फॅशन: कौशल्य आणि कला

सुरेश वांदिले
सोमवार, 27 जून 2022

कव्हर स्टोरी ः
करिअर विशेष

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) ही आपल्या देशातील फॅशन तंत्रज्ञान ते व्यवस्थापन या विषयामध्ये शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास वाव देणारी सर्वात महत्त्वाची आणि दर्जेदार संस्था आहे. या संस्थेत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी हे अभ्यासक्रम चालवले जातात. त्याशिवाय कौशल्य निर्मितीचे विविध अभ्यासक्रम या संस्थेने सुरू केले आहेत. हे कौशल्य आणि कला हस्तगत केल्यास रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. यामध्ये जितकी तज्ज्ञता वाढत जाईल, तितके आपले नाणे आणखी खणखणीत वाजायला सुरुवात होते. हे अभ्यासक्रम निरंतर शिक्षण पद्धतीचे आहेत. ते अत्यल्प ते अल्प कालावधीचे म्हणजे सहा महिन्यांपासून ते एक वर्षे कालावधीचे आहेत. व फॅशन व तत्सम उद्योगातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर आणि तांत्रिक ज्ञानावर अधिक भर दिला जातो. हे अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना एनआयएफटी प्रमाणपत्र दिले जाते. या अभ्यासक्रमांना थेट प्रवेश मिळू शकतो. 

एनआयएफटीच्या वेगवेगळ्या कॅम्पसमधील काही अभ्यासक्रम-
(अ) कालावधी एक वर्ष/पात्रता - कोणत्याही विषयातील बारावी
१)    बंगळूर कॅम्पस- (१) फॅशन ॲण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी, (२) फॅशन इन्टिग्रेशन फॉर टेक्स्टाईल, (३) फॅशन निटवेअर प्रॉडक्शन ॲण्ड टेक्नॉलॉजी, (४) फॅशन रिटेल मॅनेजमेंट (पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी आणि अनुभव किंवा दहावी अधिक २ पदविका आणि एक ते दोन वर्षांचा संबंधित उद्योगात काम करण्याचा अनुभव), (५) गारमेंट एक्स्पोर्ट मर्चंडायझिंग मॅनेजमेंट (पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी/पदविका), (६) लक्झरी प्रॉडक्ट डिझाइन (पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी आणि एक ते दोन वर्षांचा संबंधित उद्योगात काम करण्याचा अनुभव.)

२)    हैदराबाद कॅम्पस- (१) फॅशन क्लोदिंग टेक्नॉलॉजी, (२) कंटेम्‍पररी एथनिक वेअर
३) मुंबई कॅम्पस- (१) फॅशन क्लोदिंग टेक्नॉलॉजी, (२) फॅशन रिटेल मॅनेजमेंट, (३) लक्झरी प्रॉडक्ट डिझाइन  ४)    दिल्ली कॅम्पस- (१) ग्राफिक डिझाइन ॲण्ड कम्युनिकेशन, (२) फॅशन रिटेल मॅनेजमेंट, (३) गारमेंट एक्स्पोर्ट मर्चंडायझिंग मॅनेजमेंट, (४) क्रिएटिव्ह थिंकिंग ॲण्ड डिझाइन डेव्हलपमेंट, (५) डिझाइन इन बूटिक ॲपेरल ॲण्ड ॲक्सेसरीज, (६) क्लोदिंग प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी, (७) इंटिरियर डिझाइन ॲण्ड एक्झिबिशन, (८) मॅनेजमेंट ऑफ फॅशन बिझनेस, (९) क्रिएटिव्ह टेक्स्टाईल डिझाइन, (१०) डिझायनिंग ॲण्ड स्टायलिंग फॉर इंडियन फॅशन, (११) डिजिटल फोटोग्राफी, (१२) लक्झरी प्रॉडक्ट डिझाइन, (१३) टॉईज ॲण्ड गेम डिझाइन, (१४) होम ॲक्सेसरीज स्टायलिंग, (१५) व्हिज्युअल मर्चंडायझिंग ॲण्ड प्रॉडक्ट स्टायलिंग, (१६) प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ॲण्ड ब्रँडिंग, (१५) बिझनेस फॉर फॅशन

