कृषी क्षेत्रातील शैक्षणिक अभ्यासक्रम व रोजगार संधी

दत्तात्रय आंबुलकर 
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
 

इतर विविध शैक्षणिक अभ्यासक्रम व त्याद्वारा रोजगार, स्वयंरोजगारासह संशोधन उच्च शिक्षण देणारे शैक्षणिक क्षेत्र म्हणून कृषी विज्ञान व संबंधित विषयांचे महत्त्व व महात्म्य नेहमीच अबाधित ठरले आहे.
बदलत्या काळानुरूप वाढत्या व बदलत्या शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रचलित पार्श्‍वभूमीवर कृषी, कृषी विज्ञान, फलोत्पादन, कृषी व्यवस्थापन-विपणन, पशुवैद्यक-दुग्धविज्ञान, मत्स्यविज्ञान एवढेच नव्हे तर ग्रामीण समाजकार्य व विकास यांसारख्या विषयांत देशांतर्गत विविध कृषी महाविद्यालये व कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम व संशोधनपर शैक्षणिक अभ्यासक्रमाचा विचार वेगळ्या व मोठ्या संस्थेतील रोजगार संधींच्या पार्श्‍वभूमीवर म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचे विविध पदवी अभ्यासक्रम 

 • महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेतर्फे राज्यातील म. फुले कृषी विद्यापीठ - राहुरी, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ - अकोला, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ - परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ - दापोली या चारही विद्यापीठांमध्ये खालील पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
 • बी.एस्सी (कृषी) व बी.एस्सी (ऑनर्स) उद्यान विषयातील पदवी
 • बीएफएस्सी (मत्स्य विज्ञान), बी.एस्सी. (ऑनर्स) वन, बी.एस्सी) (पशुसंवर्धन) विषयातील पदवी
 • बीटेक (कृषी अभियांत्रिकी) व बीटेक (अन्न तंत्रज्ञान) विषयातील पदवी
 • बी.एस्सी (ऑनर्स) सामाजिक विज्ञान व बीटेक (कृषी जैव तंत्रज्ञान) विषयातील पदवी ः
 • बी.एस्सी (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयातील पदवी ः
 • आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदार विद्यार्थ्यांनी विज्ञान - गणित व कृषी विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते या परीक्षेला बसलेले असावेत.
 • अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क ः www.mcaer.arg अथवा maha-agriadmission.in 
 • महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचा दुग्ध तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम ः
 • आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदार विद्यार्थ्यांनी १०+ २ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र व गणित विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांच्या गुणांची टक्केवारी किमान ५० टक्के असायला हवी.
 • नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, कानपूर येथील विविध अभ्यासक्रम, शुगर टेक्‍नॉलॉजीमधील पदविका अभ्यासक्रम, शुगर इंजिनिअरिंगमधील पदविका अभ्यासक्रम, डिस्ट्रियल फर्मेंटेशन व अल्कोहोल टेक्‍नॉलॉजीमधील पदविका अभ्यासक्रम, शुगरकेन प्रॉडक्‍टिव्हिटी आणि मॅच्युरिटी मॅनेजमेंटमधील पदविका, इंडस्ट्रीयल इंन्स्ट्रुमेंटेशन व प्रोसेस ऑटोमेशनमधील पदविका अभ्यासक्रम, शुगर बॉइलिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. वरील अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क ः http:nsi.gov.in

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रीशनचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम 

 • आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदारांनी एमबीबीएस, बी.एस्सी (न्यूट्रीशन - होम सायन्स) बी.एस्सी (नर्सिंग) बायोकेमिस्ट्री अथवा न्युट्रीशन यांसारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क ः www.ninindia.org
 • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्‍नॉलॉजी - एंटरप्रेन्युअरशिप अँड मॅनेजमेंट, सोनेपत येथील पदवी अभ्यासक्रम ः
 • केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्‍नॉलॉजी एंट्रप्रेचुअरशिप अँड मॅनेजमेंट -सोनेपत (हरियाणा) येथे उपलब्ध असणारा बीटेक - फूड टेक्‍नॉलॉजी अँड मॅनेजमेंटमधील पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
 • आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र व गणित हे विषय घेऊन व त्याशिवाय रसायनशास्त्र, बायो टेक्‍नॉलॉजी, संगणक विज्ञत्रान, जीवशास्त्र यासारख्या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी संबंधित वर्षासाठीची जेईई मेन ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. 
 • अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क ः www.niftem.ac.in

कॉफी क्वालिटी मॅनेजमेंटमधील पदविका अभ्यासक्रम 
कॉफी बोर्डातर्फे घेण्यात येणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉफी क्वालिटी मॅनेजमेंट या विषयातील पदविका अभ्यासक्रमात खालीलप्रमाणे प्रवेश देण्यात येतो.
आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदार विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, बायोटेक्‍नॉलॉजी, बायोसायन्स, अन्न-तंत्रज्ञान, खाद्यविज्ञान, पर्यावरण विज्ञान, कृषी विज्ञान यांसारख्या विषयातील पदवी अभ्यासक्रम चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क ः www.indiacoffee.org

इंडियन प्लायवूड इंडस्ट्रीज अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा अभ्यासक्रम
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या इंडियन प्लायवूड इंडस्ट्रीज रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बंगलोर येथील वूड अँड पॅनल प्रॉडक्‍ट टेक्‍नॉलॉजी विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये खालीलप्रमाणे प्रवेश देण्यात येतो.
आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदार विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, वनशास्त्र, कृषी यांसारख्या विषयातील बी.एस्सी अथवा इंजिनिअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क ः www.ipurti.gov.in

