शब्दकोडे ६६
शब्दकोडे ६६
आडवे शब्द :
१. जुळ्या मुलांचे एक संबोधन,
५. अटकळ, तर्क,
७. म्हातारपणचे वेड,
८. पत्रिकेतील देव, राक्षस व मनुष्य हे प्रकार,
९. वहिवाट, नियम,
१०. अश्व, घोडा,
११. नदीकाठी खोदलेली विहीर,
१३. जिन्नस, वस्तू किंवा पर्वत,
१५. हुन्नर किंवा चंद्राचा सोळावा अंश,
१७. कायदेशीर, नियमाला धरून,
१८. शेष, शिल्लक,
१९. पदवी, किताब,
२२. प्रतिबंध, मज्जाव,
२३. पाठीतील हाडांची मालिका,
२४. गुरांचा चारा, ज्वारीची वाळलेली ताटे,
२६. मदतीसाठी प्रार्थना,
२७. निष्कारण देण्यात येणारे दूषण,
३०. मिळमिळीत, बेचव,
३२. मेंदी,
३३. फांदी किंवा विभाग,
३५. चांगल्या कार्यासाठी प्राणांची आहुती देणारा, शहीद,
३६. सावकारी व्याजाचा एक प्रकार
उभे शब्द :
१. धार्मिक विधीच्यावेळी तळहातावर पाणी घेऊन प्राशन करण्याची क्रिया,
२. अंगावरील मारहाणीच्या खुणा,
३. दक्ष, सतर्क,
४. जखमेची खूण, डाग,
५. जवळचे सर्व पैसे संपल्यामुळे झालेली स्थिती,
६. बर्फाळ प्रदेशात आढळणारा एक केसाळ प्राणी,
९. साष्टांग नमस्कार,
१२. बरी वाईट बाजू विचारात घेऊन केलेली चर्चा,
१४. वेष असा अव्यवस्थित असला तरी अंतरी नानाकळा असाव्यात,
१६. लांब साखळी असलेला दीप,
२०. पौर्णिमा,
२१. निरर्थक बडबड,
२२. कळकळ, आपुलकी,
२५. करवंटीवरचे तंतू,
२७. लाखेच्या बांगड्यांवर देण्यात येणारा काचेचा मुलामा,
२८. मशाल,
२९. स्थिती, अवस्था किंवा वस्त्राच्या टोकाची सुते,
३१. पश्चात्ताप, उपरती,
३२. हिंमत, अवसान,
३४. खड्डा, खळगा