एिव्हएशन ॲन्ड हॉस्पिटॅलिटीमधील वेगळ्या वाटा 

धनंजय वर्णेकर, अध्यक्ष, आयआयबीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट  
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
 

भारत देश हा आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत असताना, कृषिप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशाची वाटचाल ही पर्यटन व टुरिझम क्षेत्राकडे होत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत झापाट्याने वाढ होत असून, येणाऱ्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था वृद्धिंगत होणार आहे. सर्वसाधारणपणे देषांतर्गतसुद्धा विकासाचा वेग वाढला आहे. पर्यटन व टुरिझम क्षेत्राचा विचार करता सरासरी ७.५% ऊझ या क्षेत्रात असून, सन २०२२ पर्यंत १६.४ % ची वाढ होईल. येणाऱ्या काळात ७९६.९ हजार करोड एवढी मोठी गुंतवणूक या क्षेत्रामध्ये होत आहे. 

सन २०१८ मध्ये भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या १०.५६ मिलेनियम एवढी होती आपल्याकडे तरुणांचा फार मोठा वाटा आहे. पूर्वी शेतीप्रधान असलेल्या देशात कालांतराने प्रगती होत गेली. आज जगामध्ये युवकांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. भारताचा आर्थिक स्तरसुद्धा सुधारत आहे. पर्यटन आणि ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये सरासरी ७-५ % ऊझप्रमाणे आहे. 

या सर्वाचा परिणाम म्हणजे भारतामध्ये या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत 
आहे, तर येणाऱ्या वर्षात टुरिझम व हॉटेल क्षेत्रामध्ये ३०.५ मिलेनियम पर्यटक भारताला भेट देतील. त्याचप्रमाणे भारत देशातून विदेशात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. 

भारत हा जगामध्ये एव्हिएशन क्षेत्रामधील दुसऱ्या क्रमांकावर असून, लवकरात लवकर पहिल्या क्रमांकावर येईल. भारतामध्ये एअरपोर्ट, हॉटेल्स यांचे जाळे प्रचंड वेगाने वाढत आहे. भारत सरकारने स्वदेष दर्षन योजनेंतर्गत १३ ठिकाणी फार मोठी गुंतवणूक चालू केली आहे. पुढील ५ वर्षांत भारतामध्ये १ लाख करोड एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या क्षेत्रामध्ये होईल.

महासत्तेकडे वाटचाल करीत असताना भारत हा जगामध्ये तरुणांचा देष म्हणून ओळखला जात आहे. तरुणांचे प्रमाण वाढत असताना त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे तितकेच गरजेचे आहे. त्या अनुषंगाने तरुणांनीसुद्धा आपल्या शैक्षणिक स्किलमध्ये बदल करायला हवा. पारंपरिक अभ्यासाचा विचार न करता भविष्याचा वेध ओळखून आपल्या शैक्षणिक स्किलमध्ये बदल व्हायला हवा. 

जागतिक पातळीवर हॉस्पिटॅलिटी क्षेत्राची वाढती गरज व या क्षेत्रामध्ये असणाऱ्या हजारो व्यवसायाच्या व नोकरीच्या संधी तरुणाला नक्‍कीच एक प्रगतिपथावर घेऊन जाणारी संधी आहे. जगातील गुंतवणूक व वाढत जाणारी इंडस्ट्रिज याचा विचार करता हॉस्पिटॅलिटी क्षेत्र ही एक सुवर्ण संधी म्हणून तरुणांनी या क्षेत्राकडे पाहण्यास हरकत नाही. 

येणाऱ्या काळात सर्वांत जास्त रोजगार व व्यवसाय संधी असणारे हे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात रोजगार व व्यवसाय उपलब्ध आहेत व पुढील काळामध्ये ते वाढतील. सदर इंडस्ट्रीमध्ये पुढील प्रमाणे इंडस्ट्रीज येतात.  

 • ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम
 • इव्हेंट मॅनेजमेंट
 • हॉटेल इंडस्ट्री
 • एव्हिएशन इंडस्ट्री 
 • फूड इंडस्ट्री
 • वाइन ॲण्ड ज्यूस इंडस्ट्री

हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात एव्हिएशन क्षेत्रामध्येसुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. देशांतर्गत व देशाबाहेर पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे. या क्षेत्रामध्ये नोकरीच्या हजारो संधी उपलब्ध आहेत. 

एव्हिएशन क्षेत्रामध्ये प्रशिक्षणानंतर खालीलप्रमाणे नोकरीच्या संधी आहेत.

 • एअर होस्टेस
 • एअरलाइन ॲडमिन सपोर्ट
 • ऑपरेशन
 • सिझनल सेल मॅनेजर
 • ग्राउंड स्टाफ
 • एव्हिएशन टेक्‍निशियन 
 • पॅसेंजर सर्व्हिस
 • एअरलाइन स्टेशन मॅनेजर
 • सेल रिसेप्शनिस्ट
 • एअरलाइन तिकीट एजंट

या इंडिस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी खालीलप्रमाणे स्किल ची गरज आहे.

 • उच्चस्तरीय करिअर सेवा 
 • औपचारिक शिक्षण पद्धती 
 • सांस्कृतिक जागरुकता
 • वक्‍तृत्व कला संभाषण
 • उत्तम प्रकारचे प्रशिक्षण
 • मल्टी टास्किंग 
 • टिम वर्क
 • डिप्लोमा किंवा डिग्रीपर्यंत प्रशिक्षण

१०वी १२वीनंतर खालील अभ्यासक्रम उपलब्ध

 • डिप्लोमा इन एअरपोर्ट मॅनेजमेंट
 • पायलट ट्रेनिंग
 • डिप्लोमा इन कॅबिन क्रु
 • डिप्लोमा इन एअर ट्रॅव्हल ॲण्ड हॉस्पिटॅलिटी
 • डिप्लोमा इन बेसिक ऑफ टुरिझम ॲण्ड एव्हिएशन इंडस्ट्री मॅनेजमेंट

संबंधित बातम्या