फॉरेस्ट रीसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून येथील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम 
देहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट येथे उपलब्ध असणारे विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम -
    एम.एस्सी. - फॉरेस्ट्री
    एमएस्सी - वूड सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी
    एमएस्सी - एन्व्हायरॉन्मेंटल सायन्स
    आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदार विद्यार्थ्यांनी वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, कृषी वन विज्ञान, पर्यावरण विज्ञान यांसारख्या विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशील ः www.fridu.edu.in
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅंटेशन मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम
बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅंटेशन मॅनेजमेंटमध्ये २०१५ मध्ये उपलब्ध असणाऱ्या ॲडव्हान्स्ड मॅनेजमेंट रीसर्च इन प्लॅंटेशन योजनेअंतर्गत ॲग्री बिझनेस अँड प्लॅंटेशन मॅनेजमेंट या विशेष अभ्यासक्रमामध्ये खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध.
आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः उमेदवारांनी कुठल्याही विषयातील पदवी किंवा सीए, आयसीडब्ल्यू, कंपनी सेक्रेटरी यासारखी पात्रता कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा व त्यानी सीएटी, जीएमएटी, यूजीसी- सीएसआयआर, जेआरएफ, एमईटी, आयसीएआर - एनईटी अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशील ः www.iipmb.edu.in

बायो टेक्‍नॉलॉजीमधील विशेष संशोधनपर संधी 
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ बायो टेक्‍नॉलॉजीतर्फे या विषयाशी संबंधित क्षेत्रात संशोधनपर पीएचडी करण्यासाठी ज्युनियर रीसर्च फेलोशिप इन बायो टेक्‍नॉलॉजीसाठी घेण्यात येणारी बायो टेक्‍नॉलॉजी एलिजिलिटी टेस्ट खालीलप्रमाणे घेण्यात येते.
    आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदांनी बायो टेक्‍नॉलॉजीसह बीई/बीटेक अथवा एम.एस्सी, एमटेक, एमव्हीएस्सी, बायो टेक्‍नॉलॉजी, कृषी, पशुविज्ञान, वैद्यकशास्त्र, मरिन, औद्योगिक पर्यावरण, औषधी निर्माण, अन्नप्रक्रिया, बायो-रिसोर्सेस बायोटेक्‍नॉलॉजी, बायोकेमिक्‍ल इंजिनिअरिंग, बायो-सायन्सेस, बायो-इन्फरमॅटिक्‍स, मॉलिक्‍युलर अँड ह्युमन जिम्नॅस्टिक्‍स वा न्युरो सायन्स यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क ः http://www.bcil.nic.in

इन्स्टिट्यूट ऑफ डिग्री ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम 
स्वामी विवेकानंद राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर येथे कृषी व्यवस्थापन क्षेत्रांतर्गत उपलब्ध असणारा एमबीए (ॲग्री बिझनेस) हा विशेष पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम.
आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदारांनी कृषी वा कृषी विज्ञानासह कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी संबंधित वर्षातील कॅट म्हणजेच कॉमन ॲडमिशन टेस्ट ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशीलासाठी संपर्क ः www.iabmbikauer.org
    इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम ः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद येथे उपलब्ध असणारा ग्रामीण विकास व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम व ग्रामीण व्यवस्थापन विषयक फेलोशिप.
    आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी संबंधित सत्रातील सीएटी अथवा एक्‍सएटी यांसारखी प्रवेश पात्रा परीक्षा दिलेली असावी. अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क ः https://www.irma.ac.in

ग्रामीण विकास व्यवस्थापन विषयातील विशेष अभ्यासक्रम 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हल्पमेंट अँड पंचायती राज, हैदराबाद येथील ग्रामीण विकास व्यवस्थापन विषक विशेष अभ्यासक्रम. 
    आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदार कउठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा ते पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले असावेत. अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क ः www.nird.org.in/pgdrm.aspx

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचा अभ्यासक्रम
पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम ः 
आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना सहकार वा संबंधित कामाचा पाच वर्षांचा अनुभव असायला हवा व त्याशिवाय त्यांनी सीएसटी, एमएटी, एटीएमए वा सीएमएटी यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क ः www.vamnicom.gov.in
आयआयएमचा अन्न, कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रम ः आयआयएम म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅमेजमेंट, हैदराबादचा अन्न व कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम -
आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदार विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी आयआयएम अहमदाबादतर्फे घेण्यात येणारी कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट) ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क ः www.iimcat.ac.in
अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य व भविष्यकालीन संधी ः कृषी-कृषी विज्ञान, अन्न प्रक्रिया, दुग्धोत्पादन, मत्स्य व्यवसाय, कृषी उत्पादन प्रक्रिया, सहकार व ग्रामीण विकास, ग्रामीण व्यवस्तापन यासारख्या विषयांमध्ये शिक्षण - संशोधन, रोजगार - स्वयंरोजगार इ. विषयक मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

वर नमूद केलेल्या वा तत्सम विविध स्तरावरील अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी कृषी, कृषी उद्योग, शैक्षणिक संशोधन, कृषी प्रक्रिया, अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यवसाय, मत्स्योत्पादन, सहकार, बॅंकिंग, सरकारी संस्था, उत्पादन उद्योग याशिवाय स्वयंरोजगाराच्या विविध संधी मिळू शकतात व त्या दृष्टीने या शैक्षणिक रोजगारविषयक पर्यायाचा नव्याने विचार होणे गरजेचे ठरते. 

संबंधित बातम्या