उपवैद्यकीय अर्थात पॅरामेडिकल क्षेत्रातील वाढत्या संधी

डॉ. अरविंद खरात, संचालक, मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
कमी गुण मिळाल्याने वैद्यकीय शाखेत प्रवेश न मिळवता आलेल्यासाठी हा एक आश्‍वासक पर्याय आहे. सध्या रोगनिदान करण्यासाठी अनेक उपकरणे हाताळ्याण्यासाठी, तसेच अन्य कामासाठी पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित टेक्‍निशिअनची गरज असते. म्हणूनच या क्षेत्रामध्ये नोकरीची संधीही चांगली उपलब्ध आहे.

ज्याप्रमाणे वैद्यकीय शास्त्राची व्याप्ती रोज वाढत आहे. त्याचप्रमाणे उपवैद्यकीय अर्थात पॅरामेडिकल क्षेत्रातही अनेक संधी निर्माण झाल्या आहेत, तसेच पॅरामेडिकलच्या अभ्यासक्रमाला देखील खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. 
पॅरामेडिकल विज्ञान हे चिकित्सा विज्ञानमधील महत्त्वाची शाखा निर्माण झाली आहे, असे ही म्हणले जाते की जर, पॅरामेडिकल नसेल तर चिकित्सक हे शक्तिहीन होणार पॅरामेडिक्‍सचे प्राथमिक लक्ष्य त्वरीत चिकित्सिकाची आवश्‍यकता पूर्ण करणे अशी असते. पॅरामेडिकल प्रोफेशनल्स हे उपचारादरम्यान मेडिकल टीमला महत्त्वाचे साह्य करत असतात. मेडिकल लेबोरेटरी टेक्‍निशियन हे रोग निदान व रोग संबंधित टेस्ट करत असतात. ज्यामुळे चिकित्सकला उपचार करण्यामध्ये मदत होत असते. 

मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही अग्रगण्य नामांकित आंतरराष्ट्रीय मान्यता व आयएसओ ९००१ ः २०१५ प्रमाणित एकमेव संस्था आहे. या संस्थेद्वारे सहवैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडविण्यासाठी अनेक डीएमएलटी, सीएमएलटी, एक्‍स-रे, डायलेसिस टेक्‍निशिअन, ऑपरेशन थिएटर, टेक्‍निशिअन आणि नर्सिंगसारख्या अभ्यासक्रमाद्वारे उज्ज्वल मार्ग खुला केला आहे. कमी कालावाधी १०० % नोकरीची हमी व माफक फी हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. अनुभवी शिक्षक वर्ग, प्रशस्त लॅबोरेटरी तसेच संपूर्ण कॉम्प्युटराईज मशिनवर प्रशिक्षण देणे हेदेखील या संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहे. 

कमी गुण मिळाल्याने वैद्यकीय शाखेत प्रवेश न मिळवता आलेल्यासाठी हा एक आश्‍वासक पर्याय आहे. सध्या रोगनिदान करण्यासाठी अनेक उपकरणे हाताळ्याण्यासाठी तसेच अन्य कामासाठी पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित टेक्‍निशिअनची गरज असते. म्हणूनच या क्षेत्रामध्ये नोकरीची संधीही चांगली उपलब्ध आहे. सध्या रोगनिदान करण्यासाठी अनेक उपकरणे वैद्यकीय क्षेत्रात वापरली जातात. या उपकरणांना हाताळण्यासाठी, तसेच अन्य विविध कामांसाठी पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्तींची गरज असते. हॉस्पिटल्स पॅथोलॉजिकल लॅबारेटरी, एम.आर.आय. व सिटी स्कॅन सेंटर्स यासारख्या ठिकाणी पॅरामेडिकल टेक्‍निशियन्सची आवश्‍यक असते. या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधीही चांगल्या उपलब्ध आहेत. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी सेंटर सारख्या ठिकाणी पॅरामेडिकल टेक्‍निशियन्सची आवश्‍यकता असते या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधीही चांगल्या उपलब्ध आहेत. 

फुटबॉल/क्रिकेटची मॅच सुरू असताना एखादा खेळाडू जखमी होतो तेव्हा मैदानावर त्वरित धाव घेणारी व्यक्ती म्हणजे फिजिओथेरपिस्ट! मुरगळलेल्या किंवा अपघात वा अन्य आजारांमुळे कमकुवत बनलेल्या अवयवांवर विविध उपकरणे तसेच व्यायामाच्या आधारे फिजिओथेरपिस्ट उपाय करतात. 

बॅचलर ऑफ ऑक्‍युपेशन थेरपी 
शारीरिक व मानसिक व्याधींनी त्रस्त झालेल्या तसेच पक्षाघातासरख्या विकारांमुळे अकार्यक्षम बनलेल्या अवयवांना बळ देण्यासाठी ऑक्‍युपेशनल थेरपिस्ट मेहनत घेतात. आजारी व्यक्तींची गरज ओळखून त्याला दैनंदिन आयुष्यात स्वतंत्रपणे काम करता येईल, यासाठी मदत करतात. व्यक्तीनुसार उपचार व व्यायाम बदलत असतात. कायमस्वरूपी व अल्पकालीन अपंगत्वावर मात करण्यासाठी शारीरिक व्यायाम शिकवण्यापासून व्हीलचेअर्स, स्लेट्‌स अशा कृत्रिम साधानांचा उपयोग कसा करावा हे शिकवण्याची जबाबदारीही ऑक्‍युपेशनल थेरपिस्ट घेतात. दिव्यांग मुलं, मुदतपूर्व जन्मलेली बाळं, आर्थ्ररायटिस, पाठीच्या मणक्‍याचं दुखणं, मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्तींना हे तज्ज्ञ मदत करतात. 

बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी ॲण्ड स्पीच लॅंग्वेज पॅथॉलॉजी
तोतरेपणा, उच्चार स्पष्ट नसणे, बोलताना सतत, अडखळणं अशा समस्या असलेल्या व्यक्तींवर स्पीच पॅथॉलॉजिस्ट उपचार करतात. तर ऑडिओलॉजिस्ट हे लहान मुलांच्या तसंच मोठ्यांच्या बहिरेपणावर उपचार करतात. त्यात श्रवणक्षमता किती कमी आहे. यानुसार उपाय केला जातो. एखाद्या पुनर्वसनाचं कामही ऑडिओलॉजिस्ट करतात. त्यासाठी हिअरिंग एडच्या वापर करणं, लिप लॅंग्वेज शिकवणं इत्यादीचा समावेश होतो. 

बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्‍स ॲण्ड ऑर्थोटिक्‍स 
प्रोस्थेटिक्‍स या शाखेत कृत्रिम अवयवांचा अभ्यास असतो. अपघातामुळे अवयव गमावलेल्यांना बसवायच्या कृत्रिम अवयवांचे डिझाइन करणं, प्रत्यक्ष बनवून घेणे व पेशंटला तो अवयव बनवून देणे  याचा या प्रशिक्षणात समावेश होतो. जुन्या लाकडी अवयवांपेक्षा वजनाने हलके आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स व न्युमॅटिक प्रणालीचा वापर करून कृत्रिम अवयव बनवले जातात. हे अवयव बसवण्याचं काम प्रोस्थेटिक्‍स करतात. ऑर्थोटिक्‍स या शाखेत हात अथवा पाय दुखावल्यावर त्याला पट्ट्यांच्या वा लाकडी किंवा लोखंडी स्टीलच्या फळीच्या साह्याने आधार देण्याचं प्रशिक्षण दिल जातं.   

संबंधित बातम्या