गोड स्वप्न अन्‌ बिकट वाट! 

गौरव मुठे
बुधवार, 21 मार्च 2018

सुमारे आठ लाख लोक, ६० हजार चौरसमीटर जागा, १२०० हुन आधिक प्रदर्शनकांचा सहभाग जणू काही कुंभमेळा! होय! नुकताच दिल्लीत वाहनांचे प्रदर्शन मांडलेला भारतामधील वाहनउद्योगाचा जणू महाकुंभमेळा पार पडला. १९८६ पासून दर दोन वर्षांनी दिल्लीत भरवला जाणारा हा मेळा म्हणजे वाहनप्रेमींसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. ’ऑटो एक्‍स्पो’चे वैशिष्टयं म्हणजे देशातील आणि जगभरातील विविध वाहन कंपन्या, वाहनउद्योगाशी संलग्न साधनसामग्री, सुटे भाग, तंत्रज्ञान यांचे समग्र दर्शन घडवणारा हा मेळा असतो. यंदाच्या ’ऑटो एक्‍स्पो’चं वैशिष्टयं म्हणजे पर्यावरणस्नेही आणि स्मार्ट गाड्या!

सुमारे आठ लाख लोक, ६० हजार चौरसमीटर जागा, १२०० हुन आधिक प्रदर्शनकांचा सहभाग जणू काही कुंभमेळा! होय! नुकताच दिल्लीत वाहनांचे प्रदर्शन मांडलेला भारतामधील वाहनउद्योगाचा जणू महाकुंभमेळा पार पडला. १९८६ पासून दर दोन वर्षांनी दिल्लीत भरवला जाणारा हा मेळा म्हणजे वाहनप्रेमींसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. ’ऑटो एक्‍स्पो’चे वैशिष्टयं म्हणजे देशातील आणि जगभरातील विविध वाहन कंपन्या, वाहनउद्योगाशी संलग्न साधनसामग्री, सुटे भाग, तंत्रज्ञान यांचे समग्र दर्शन घडवणारा हा मेळा असतो. यंदाच्या ’ऑटो एक्‍स्पो’चं वैशिष्टयं म्हणजे पर्यावरणस्नेही आणि स्मार्ट गाड्या! मात्र चार चाकी गाड्यांपुरतंच हे विश्व मर्यादित आहे असं आपल्याला वाटत असलं तरी तसं नाहीये. यंदाच्या ऑटो एक्‍स्पोमध्ये ’टू व्हिलर्स’ने देखील आपली छाप सोडली. 

यंदाच्या ’ऑटो एक्‍स्पो’मध्ये पर्यावरणस्नेही आणि स्मार्ट अशा ’कन्सेप्ट कार्स’, ’हायब्रिड’ आणि इलेक्‍ट्रिक वाहनांचा गाजावाजा होता. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या अन्‌ त्यातून निर्माण होणारे वाढते प्रदूषण आणि केंद्र सरकारच्या २०३० नंतर देशात पेट्रोल-डिझेलवर चालणारे एकही नवीन वाहन विकू दिले जाणार नाही’ हे विधान मनावर घेत वाहन उत्पादकांनी भविष्याची चाहूल घेत सावध पावले टाकले आहे. सरकारच्या ’स्मार्ट सिटी’मधल्या स्मार्ट वातावरणात त्याला कमी प्रदूषण करणारी (पर्यावरणस्नेही) अशी यंत्रणा विकसित करून प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न केले आहेत. नुकत्याच झालेल्या ’ऑटो एक्‍स्पो’मध्ये इलेक्‍ट्रिक कार मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात आल्या. शिवाय सध्याच्या ’स्मार्ट’ जमान्याचे भान ठेवत भविष्यात ’स्मार्ट कन्सेप्ट कार्स’ ग्रेटर नोएडात सुरू असलेल्या ऑटो एक्‍स्पोचे आणखी एक वैशिष्टयं ठरलं. 

ट्रेंड बदलतोय 

प्रत्येक ’ऑटो एक्‍स्पो’ हा आधीच्या वर्षापेक्षा वेगळा असतो. काही वर्षांपूर्वी नॅनो ही ’लाखमोला’ची गाडी बाजारात आली आणि इतर कंपन्यांनी देखील ग्राहकांच्या खिशाकडे लक्ष ठेवत सामन्यांना परवडणाऱ्या गाड्या बाजारात आणण्याचा कित्ता गिरवला. मात्र ’ऑटो एक्‍स्पो’मध्ये पर्यावरणस्नेही ’कन्सेप्ट कार्स’, ’हायब्रिड’ आणि इलेक्‍ट्रिक वाहनांकडे आता सर्वांनी मोर्चा वळवल्याचे दिसून आले. असे असतानाही कंपन्यांनी सर्वसामान्यांचं ’बजेट’ समजून घेत गाड्या बनवायला सुरवात केली आहे. आता वर्षअखेर या गाड्यांवर सर्वसामान्यांच्या उड्या पडणार हे मात्र नक्की! वाहन क्षेत्रातील क्रांतीने संपूर्ण विश्वात नवनवीन बदल उडून येतील, हे खरं आहे. 