५)    कोलकता कॅम्पस- (१) क्लोदिंग फॅशन टेक्नॉलॉजी, (२) फॅशन निटवेअर प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी, (३) ॲपेरल डिझाइन ॲण्ड फॅशन टेक्नॉलॉजी, (४) फॅशन लेदर ॲक्सेसरीज डिझाइन, (५) फॅशन ॲण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी

६)    वाराणसी उपकॅम्पस- फॅशन ॲण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी

७)    सुरत कॅम्पस- फॅशन डिझाइन ॲण्ड ॲपेरल टेक्नॉलॉजी (पात्रता- दहावी आणि संबंधित उद्योगातील अनुभव/पदविका),

***

(ब) सहा महिने कालावधीचे अभ्यासक्रम/पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी
१) नवी दिल्ली- (१) क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग, (२) इलस्ट्रेशन फॉर फॅशन इंडस्ट्री, (३) पॅटर्न मेकिंग फॉर फॅशन इंडस्ट्री, (४) युझर एक्सपिरियन्स ॲण्ड इंटरफेस इन फॅशन टेक्स्टाईल.
२) वाराणसी- टेक्स्टाईल फॉर होम ॲण्ड इंटिरियर (पात्रता- दहावी)
३) हैदराबाद- होम डेकॉर ॲण्ड स्टायलिंग
४) बंगळूर - (१) मॅनेजमेंट ऑफ फॅमिली रन फॅशन बिझनेस, (२) डिझाइन पॅटर्न मेकिंग ॲण्ड डिझाइन स्टुडिओ मॅनेजमेंट फॉर एथनिक ॲपेरल्स, (३) ॲपेरल मर्चंडायझिंग ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, (४) कम्युनिकेशन डिझायनिंग 
५) मुंबई- (१) ॲपेरल कॉस्टिंग ॲण्ड फॅशन मर्चंडायझिंग, (२) क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग, (३) ॲपेरल डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट, (४) क्रिएटिव्ह पॅटर्न मेकिंग, (५) व्हिज्युअल मर्चंडायझिंग,
 ६) पंचकुला- (१) डिझाइन पॅटर्न मेकिंग ॲण्ड डिझाइन स्टुडिओ मॅनेजमेंट फॉर एथनिक ॲपेरल्स, (२) कॉम्प्युटर एडेड डिझाइन फॉर प्रिंट, (३) नॉन लूम ॲण्ड सर्फेस डेव्हलपमेंट टेक्निक्स फॉर इंटिरियर टेक्स्टाइल्स
***

(क) सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीचे अभ्यासक्रम/पात्रता - कोणत्याही विषयातील बारावी
१)    नवी दिल्ली- मेकअप, हेअर ॲण्ड ग्लॅमर 
२)    बंगळूर- डिजिटल बिझनेस ब्रँडिंग ॲण्ड प्रमोशन, 
३)    हैदराबाद- (१) ॲपेरल रिटेलिंग ॲण्ड व्हिज्युअल मर्चंडायझिंग, (२) फॅशन ब्रँडिंग ॲण्ड सप्लाय चेन, 
४)    मुंबई- (१) ई-कॉमर्स फॉर फॅशन बिझनेस, (२) यूआय/यूएक्स डिझाइन,
५)    वाराणसी- (१) डिझाइन ॲण्ड थिंक बियाँड, (२) फॅशन बूटिक ॲण्ड ड्रेस डिझायनिंग, (३) कॉम्प्युटर एडेड डिझाइन फॉर टेक्स्टाईल,
६)    पंचकुला हरियाना- सोशल मीडिया मार्केटिंग इन फॅशन
***
 

