नर्सिंग व्यवसायातील संधी

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कव्हर स्टोरी

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात १२ मे रोजी ‘जागतिक परिचारिका दिवस’ साजरा करण्यात आला. या काळात डॉक्टरांच्या खांद्यास खांदा लावून जगभरातील परिचारिका कोरोना रुग्णांची दिवसरात्र सेवा करीत आहेत. सध्याच्या काळात त्यांनी केलेले कार्य हे अद्वितीय स्वरूपाचे ठरले आहे. याच काळात निदर्शनास आले, की सबंध जगात परिचारिंकाची मोठी मागणी आहे. पण तितक्या संख्येत  प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध नाहीत. याच काळात अमेरिकेने लवकरच २५ हजार परिचारिकांची भरती करण्यात येईल याचा निर्णय घेतला. भारतातसुद्धा  नजीकच्या भविष्यात आरोग्य सेवेचा विस्तार आणि सुदृढीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे केंद्र आणि राज्य सरकारांनी घोषित केले आहे. यामध्ये परिचारिकांना मोठे स्थान मिळणार आहे. या बाबी लक्षात घेता, पुढील काळात नर्सिंग व्यवसायात शासकीय आणि खासगी रुग्णालये, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स येथे करिअर करण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. त्यामुळे यंदा बारावी विज्ञान शाखेत असणाऱ्या मुली आणि मुलांनीसुद्धा  प्रवेशाच्या रोडमॅपमध्ये नर्सिंग विषयाचा समावेश करायला हवा. 

दिलासा आणि आधार
रुग्णांना दिलासा आणि मानसिक आधार देण्याचे कार्य परिचारिका करीत असतात. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची तपासणी डॉक्टर ठरलेल्या वेळी करून जातात. मात्र, परिचारिकां(नर्सेस)चा वावर सतत अवतीभवती असतो. ब्लडप्रेशर तपासणी, निर्धारित वेळी औषधाच्या मात्रा देणे, वेळोवेळी डॉक्टरांच्या सूचना रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांकडे पोचवणे अशी विविध कामे नर्सेस करत असतात. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील महत्त्वाचा दुवा नर्सेस असतात. डॉक्टरांच्या यशात नर्सिंग क्षेत्राचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोठा सहभाग असतो. 

करिअर संधी
गेल्या दशकात मोठमोठी कॉर्पोरेट रुग्णालये सर्वत्र उभी राहिली आहेत. त्यामुळे नर्सेसची गरजही वाढली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये नर्सेसची भरती सातत्याने केली जाते. सुधारगृहे, वृद्धाश्रमे, सैन्य दलाची रुग्णालये, शुश्रूषा गृहे आणि परदेशातही चांगल्या संधी मिळू शकतात. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडियन नर्सिंग काउन्सिल इत्यादी ठिकाणीही रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. बऱ्याच श्रीमंतांच्या घरी रुग्णांच्या सेवेसाठी व्यक्तिगत नर्सेसची सेवा अधिक वेतन वा मानधन देऊन घेतली जाते. प्रशिक्षित नर्सेसची गरज आणि उपलब्धता यामध्ये बऱ्यापैकी दरी निर्माण झाल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना तत्काळ करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

प्रवेश प्रक्रिया
या क्षेत्रात येण्यासाठी ‘बी.एस्सी इन नर्सिंग’ हा अभ्यासक्रम करावा लागतो. बारावी  विज्ञान शाखेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम बहुतेक सर्व शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहे. शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट (नॅशनल इलिजिब्लिटी कम  एंट्रन्स टेस्ट) परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. अधिक चांगले गुण याचा अर्थ अधिक चांगल्या व विशेषत: शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि गुणानुक्रम यांचा अभ्यास केल्यास कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, याची सर्वसाधारण कल्पना येऊ शकते. त्यानुसार नीट परीक्षेतील यशासाठी करावयाच्या परिश्रमाची दिशा निश्चित करणे सुलभ  होऊ शकते.

नर्सिंग अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था
१) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ः नाशिकमध्ये असलेल्या  या संस्थेमार्फत नर्सिंग विषयाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम शासकीय वैद्यकीय व काही खासगी महाविद्यालयांमध्ये करता येतात. १) बी.एस्सी इन नर्सिंग, २) बेसिक बी.एस्सी इन नर्सिंग, ३)  फेलोशिप कोर्स इन  आर्थोपेडिक अँड  रिहॅबिलिटेशन इन नर्सिंग, ४) फेलोशिप कोर्स इन ऑपरेशन रूम नर्सिंग, ५) पोस्ट सर्टिफिकेट इन बी.एस्सी. इन नर्सिंग, ६) सर्टिफिकेट इन बी.एस्सी इन नर्सिंग, ७) सर्टिफिकेट इन  रिनल  नर्सिंग, ८)  एम.एस्सी. इन नर्सिंग.