’कन्सेप्ट कार्स’चे आगमन 
यंदाच्या ऑटो एक्‍स्पोमध्ये ’कन्सेप्ट कार्स’ची न्यारी दुनिया अनुभवायला मिळाली. हॉलिवूडचा गाजलेला चित्रपट ’ट्रान्सफॉर्मर’ सिनेमात बघितल्याप्रमाणे कन्सेप्ट कार्स प्रत्यक्षात येऊ घातल्या आहेत. सरकारने ’स्मार्ट सिटी’चा नारा दिला, त्यालाच प्रतिसाद देत वाहन कंपन्यांनी ‘आर्टीफिशीअल इंटेलिजन्स‘ (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धीमतेवर आधारित ’स्मार्ट कन्सेप्ट कार्स’ सादर केल्या. एआयचा उपयोग करून ’ट्रान्सफॉर्मर’मधील ’रोबो’च वाहन कंपन्यांनी प्रत्यक्षात आणले आहे. ’सुपर आर्टीफिशीअल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ’कन्सेप्ट कार’मध्ये ’स्टीअरींग’ऐवजी स्मार्टफोन किंवा कॉम्पुटरप्रमाणे एक लांब स्क्रीन देण्यात आलेला आहे. अर्थात या ’डॅशबोर्ड’वरून सर्वकाही नियंत्रित केले जाणार आहे. तुम्हाला फक्त नियोजित ठिकाण आणि मार्ग सांगायचा आहे, मग तुमची गाडीच तुम्हाला इच्छित स्थळी घेऊन जाईल. शिवाय यावेळी गाडीत बसलेल्या व्यक्तीचे हावभाव, मानसिक स्थितीचा मागोवा घेऊन गाडीतील तापमान, संगीत सर्व काही गाडी ठरवणार आहे. त्यामुळे यंदा ऑटो एक्‍स्पोत बोलबाला होता तो ’कन्सेप्ट कार’चा. 

’कन्सेप्ट कार’ या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्यात फीड करण्यात आलेल्या डेटाचा वापर करतील. म्हणजेच आपण आपले गंतन्व स्थान गाडीला सांगितल्यास या मार्गावर कुठे पेट्रोल पंप आहेत, कुठे हॉटेल, टोल नाके किंवा स्पीड ब्रेकर आहे, शिवाय मार्गावरचे वातावरण कसे आहे, मार्गावरची रहदारी, अडथळे, मार्गाचा डिजिटल नकाशा इत्यादी बारीकसारीक तपशील या गाडयांच्या यंत्रणेत फीड केलेला असतो. गाडीतील अत्याधुनिक सेन्सर्सच्या मदतीने या स्वयंचलित गाडया त्यांचे कार्य पार पाडत असतात. 

सुझुकी टोयोटा यांच्या भागीदारीमधून ’ई-सर्व्हायवर’, मर्सिडिज बेन्झने ‘इक्‍यू’, टाटांची एचएक्‍स आणि एचएक्‍स, रेनॉची ट्रीझर, बीएमडब्ल्यूची आय रोडस्टार, ह्युंदाईची आयोनिक, कोरियन किआ कंपनीची एसपी ही कन्सेप्ट एसयूव्ही सादर केली. अर्थातच या सर्व गाड्या पेट्रोल किंवा डिझेलवर चालणार नसून ’इलेक्‍ट्रीक’वर आधारित आहेत. 

वाहनांचे पर्याय अनेक पण इंधनाचे काय? 
लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत की, जगातील इंधनाचे स्रोत आता अटू लागले आहेत. त्यात विसनशील देशांना ’कार्बन उत्सर्जन’ वाढत असल्याचा दंडुका उगारला जातो आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने जगभर वाहन उत्पादक नवनवीन साधने वापरून प्रचलित इंजिन्सना ते जोडून पर्यावरणस्नेही आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली वाहने कमी प्रदूषण करतात असे आभासी चित्र उभे करत आहेत. 

