वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ  

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

डॉक्टरांच्या यशामध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात. यापुढील काळात प्रयोगशाळा तंत्रज्ञांची आणखी गरज भासणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर घडवणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेच्या बाबतीत काही बाबी ठळकपणे निदर्शनास आल्या आहेत. त्यामध्ये मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले. यापुढील काळात कोरोना विषाणू व इतरही साथीच्या रोग्यांचे थुंकी/रक्त/मूत्र इत्यादी बाबींच्या तपासणीसाठी अधिक प्रयोगशाळा आणि अधिक तंत्रज्ञ लागण्याची शक्यता हेल्थ केअर उद्योगाशी निगडित तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असे तंत्रज्ञ देशातील विविध भागातच नव्हे, तर जगात इतरत्रही लागू शकतात. त्यामुळे मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनचा अभ्यासक्रम हा एक करिअर घडवण्याचा चांगला पर्याय ठरू शकतो.

 ‘मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी’ या अभ्यासक्रमाअंतर्गत प्रयोगशाळेत रुग्णांचे रक्त/मूत्र/थुंकीची तपासणी करणे, या तपासणीचे निष्कर्ष काढणे आणि त्याचा विस्तृत अहवाल तयार करणे या बाबींचा समावेश आहे. हा अहवाल आणि त्यातील निष्कर्षांचा डॉक्टरांना उपचारांची दिशा प्रभावीरीत्या ठरवण्यासाठी मोठा उपयोग होत असतो. डॉक्टरांच्या यशामध्ये मेडिकल लॅबोरेटरी तंत्रज्ञ महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

अभ्यासक्रम
आपल्याकडे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ) हा अभ्यासक्रम अनेक वैद्यकीय महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये सुरू करण्यात आला आहे. काही संस्थांमधील या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा, तर काहींचा कालावधी तीन वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याने बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला असावा. या विषयांमध्ये स्पेशलायझेशन केल्यानंतर लॅबोरेटरी मॅनेजर, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, रिसर्च असोसिएट, लॅबोरेटरी टेस्टिंग मॅनेजर इत्यादी संधी मिळू शकतात.

संस्था आणि अभ्यासक्रम
१) सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स ः या संस्थेत तीन वर्षे कालावधीचा बी.एस्सी. इन मेडिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येतो. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत चाचण्या, या चाचण्यांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांची हाताळणी, देखभाल, दुरुस्ती, माहितीचे विश्लेषण करणे यासाठी लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्याच्या हेतूने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. हायटेक वैद्यकीय उपचारांमध्ये या तंत्रज्ञांना डॉक्टरांच्या बरोबरीने कार्य करण्याची संधी त्यांच्याकडील तांत्रिक आणि शास्त्रीय माहितीमुळे मिळू शकते. विद्यार्थ्यांची निवड एंट्रन्स परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाते. 

करिअर संधी :
हा अभ्यासक्रम केल्यावर मेडिकल टेक्नॉलॉजी इंडस्ट्री, मेडिकल इक्विपमेंट्स कंपनी, होम केअर इंडस्ट्री, मेडिकल इमॅजिन इंडस्ट्री, डायलिसीस सेंटर अॅंड सर्व्हिसेस, पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज, सिम्युलेशन सेंटर्स, रिसर्च अॅंड डेव्हलपमेंट सेंटर्स, आयटी इन मेडिकल टेक्नॉलॉजी, उद्योजक अशा काही क्षेत्रांमध्ये करिअर करता येणे शक्य आहे. 
संपर्क ः सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, सेनापती बापट मार्ग, पुणे - ४११००४, दूरध्वनी ः ०२०-२५६५८०१५ 
संकेतस्थळ ः sihspune.org, ईमेल ः admin@sihspune.org

२) मनिपाल कॉलेज ऑफ हेल्थ सायन्स - या संस्थेने बी.एस्सी इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असून यामध्ये एक वर्ष कालावधीच्या इंटर्नशिपचा समावेश आहे.  
पात्रता ः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी या विषयांसमवेत जीवशास्त्र, गणित, संगणकशास्त्र, सांख्यिकी, इलेक्ट्रॉनिक्स, मानसशास्त्र यांपैकी एक विषय घेतलेला असावा. विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण मिळायला हवेत. प्रवेशासाठी मनिपाल एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. 
संपर्क ः संकेतस्थळ ः admissions@manipal.edu
ईमेल ः https://manipal.edu  

३) जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सायन्स - या संस्थेचे अभ्यासक्रम - १) बी.एस्सी इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी : तीन वर्षे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एंट्रन्स परीक्षा घेतली जाते. २) सर्टिफिकेट कोर्स इन इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन कोर्स. कालावधी : एक वर्ष. या अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रात मिळालेल्या गुणांचा आधार घेतला जातो. प्रवेश प्रकिया ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत राबवली जाते.
संपर्क ः जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सायन्स कॅम्पस रोड, गोरीमेदू, धन्वंतरी नगर, पुद्दुचेरी- ६०५००६, संकेतस्थळ ः https://jipmer.edu.in/ 

४) एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स - या संस्थेच्या नवी मुंबई आणि औरंगाबाद कॅम्पसमध्ये चार वर्षे कालावधीचा बी.एस्सी इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येतो. 
संपर्क ः एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, एमजीएम कॅम्पस, सेक्टर १, कामोठे, नवी मुंबई - ४१०२०९, संकेतस्थळ ः mgmuhs.com, ईमेल ः registrar@mgmuhs.com, दूरध्वनी ः ०२०-२७४३२४७१, फॅक्स  ः २७४३१०९४

५) आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स - या संस्थेने बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. 
पात्रता ः बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेले असावेत. त्यांना किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम मुंबई आणि नवी मुंबई कॅम्पसमध्ये करता येतो.  
संपर्क ः १) आयटीएम - इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, सेक्टर-१२, प्लॉट क्रमांक ११, न्यू पनवेल - पूर्व, रायगड - ४१०२०६,  
ईमेल ः ihs@itm.edu, २) के. बी. हाजी 
बचुली चॅरिटेबल ऑप्थलॅमिक अॅंड इएनटी हॉस्पिटल, ५८/६०, जहांगीर मेरवानजी रोड, परळ, मुंबई - ४०००१२, संकेतस्थळ ः itm.edu

६) डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अॅंड रिसर्च सेंटर - या संस्थेत सर्टिफिकेट कोर्स इन ॲडव्हान्स्ड मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरी टेक्निक हा अभ्यासक्रम करता येतो. बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. 
संपर्क ः संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे - ४११०१८. दूरध्वनी ः ०२०-६७११६४००, फॅक्स  ः २७८०५२१७, 
संकेतस्थळ ः dpu.edu.in, 
ईमेल ः info.medical@dpu.edu.in 

७) भारती विद्यापीठ - या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. 
पात्रता ः बी.एस्सी. इन मायक्रोबायोलॉजी किंवा बायोकेमेस्ट्री किंवा केमेस्ट्री किंवा झूऑलॉजी किंवा बॉटनी. विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड पदवी परीक्षेत मिळालेले गुण आणि मुलाखत याद्वारे केली जाते. 
संपर्क ः मेडिकल कॉलेज, पुणे - सातारा रोड, पुणे - ४११०४३, 
दूरध्वनी ः ०२०-२४३७३२२६, फॅक्स  ः २४३७२१७५, 
संकेतस्थळ ः https://mcpune.bharatividyapeeth.edu  ईमेल ः bvumedicalpune@gmail.com

८) अम्रिता सेंटर फॉर अलाइड हेल्थ सायन्सेस - या संस्थेमध्ये बी.एस्सी. इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी - चार वर्षे. 
पात्रता ः बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये ६० टक्के गुण मिळायला हवेत. त्याचबरोबर गणितातसुद्धा ६० टक्के गुण मिळायला हवेत. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या बारावीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. उपलब्ध जागेनुसार गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. 
संपर्क ः अम्रिता इन्स्टिट्यूट फॉर अलाइड हेल्थ सायन्सेस, अम्रिता विश्व विद्यापीठम, हेल्थ सायन्सेस कॅम्पस, एआयएमएस पोनेक्करा, पोस्ट ऑफिस कोची - ६८२०४१, दूरध्वनी ः ०४८४-२८५८३८३, 
फॅक्स  ः २८५८३७४, 
संकेतस्थळ ः aims.amrita.edu, 
ईमेल ः ugadmissions@aims.amrita.edu

९) के. जे सोमय्या मेडिकल कॉलेज अॅंड रिसर्च सेंटर - या संस्थेने पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून त्याअंतर्गत बायोकेमेस्ट्री, मायक्रोबायोलॉजी आणि पॅथॉलॉजी या तीन विषयांपैकी कोणत्याही एकामध्ये स्पेशलायझेशन करण्याची सुविधा आहे. 
संपर्क ः सोमय्या विद्याविहार, कॉम्प्लेक्स, पूर्व द्रुतगती मार्ग, सायन - पूर्व, मुंबई - ४०००२२, दूरध्वनी ः ०२२-५०९५४७००, 
संकेतस्थळ ः https://kjsmc.somaiya.edu
ईमेल ः somaiyamedical@somaiya.edu
 

संबंधित बातम्या