शब्दकोडे ६
शब्दकोडे ६
आडवे शब्द :
१. निष्फळ प्रयत्न करण्यात काही फायदा होत नाही या अर्थाची एक म्हण,
६. हा गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये,
८. हाडविरहित मांसाचा पदार्थ,
१०. चुकवाचुकव,
१२. आपल्या राष्ट्रीय प्राण्याची मादी किंवा मालगाडीचा उघडा डबा,
१३. निंदक, उनाडक्या करणारा,
१५. अरण्यात राहून भोगावे लागणारे कष्ट,
१७. वकिलाचे गिऱ्हाईक, पक्षकार,
२०. उत्कट इच्छा,
२१. पात्राच्या तोंडावर आवळून बांधलेले वस्त्र,
२३. खेद, दुःख,
२४. दणाणणारे छत,
२५. चरवी, दूध काढण्याचे पात्र,
२७. आपला राष्ट्रीय पक्षी,
२९. गुलामगिरी,
३०. साधे जेवण किंवा नवऱ्यापेक्षा बायको वयाने मोठी असलेले जोडपे,
३२. फाटके वस्त्र, चिंधी
उभे शब्द :
१. गुरांच्या चरायला जाण्यायेण्यामुळे तयार झालेला रस्ता,
२. रोगप्रतिबंधक औषध,
३. घसट, जवळीक,
४. निषिद्ध, त्याज्य,
५. छपरावरच्या पाण्याची धार जेथून पडते ती जागा,
७. नांगराच्या टोकाचे लोखंडी पाते,
८. अनुकंपा, सहानुभूती,
९. पैसे किंवा आजीबाईची औषधे ठेवण्याची छोटी पिशवी,
१०. भजनाला साथ देणारी लहान झांज,
११. पागोट्यावर गुंडाळण्याचे कापड,
१४. विल्हेवाट, निकाल लावणे,
१६. गर्व, ताठा,
१७. अलौकिक, असामान्य,
१८. मोठा जरीचा पदर,
१९. शरीरातील चरबी,
२१. वाताहत, पांगापांग,
२२. पौर्णिमा,
२३. पूर्वीचे वीस मणांचे माप,
२६. असा द्राव म्हणजे ज्यात आणखी पदार्थ विरघळण्याची शक्यता नाही,
२७. स्त्रियांचा नाकात घालण्याचा एक अलंकार,
२८. ईश्वर व जीव यात भेद मानणे,
३१. मांजरी किंवा नदीच्या पात्रातील उघडा पडलेला भाग