तुमची गाडी करा स्मार्ट 

समृद्धी धायगुडे
बुधवार, 21 मार्च 2018

सध्या प्रत्येक नोकरदार आणि व्यावसायिकाच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनलेली मोटार, दुचाकी नेहमीपेक्षा स्मार्ट कशी करता येईल याकडे लक्ष असते.आजच्या स्मार्ट युगात प्रत्येक गोष्ट स्मार्ट झाली आहे. यामध्ये तुमची मोटारदेखील येते. स्मार्ट मोटार बनविण्यासाठी काही ॲक्‍सेसरीजची गरज असते. यावर्षी विविध ऑटो एक्‍स्पोमध्ये सादर झालेल्या स्मार्ट ॲक्‍सेसरीजची माहिती... 

डॅशकॅम 
ट्रॅव्हल ब्लॉगर, प्रवासाची आवड असलेल्यांना ही अतिशय उपयुक्त ॲक्‍सेसरीज आहे. प्रवास अविस्मरणीय करण्यासाठी डॅशकॅमचा परफेक्‍ट पर्याय आहे. एखाद्या अपघात प्रसंगीदेखील या कॅम मधील फुटेज महत्त्वाचे ठरते. या कॅमच्या दर्जानुसार ते तीस किंवा चाळीस फ्रेम्स चित्रित करू शकतात.

हाय-रोड कार सीट ऑर्गनायजर
प्रवासाला जाताना विविध वस्तू बरोबर ठेवायला लागतात त्या सगळ्या डिक्कीमध्ये किंवा डॅशबोर्डच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्याऐवजी एक सीट ऑर्गनायजर बसविल्यास त्यात टिश्‍यूपेपर, हॅण्डवॉश, पाण्याची छोटी बाटली,माऊथ फ्रेशनर अशा वस्तू ठेवता येतात.

रेअर व्हिजन बॅकअप कॅमेरा
गाडी पार्क करताना किंवा रस्त्यावर लावताना मागे पाहण्यासाठी कॅमेरा लावलेला असतो. या कॅमेराच्या दर्जानुसार आणि आणि फीचर्सनुसार स्मार्ट कलर डिस्प्ले कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत. हे कॅमेरे नंबर प्लेटच्या वर आणि खाली कुठेही सहज लावता येतात. ब्ल्यूटूथ, वायफायद्वारे स्मार्टफोनला जोडू शकता.

यूएसबी चार्जर 
प्रवासात हमखास आपला मोबाईल ऑफ होतो, बॅटरी संपते. तुमच्या कारमध्ये जर यूएसबी एकच पोर्ट असेल तर आणखी एक हवे असल्यास मॅक्‍सबूस्ट यूएसबी चार्जर खरेदी करू शकता.

फोल्डेबल कार सीट पेट कॅरिअर
सुटीत फिरायला जाताना आपण निश्‍चितच आपल्या लाडक्‍या पपीजना, किटीला घेऊन जातोच. त्यांचा प्रवास देखील आपल्यासारखाच सुखकर ठेवण्यासाठी सहज उघडता येणारे आसन मिळते. या सीटमुळे तुमच्या पाळीव प्राणी देखील प्रवास एन्जॉय करतील.

कार-की फाइंडर
आपल्याकडे असलेल्या विविध किल्ल्यांपैकी एक मोटारीची असल्याने ती कधी तरी डाव्या-उजव्या हाताने गाडीची चावी हरवते. ही स्मार्ट चावी शोधण्यासाठी देखील एक स्मार्ट गॅझेट आहे. ’स्मार्ट की फाइंडर’मध्ये चावी हरविल्यानंतर त्याचा ॲलर्ट तुम्हाला स्मार्टफोनवर येतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या