२) कोकिलाबेन धीरूभाई अंबानी नर्सिंग कॉलेज ः या संस्थेने बी.एस्सी इन नर्सिंग हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी ५० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. 
संपर्क ः कोकिलाबेन हॉस्पिटल, चार बंगला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००५३, दूरध्वनी ः ०२२-३०९७०७४३, फॅक्स  ः ३०९७२०३०, 
संकेतस्थळ ः www.kdnursingcollege, 
ईमेल ः kdnursingcollege@relianceada.com

३) कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ः कराड येथील  कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस डीम्ड युनिव्हर्सिटी अंतर्गत कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस या संस्थेमधील  ‘बॅचलर ऑफ नर्सिंग’ या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया एंट्रन्स टेस्ट घेतली जाते. या  परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला बारावी  विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
संपर्क ः कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सिटी, कराड, दूरध्वनी ः ०२१६४-२४१५५५-८,  फॅक्स  ः २४३२७२, 
संकेतस्थळ ः www.kimsuniversity.in, 
ईमेल ः contact@kimsuniversity.in

४) भारती विद्यापीठ ः या संस्थेच्या  स्कूल ऑफ नर्सिंग येथे बी.एस्सी - नर्सिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
संपर्क ः स्कूल ऑफ नर्सिंग, भारती विद्यापीठ, डीम्ड युनिव्हर्सिटी, पुणे-सातारा रोड,  कात्रज-धनकवडी, पुणे - ४११०४३, दूरध्वनी ः ०२०-२४३७२४९६,  फॅक्स  ः २४३६४५१५, संकेतस्थळ ः http://conpune.bharatividyapeeth.edu,  ईमेल ः conpune@bharatividyapeeth.edu 

५) डॉ. डी. वाय. पाटील डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी ः या संस्थेच्या स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये, बेसिक बी.एस्सी नर्सिंग आणि पोस्ट बेसिक बी.एस्सी नर्सिंग हे दोन अभ्यासक्रम करता येतात. 
संपर्क ः रजिस्ट्रार ऑफिस, सेक्टर ७, नेरुळ, नवी मुंबई - ४००७०६, अडमिशन  सेल, दूरध्वनी ः ०२२-२७७०८११२ आणि ३०९६५८१६, 
ईमेल ः admissions@dypatil.edu

६)  अम्रिता विश्वविद्यापीठम ः या संस्थेच्या स्कूल ऑफ नर्सिंगमार्फत 'बॅचलर ऑफ नर्सिंग' अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अमृतापूरी, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता कोझिकोड, नवी दिल्ली, तिरुअनंतपूरम या ठिकाणी एंट्रन्स परीक्षा घेतली जाते. पात्रता : बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा जैव रसायनशास्त्र या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के गुण मिळणे आवश्यक. 
संपर्क ः द अॅडमिशन, कोऑर्डिनेटर, ऑफिस ऑफ द अॅडमिशन्स, अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एआयएमएस - पोनेक्करा, पोस्ट ऑफिस-कोची - ६८२ ०४१, केरळ, दूरध्वनी ः ०४८४-२८५ ५८२००,  
फॅक्स  ः २८५ ५८२०२, 
संकेतस्थळ ः https://www.amrita.edu/admissions/bsc-nursing-2020/, ईमेल ः nursingcollege@aims.amrita.edu

७)  बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग  ः या संस्थेच्या बी.एस्सी इन नर्सिंग या अभ्यासक्रमाला  ४० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी एंट्रन्स  परीक्षा घेतली जाते. 
संपर्क ः बॉम्बे हॉस्पिटल रिंगरोड इंदोर - ४५२०१०, दूरध्वनी ः ०७३१-२५५२२५२५,  फॅक्स  ः ४२६६५७१, संकेतस्थळ ः 
www.bombayhospitalindore.com, 
ईमेल ः bh.coni@gmail.com

८) इतर महाविद्यालये  ः १) कस्तुरबा नर्सिंग कॉलेज, वर्धा (अभ्यासक्रम - बी.एस्सी इन नर्सिंग), २) सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर (अभ्यासक्रम - बेसिक बी.एस्सी इन नर्सिंग), ३) बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे (अभ्यासक्रम - बी.एस्सी इन नर्सिंग), ४) सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग (अभ्यासक्रम - पोस्ट बेसिक बी.एस्सी. इन नर्सिंग), ५) मेट्रोपोलिटन एज्युकेशन ट्रस्टचे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई (अभ्यासक्रम - बी.एस्सी इन नर्सिंग), 
६) लीलाबाई ठाकरसी कॉलेज ऑफ नर्सिंग,  मरीन लाइन्स, मुंबई (अभ्यासक्रम - एम.एस्सी इन नर्सिंग), ७) जी.  एस. मेडिकल कॉलेज, परळ, मुंबई (अभ्यासक्रम - डायलॅसिस अँड  ट्रान्सप्लँटेशन फॉर नर्सेस), ८) टेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, बंड गॉर्डन, पुणे (अभ्यासक्रम - बेसिक बी.एस्सी इन नर्सिंग), ९) श्रीमती बकुळ तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, कर्वे रोड पुणे (अभ्यासक्रम - बी.एस्सी इन नर्सिंग), 
१०) आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे (अभ्यासक्रम - बी.एस्सी इन नर्सिंग), 
११) एम. जी. एम. युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स, नवी मुंबई (अभ्यासक्रम - बी.एस्सी. इन नर्सिंग), १२) ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड  रिहॅबिलिटेशन, महालक्ष्मी, मुंबई (अभ्यासक्रम - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिहॅबिलिटेशन फॉर नर्सेस), १३) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  मातृसेवा संघ नर्सिंग कॉलेज (महाल मॅटर्निटी होम, कोठी रोड महाल नागपूर - ४४०००२.  या संस्थेत 'एएनएम' हा पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. पात्रता : दहावी उत्तीर्ण), १४) विद्याशिक्षण प्रसार मंडळाचे कॉलेज ऑफ नर्सिंग  अँड  रिसर्च सेंटर, दिगडोह हिल्स हिंगणा रोड, नागपूर - ४४००१०

संबंधित बातम्या