शब्दकोडे क्र. 62
शब्दकोडे क्र. 62
आडवे शब्द
१. पहिला हक्क असलेले, टॉप सीडेड
६. दुसरे लग्न करणारी
८. राजीनामा
१०. चूडा, शेंडी
११. ही थोडी असते आणि सोंगे फार
१२. पिकदाणी, थुंकण्याचे पात्र
१५. पुत्र ऐसा पराक्रमी व्हावा की ज्याचा तिन्ही लोकी झेंडा
१६. बीजकोष किंवा भजे
१७. एका पक्षात दोन एकादशी आल्यास दुसरीचे संबोधन किंवा वारकरी संप्रदायाचा धर्म
२०. स्त्रियांचा पायाच्या बोटात घालण्याचा दागिना
२२. रेवती, पूर्वाषाढा वगैरे सात नक्षत्रांच्या समूहाचे संबोधन
२४. ओंगळ, किळसवाणे
२६. कापूस भरलेला बिछाना किंवा राजाचे तख्त
२७. जखमेवर लावण्याचे औषध
२८. मुक्ताईने हा पदार्थ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाजला होता आपण मात्र मनातल्या मनात खायचा
२९. एकत्र बांधलेली लाकडे, काटक्या
३०. रोख पैसे मोजून
३१. अपाय, जखम
३२. निरनिराळ्या पात्रात कमी अधिक पाणी घेऊन केलेेले वाद्य
उभे शब्द
१. मंडईतील दलाल, गुमास्ता
२. सत्कारमूर्तीला दिला जाणारा गुणगौरव करणारा लेख
३. छोटी गोष्ट, घटनेचे वर्णन
४. मूर्च्छा, भोवळ
५. तीर्थस्थानी केलेले मुंडण
६. छपराची किंवा चोळीची एक बाजू
७. दालन, विभाग
९. वेढा
१०. अनुशासन
१२. काही मिळवून आणि काही सोडून केलेला सलोखा
१३. धुंदी, कैफ
१४. कोकणातील वतनदार
१५. वेणी घातल्यानंतर फणीत अडकलेल्या केसांची गुंडाळी
१७. पुढे होणारा, आगामी
१८. लग्नघरची मंडळी किंवा विदर्भ प्रांतातील
१९. युद्धातील तोफवाहू वाहन
२१. अस्थिर, दोलायमान
२३. बाजारात मालाला उठाव नसण्याची स्थिती
२४. समुद्रातील बर्फाचा पर्वत
२५. सख्या भाऊ
२८. पतंगाचा धारदार दोरा
२९. किंमत, भाव