शब्दकोडे 80
एंटरटेनमेंट
आडवे शब्द
१. अगदी बालपणापासूनचा मित्र,
५. ऋग्वेदातील मंत्र,
७. या ऋषींचा अवतार म्हणजे अत्यंत तापट,
८. फट, भेग,
१०. आकडा किंवा मांडी,
११. वितुष्ट, वाकडे,
१२. एखाद्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधा,
१४. मादक, नशा आणणारे,
१६. पदवी, किताब,
१७. पाणी वाहून नेण्याची चामडी पिशवी,
१९. बाण किंवा किनारा,
२१. रुची, गोडी किंवा द्रव,
२३. पूजनीय, आदरणीय,
२५. वाटप, विभागणी,
२६. संप्रदाय,
२७. पोटापाण्याला देणारा हा सुखी भव म्हणतात,
२९. लहान किल्ला किंवा सोनाराचे एक हत्यार,
३०. ओंकार,
३१. मालवाहू नौका, गलबत,
३२. अनुकंपा, सहानुभूती.
उभे शब्द
१. म्हणजे लाक्षणिक अर्थाने अंगावर दागदागिने नसलेली स्त्री,
२. समीक्षा,
३. परीट, धोबी,
४. ...दुर्लौकिक झालेला, कानफाट्या,
६. टाळाटाळ, काम लांबणीवर टाकणे,
९. किंमत, गुण किंवा योग्यता,
१०. अवकाश,
१३. मोठे वारूळ,
१४. गगन, आकाश,
१५. फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस येणारे वर्ष,
१८. नातवाचा नातू,
२०. चघळणे, सावकाश चावून चावून खाणे,
२२. सूर्याचे एक नाव,
२४. बधिर, संवेदना विरहित,
२६. चिखलात उगवणारे फूल, कमळ,
२७. मनातील पूर्वदूषित ग्रह,
२८. पोती वगैरे शिवण्याची मोठी सुई,
२९. हत्ती किंवा लोखंडी काठी.