पदविका/ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
१) नवी दिल्ली- (१) फॅशन प्रॉडक्ट डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी पदविका, पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी ‍किंवा दहावीनंतर पूर्णकालीन पदविका, (२) डिझाइन थिंकिंग अॅण्ड बिझनेस इनोव्हेशन पदव्युत्तर पदविका, पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी किंवा बारावीनंतर पूर्णकालीन पदविका, (३) फाउंडेशन डिप्लोमा इन टेक्स्टाइल ॲण्ड लेदर डिझाइन, पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी ‍किंवा दहावीनंतर पूर्णकालीन पदविका, (४) टेक्स्टाइल क्राफ्ट्स ॲण्ड सस्टेनेबल प्रॉडक्ट डिझाइन, पदव्युत्तर पदविका, पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी किंवा बारावीनंतर पूर्णकालीन पदविका, (५) टेक्स्टाइल प्रॉडक्ट स्टायलिंग पदव्युत्तर पदविका, पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी किंवा बारावीनंतर पूर्णकालीन पदविका.

२) सुरत- फॅशन फिट ॲण्ड स्टाइल पदविका, पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी किंवा दहावीनंतर पूर्णकालीन पदविका.

३) चेन्नई- (१) फॅशन फिट ॲण्ड स्टाइल पदविका, पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी किंवा दहावीनंतर पूर्णकालीन पदविका, (२) फॅशन आंत्रप्रेन्युअरशिप पदव्युत्तर पदविका, पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी किंवा बारावीनंतर पूर्णकालीन पदविका, (३) ॲपेरल प्रॉडक्शन ॲण्ड मर्चंडायझिंग पदव्युत्तर पदविका, पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी किंवा बारावीनंतर पूर्णकालीन पदविका, (४) ओम्नी चॅनेल रिटेलिंग ॲण्ड ई-कॉमर्स मॅनेजमेंट पूर्णकालीन पदविका, पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी किंवा बारावीनंतर पूर्णकालीन पदविका.

४) मुंबई- (१) फॅशन फिट ॲण्ड स्टाइल पदविका, पात्रता-कोणत्याही विषयातील बारावी किंवा दहावीनंतर पूर्णकालीन पदविका, (२) फॅशन आंत्रप्रेन्युअरशिप, पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी किंवा बारावीनंतर पूर्णकालीन पदव्युत्तर पदविका, (३) ॲपेरल प्रॉडक्शन ॲण्ड मर्चंडायझिंग पदव्युत्तर पदविका, पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी किंवा बारावीनंतर पूर्णकालीन पदविका, (४) ॲडव्हान्स्ड युझर स्टडीज पदव्युत्तर पदविका, पात्रता-कोणत्याही विषयातील पदवी किंवा बारावीनंतर पूर्णकालीन पदविका.

***

इतर
सर्टिफिकेट इन क्लोदिंग प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम कोलकता आणि नवी दिल्ली कॅम्पसमध्ये चालवला जातो. सर्टिफिकेट इन क्रिएटिव्ह थिंकिंग ॲण्ड डिझाइन डेव्हलपमेंट हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम नवी दिल्ली कॅम्पसमध्ये चालवला जातो.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा अर्ज nift.ac.in/cep या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येते. एकदा निवडलेले कॅम्पस बदलून दिले जात नाही. (हे सर्व अभ्यासक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी आहेत. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांमध्ये बदल होऊ शकतात. उदाहरणार्थ, काही अभ्यासक्रम तात्पुरते स्थगित करणे, नवे अभ्यासक्रम सुरू करणे. या बाबींची नोंद घ्यावी.)

संपर्क- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, प्लॉट नंबर १५, सेक्टर ४, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०, दूरध्वनी- ०२२-२७७४७१००, संकेतस्थळ- https://www.nift.ac.in/mumbai/

संबंधित बातम्या