वाहन कंपन्यांनी ’ग्रीन फ्यूचर’चा नारा देत आता ’कार्बन उत्सर्जन’ होणारच नाही यासाठी हायड्रोजवर चालणारी गाडी आणली आहे. गेल्यावर्षी पर्यावरणानुकुल ’भारत-’ श्रेणीतील इंजिनांच्या निर्मितीची सक्ती कंपन्यांवर करण्यात आल्याने आता अशा इंधनालाच पर्याय देण्याचा घाट वाहन कंपन्यांनी घातला आहे. ऑटो एक्‍स्पोमध्ये होंडा कार्सने ’क्‍लॅरिटी फ्युएल सेल’ श्रेणीत ‘एफसीव्ही’ ही भविष्यातील कार सादर केली आहे. पेट्रोल, डिझेल अशा पारंपरिक इंधनावर किंवा पर्यावरणस्नेही इलेक्‍ट्रीकवर न चालता ही कार थेट ’हायड्रोजन’वर चालणार आहे. हायड्रोजन गाडीला लागणारी वीज तयार करून त्यावर गाडी चालणार आहे. शिवाय यातून कार्बन उत्सर्जन न होता उत्सर्जनाच्या रूपात पाणी बाहेर पडणार आहे. 

आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल सहज उपलब्ध होत नाही. त्यात ’हायड्रोजन’सारखे इंधन उपलब्ध होणे म्हणजे दिवसाढवळ्या डोळे उघडे ठेवून स्वप्न बघितल्यासारखे आहे. परदेशात काही देशांमध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या मात्र अगदी वेगात धावत आहेत. 

दुचाकींची वेगळीच अदा 
ऑटो एक्‍स्पोतल्या चारचाकी धडाधड आपल्यापर्यंत येऊन ठाकल्यात. पण, या कार्सच्या सौंदर्यांत आपली वेगळी अदा सादर करणाऱ्या बाइक्‍सची काही कमी नाही. उंचपुऱ्या, देखण्या, लांबलचक, हायटेक, कॉम्पॅक्‍ट... अशी कितीतरी विशेषण कमी पडतील या बाइक्‍ससाठी. ही सारी लक्षवेधी बाइक्‍सची चंगळ ऑटो एक्‍स्पोमध्ये वेगळाच भाव खाऊन गेली. 

भारतात शहरांमधील गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये दुचाकींना मागणी वाढते आहे. शहरात वाहतूक जास्त असल्याने चारचाकी किंवा गिअरची कोणतीही गाडी चालविणे त्रासदायक झाले आहे. त्यामुळेच दुचाकींमध्येही आता ’ऑटोमॅटिक स्कूटर’कडे ग्राहकांचा ओढा वाढतो आहे. आता चक्क इथेनॉलवर धावणारी बाइक येऊ घातली आहे. इथेनॉलमधील ३५ टक्के ऑक्‍सिजन हे इंधनाच्या रूपात काम करेल. परिणामी दुचाकीमधून होणाऱ्या नायट्रोजन ऑक्‍साइडचे उत्सर्जन कमी होईल, असे हे तंत्र टीव्हीएसने विकसित केले. टीव्हीएसने ’ग्रीन फ्यूचर’चा नारा देत इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी बाजारात आणली आहे. ’टीव्हीएस क्रिऑन इलेक्‍ट्रिक स्कूटर’. ही एक पर्यावरण पूरक स्कूटर असून अर्ध्या तासात टक्के ’चार्ज’ होऊ शकते. शिवाय स्कूटर ५.१. सेकंदात १०० किमी प्रती तास १०० वेगानं धावणार आहे.तर ’हिरो इलेक्‍ट्रिक’ने देखील इलेक्‍ट्रिक दुचाकी सादर केली आहे. अमेरिकी ब्रॅंड असलेली क्‍लीवलॅंड सायकल वर्क्‍स अधिकृतपणे भारतात दाखल झाली आहे. ’ओल्ड मेमरीज्‌’मध्ये घेऊन जाणारी एस आणि मिसफिट अशी दोन रेट्रो मॉडेल्स सादर केली आहेत. रॉयल एनफिल्डला या बाइक्‍स स्पर्धा करतील हे निश्‍चित. 

