita.edu, ईमेल - ugadmissions@aims.amrita.edu,
 • के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेज ॲण्ड रिसर्च सेंटर, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क ः संकेतस्थळ - https://kjsmc.somaiya.edu/, ईमेल - somaiyamedical@somaiya.edu,
 • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

या विद्यापीठाने आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये बी.एस्सी. इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन (१) एंडोस्कोपी, (२) फॉरेन्सिक मेडिकल सायन्स, (३) हिस्टोपॅथॉलॉजी, (४) न्यूरॉलॉजी, (५) ऑपरेशन थिएटर, (६) ऑप्टिमेट्री, (७) परफ्युजन, (८) प्लॅस्टर, (९) रेडिओग्राफी, (१०) रेडिओथेरपी, (११) ट्रान्सफ्युजन मेडिसिन, (१२) ॲनेस्थेशिया, (१३) ब्लड ट्रान्सफ्युजन, (१४) कार्डिऑलॉजी, (१५) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, (१६) कम्युनिटी मेडिसिन, (१७) इमर्जन्सी मेडिसिन या विषयांचा समावेश आहे.

या विषयांच्या नावावरून नजर फिरवल्यास, वेगवेगळ्या आरोग्यविषयक बाबींसाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज लक्षात येते. हे अभ्यासक्रम कौशल्य विकसित करणारे आहेत. त्यामुळे विषयाचे ज्ञान आणि कौशल्य यात पारंगत झाल्यास अशा उमेदवारांना करिअरच्या संधी मिळू शकतात. बारावी विज्ञान शाखेतील जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेले ‍विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरतात.
संपर्क ः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, म्हासरूळ, वणी दिंडोरी रोड - नाशिक -४२२००४, दूरध्वनी - ०२५३-२५३९१००, २५३९१११, संकेतस्थळ - https://www.muhs.ac.in/contact_us.aspx, ईमेल - academic1@muhs.ac.in 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स)
एम्सच्या दिल्ली कॅम्पसमध्ये बी.एस्सी. इन मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्रॅफी (कालावधी तीन वर्षे), डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट (कालावधी साडेतीन वर्षे), डेंटल हायजिन (कालावधी साडेतीन वर्षे), ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी (कालावधी साडेतीन वर्षे), ऑप्टिमेट्री (कालावधी ४ चार वर्षे) हे अभ्यासक्रम करता येतात. 
एम्स भुवनेश्वर येथे बी.एस्सी. इन (१) मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, (२) ऑपरेशन थिएटर ॲण्ड ॲनेस्थेशिऑलॉजी टेक्नॉलॉजी, (३) मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओथेरपी, (४) मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी हे अभ्यासक्रम करता येतात. या चारही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षे.

एम्स ऋषिकेशमध्ये पुढील अभ्यासक्रम करता येतात. 

 • कालावधी चार वर्षे - बी.एस्सी. इन (१) ॲनेस्थेशिया टेक्नॉलॉजी, (२) परफ्युजन टेक्नॉलॉजी, (३) न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी, (४) बॅचलर ऑफ ऑप्टेमेट्री. 
 • कालावधी  साडेचार वर्षे - बी.एस्सी इन (१) स्लीप लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, (२) रेस्पिरेटरी थेरपी, (३) डेंटल हायजिन, (४) डेंटल रूम ऑपरेटिंग असिस्टंट
 • कालावधी तीन वर्षे - बी.एस्सी. इन (१) युरॉलॉजी टेक्नॉलॉजी, (२) रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, (३) न्युरो मॉनिटरिंग टेक्नॉलॉजी, (४) ऑर्थोपेडिक्स टेक्नॉलॉजी, (५) मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, हे अभ्यासक्रम करता येतात.
 • नागपूर एम्स येथे बी.एस्सी. इन लॅब टेक्नॉलॉजी आणि बी.एस्सी. इन मेडिसिन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम करता येतात. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे.

पात्रता : (१) बी.एस्सी. (ऑनर्स) नर्सिंग/बी.एस्सी. - मेडिकल टेक्नॉलॉजी-रेडिओग्राफी/डेंटल हायजिन/डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट/ऑप्टोमेट्री. बारावी विज्ञान शाखेची परीक्षा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/गणित आणि इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण. (डेंटल हायजिन/डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट/ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी या तीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषयाचा अभ्यास करणे आवश्यक.)

जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (JIMPER) 
या संस्थेत (१) बी.एस्सी. इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, (२) बी.एस्सी. इन रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, (३) बी.एस्सी. इन डायलिसिस टेक्नॉलॉजी, (४) बी.एस्सी. इन न्यूरो टेक्नॉलॉजी, (५)बी.एस्सी. इन न्युक्लिअर मेडिकल टेक्नॉलॉजी, (६) बी.एस्सी. इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, (७)बी.एस्सी. इन डायलिसिस टेक्नॉलॉजी, (८) बी.एस्सी. इन परफ्युजन टेक्नॉलॉजी, (९) बॅचलर इन ऑडिओलॉजी ॲण्ड स्पीच लँग्वेज पॅथालॉजी (या अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षे. सर्व अभ्यासक्रमांच्या एकत्रित जागा ५८), (१०) बी.एस्सी. इन नर्सिंग (कालावधी चार वर्षे. एकूण जागा ७५). सर्व अभ्यासक्रमांचा प्रारंभ ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होईल. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलै महिन्याच्या शेवटच्या रविवारी चाळणी परीक्षा घेण्यात येईल. 

संपर्क ः द डिन-ॲकॅडमिक, थर्ड फ्लोअर, ॲकॅडमिक सेक्शन, जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (JIMPER), ॲकॅडमिक सेंटर, धन्वंतरी नगर, पुद्दुचेरी - ६०५००६, संकेतस्थळ - www.jimper.edu.in, ईमेल - director@jimper.edu.in, दूरध्वनी - ०४३१-२२७२३८०.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ॲण्ड न्युरो सायन्स  
या संस्थेने बी.एस्सी. इन (१) ॲनेस्थेशिया टेक्नॉलॉजी (कालावधी - तीन वर्षे/बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन परीक्षेत ४५ टक्के गुण मिळायला हवे.), (२) रेडिओग्राफी (कालावधी - तीन वर्षे/पात्रता - ४५ टक्के गुणांसह बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र आणि गणित हे विषय घेतलेले असावे.) हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

संपर्क ः होसुर रोड, बंगळूर - ५६००२९, दूरध्वनी - ०८०-२६९९५००१, टेलिफॅक्स - २६९९५००२, ईमेल - dirstaff@nimhans.ac.in आणि academic@nimhans.ac.in, संकेतस्थळ -  www.nimhans.ac.in.

बी. जे गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज पुणे  
(१) बी.एस्सी. इन रेडिओग्राफी, (२) बी.एस्सी. इन कम्युनिटी मेडिसिन, (३) बी.एस्सी. इन ब्लड ट्रान्सफ्युजन, (४) बी.एस्सी. इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस, (५) बी.एस्सी. इन एन्डोस्कोपी, (६) बी.एस्सी. इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी.
संपर्क ः बी. जे गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल्स ॲण्ड कॉलेज ऑफ नर्सिंग, जयप्रकाश नारायण रोड, पुणे रेल्वे स्थानकाजवळ, पुणे - ४११००१, दूरध्वनी - ०२०-२६१२८०००, फॅक्स- २६१२६०१०, संकेतस्थळ- www.bjmcpune.org, ईमेल -  deanbjmcpune@gmail.com.

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ 
(१) बी.एस्सी. इन रेडिओग्राफी, (२) बी.एस्सी. इन ब्लड ट्रान्सफ्युजन,(३) बी.एस्सी. इन इमर्जन्सी मेडिसिन, (४) बी.एस्सी. इन एन्डोस्कोपी, (५) बी.एस्सी. इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, (६) बी.एस्सी. इन फॉरेन्सिक मेडिसिन, (७) बी.एस्सी. इन ऑप्टोमेट्री.
संपर्क ः डिन, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ - ४४५००१, दूरध्वनी - ०७२३२-२४२४५६, फॅक्स - २४४१४८, संकेतस्थळ - www.vngmcytl.ac.in

संबंधित बातम्या