शब्दकोडे २२

किशोर देवधर
सोमवार, 14 मार्च 2022

शब्दकोडे २

आडवे शब्द : 
१.     मुजरा, लवून केलेला नमस्कार, 
४.     मांसाहारी,  
६.    कयास, तर्क, 
८.     गुणांची किंमत करणारा, 
९.     डोक्याला झालेली जखम, 
१०.    दैवी देणगी, सिद्धी, 
१२.    वियोग, विरह, 
१४.    भिजवून मळलेला पदार्थाचा गोळा, 
१६.    पाचर किंवा भोक बुजवणारी खुंटी, 
१७.    उठवले किंवा जिवाचे केले जाणारे जंगल, 
१८.    गुडदी, झाकण किंवा मोठे बूच, 
१९.    काही कारणासाठी घेतलेली रजा किंवा काही धार्मिक विधी, मुंज, लग्न झाल्यावर केले जाणारे, 
२०.    ओरखडा, 
२१.    जेवणाला खाडा, उपास, 
२३.    निंदक, उनाडक्या करणारा, 
२६.    समईचे तेल घालण्याचे तोंड,
२८.    फिरकी, गुंडाळी, 
२९.    लांबलचक बोलणे, विस्तृत

उभे शब्द : 
१.     गावातील जमिनीची नोंद ठेवणारा अधिकारी, पटवारी, 
२.    कुंपणावर लावले जाणारे एक औषधी झाड, याच्या फळांनी पूर्वी मुली बैठे खेळ खेळायच्या, 
३.     नहर, कालवा किंवा जमिनीवर बसण्याचे लाकडी आसन, 
४.     टरफलासहित तांदूळ, 
५.     बातमी अशी होणे म्हणजे अनेकांच्या कानी पडणे, 
६.     स्त्रियांचे पायाच्या अंगठ्यात घालण्याचे जाडजूड भक्कम कडे, उतर भारतातील स्त्रिया विशेष करून हा अलंकार वापरतात, 
७.     चित्रकृतींचे वगैरे प्रदर्शन भरवण्याची जागा, आर्ट गॅलरी, 
११.     जिन्नस, वस्तू किंवा पर्वत, 
१२.     तिरडी किंवा कामट्यांचा दरवाजा, 
१३.     व्याजाच्या हिशेबाचा एक प्रकार, 
१५.     पात्राच्या तोंडावर आवळून बांधलेले वस्त्र, 
१६.     देणेघेणे हिशेब बरोबर करणे, परतफेड, 
१७.     कणखर, मजबूत, 
२०.     म्हातारपणी लागणारे वेड, 
२२.    सोनाराचा भट्टीतील मूस उचलण्याचा चिमटा किंवा एक वनस्पती विशेष, 
२४.     वितरण, 
२५.     मदनाची सखी, 
२७.     झुंबड, गर्दी, 
२८. अनेक बिऱ्‍हाडे असलेली खुराड्यासारखी इमारत किंवा पैंजण
 

संबंधित बातम्या