’नवा भिडू’ 
वाढते उत्पन्न आणि खर्च करण्याची तयारीमुळे आणि प्रत्येकवर्षी दीड कोटींहून अधिक वाहनांची बाजारपेठ असलेल्या भारतीय बाजारपेठेत यंदा ’नवा भिडू’ म्हणजेच दक्षिण कोरियाई कंपनी असलेल्या ’किआ’ने पाऊल ठेवले आहे. आंध्रप्रदेशात निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून २०१९ मध्ये वाहन बाजारात आहे. २०२५ पर्यंत कंपनीने १६ इलेक्‍ट्रिक वाहने बाजारात आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ‘मेड फॉर इंडिया’ एसपी कॉन्सेप्ट कार भारतामध्ये पुढील वर्षांच्या अखेपर्यंत सादर करणार आहे. कंपनीने प्रकल्पासाठी १ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून, प्रति वर्ष ३ लाख वाहनांचे उत्पादन करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. २०१९ ते २०२१ दरम्यान सर्व वाहने भारतीय बाजारपेठेत दाखल करण्याचा कंपनीचा मानस आहे 

ऑटो एक्‍स्पोला सेलिब्रिटींची हजेरी 
ऑटोमोबाइल क्षेत्रातील या प्रसिद्ध ऑटो एक्‍सपोमध्ये यंदा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गाड्यांचे वेड सर्वश्रुत आहे भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीने तर चार चांद लावले. प्रदर्शनस्थळी सचिनची एंट्री होताच उपस्थितांनी कारसोबत फोटोसेशन करण्याऐवजी सचिन..सचिन.. असा कल्ला केला. सचिननं बीएमडब्ल्यू६ या कारचं प्रमोशन केलं. त्यामुळे उपस्थितांचा उत्साह आवरता आवरता संयोजकांची मोठी धावपळ झाली. सचिनसह हुंदाईच्या कार स्टॉलवर शाहरुख खानची एन्ट्री होताच लोकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही या ऑटो एक्‍स्पोला हजेरी लावली. 

भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीने तर वातावरणच ढवळून निघाले. प्रदर्शनस्थळी सचिनची एंट्री होताच उपस्थितांनी कारसोबत फोटोसेशन करण्याऐवजी सचिन..सचिन.. असा कल्ला केला. त्यामुळे उपस्थितांचा उत्साह आवरता आवरता संयोजकांची मोठी धावपळ झाली. सचिनसह अभिनेत्री करिना कपूर, प्रियांका चोप्रा आणि फॉर्म्युला वन ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन आदी सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली.  ’ऑटो एक्‍स्पो’कडे बघितल्यानांतर देशातील वाहन उद्योगाला मंदीने ग्रासल्याचे निर्माण झालेले मळभ निवळू लागल्याचे संकेत नक्कीच मिळाले आहे. निदान वाहन उद्योगाला भविष्यात नक्की ’अच्छे दिन’ येईल हे नक्की! यंदाच्या ’ऑटो एक्‍स्पो’मध्ये भारतीयांची वाढलेली क्रयशक्ती, त्यांच्यात ब्रॅंडबद्दल निर्माण होणारी जागरूकता आणि सातत्याने हवेहवेसे असणारे बदल प्रकर्षाने जाणवले. जगातील लक्‍झरी कार उत्पादकांनी भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र बुधवारपासून सुरू झालेल्या ऑटो एक्‍स्पोच्या रूपाने पाहायला मिळाले. मोदी सरकारने २०३० पर्यंत देशात इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व भारतीय कंपन्यांना यासंबंधी निर्देश दिले आहेत. मात्र याबाबत अजून कोठेही सरकारदरबारी प्रत्यक्षात हालचाल झालेली नाही. मात्र वाहन उत्पादकांनी ’ई-कार्स’च्या दिशेने पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. मात्र आता ’गोड स्वप्न अन्‌ बिकट वाट’ म्हणण्याची वेळ वाहन उत्पादकांवर येऊ नये म्हणजे झाले.

बिकट वाट 
’कन्सेप्ट कार्स’ प्रत्यक्षात आली असली तरी ते भारतीयांसाठी स्वप्नंच राहण्याची शक्‍यता आहे. कारण कन्सेप्ट कार्स चालवण्यासाठी चालक आणि रस्तेही ’स्मार्ट’ असावे लागणार आहे. स्मार्ट मोबिलिटीच्या स्मार्ट गाड्यांसाठी स्मार्ट चालकांची गरज असून गाड्या पूर्णपणे कमांडआधारित असल्याने चालकांना त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. 

’इलेक्‍ट्रीक’वर आधारित असल्याने देशात अजूनही ’इलेक्‍ट्रीक’ वाहनांसाठी सर्वत्र ’चार्जिंग’ची व्यवस्था नाही 

  • भारतीय शहरांमधील प्रवासाची गती अगदी निराशाजनक आहे. महामार्गांवरही मोटारींचा वेग (कार) ताशी जेमतेम ७० किलोमीटर, तर बसेस आणि ट्रक्‍ससाठी ५० कि. मी. इतका निराशाजनक आहे. मात्र कन्सेप्ट कारसाठी सुलभ व गतिमान वाहतूक असणे अत्यंत आवश्‍यक आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या