विश्‍वकरंडक विशेष कोटेबल कोट्‌स

विचारवंत
सोमवार, 27 मे 2019

कोटेबल कोट्‌स

तुमच्या स्वप्नाचा जरूर पाठलाग करा. पण स्वप्नाच्या मागे पळताना तुम्ही शॉर्टकट घेत नाही ना, याची खात्री करा.
- सचिन तेंडुलकर


काळजी किंवा भीती आपल्याला कोणतीही गोष्ट करण्यापासून थांबवू शकत नाही. संपूर्ण विचार आणि संपूर्ण कृती केल्यास तुम्हाला अशक्‍य वाटलेली गोष्टही शक्‍य होईल. 
- कुमार संगकारा


चांगला कर्णधार हा लढवय्या असावा; त्याच्याकडे आत्मविश्‍वास असावा, पण तो गर्विष्ठ नसावा. तो कणखर असावा, पण हट्टी नसावा.
- सर डॉन ब्रॅडमन


पश्‍चात्तापाने भरलेले आयुष्य जगणे कठीण आहे.
- शेन वॉर्न


तुमच्या मानसिकतेचा प्रभाव तुमच्या इतर गोष्टींवर पडतो.
- सर विव्हियन रिचर्ड्‌स


कुटुंबाचा आणि मित्रांचा पाठिंबा, मार्गदर्शन आणि आश्‍वासन यांशिवाय खेळामध्ये करिअर करणे अशक्‍य आहे. कारण अवघड प्रसंगांमध्ये नेहमी हेच लोक तुमची साथ देतात. 
- राहुल द्रविड


जो खेळाचा आदर करतो आणि खेळही भ्रष्ट करत नाही, तोच खेळात नायक असतो. 
- विराट कोहली

संबंधित बातम्या